' तुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये Third Man हे नाव कुठून आणि कसे आले? – InMarathi

तुम्हाला माहित आहे का क्रिकेटमध्ये Third Man हे नाव कुठून आणि कसे आले?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण भारतीय केवळ क्रिकेट पाहतच नाही तर ते खेळतोही अगदी जीव ओतून! यामुळेच जगात कोणत्याही क्रिकेट रसिकांना नसेल तेवढं क्रिकेटचं अगाध ज्ञान भारतीयांना असतं. त्यात तुम्ही देखील मागे नसालच. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे देखील माहित असेलच की मैदानावर फिल्डिंग कशी लावतात, कोणत्या भागाला काय म्हणतात वगैरे वगैरे! पण तुमच्यापैकी  फारच कमी जणांना मैदानावरील Third Man मागची गोष्ट माहित असेल.

cricket-field-position-marathipizza

 

ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी- Third Man म्हणजे तो फिल्डर जो बाऊंड्री जवळ ऑफ साईडला विकेट कीपरच्या मागे ४५ अंशाच्या कोनात उभा असतो.

Third Man यासाठी उभा केला जातो जेणेकरून समजा चुकून विकेट कीपर आणि त्यानंतर स्लीप मध्ये उभ्या असलेल्या फिल्डर कडून चेंडू सुटला तर Third Man चा फिल्डर तो चेंडू अडवू शकतो.

 

third-man-marathipizza

 

Third Man चे क्षेत्र फार मोठं असतं. केवळ विकेट कीपर आणि स्लीप मध्ये उभ्या असलेल्या फिल्डरला बॅकअप देणं एवढंच  त्याचं काम नसून आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये बॉल येत असल्याने त्याला नेहमी सतर्क राहावं लागतं.

===

===

अश्या या महत्त्वपूर्ण Third Man च्या मागची कथा आज आपण जाणून घेऊया.

जेव्हापासून Overarm बॉलिंगची पद्धत सुरु झाली तेव्हापासूनच Third Man ची ही संकल्पना अस्तित्वात आली. या फिल्डरला Third Man यासाठी म्हटलं जातं कारण तो विकेट कीपर आणि स्लीप मध्ये उभ्या असलेल्या खेळाडूच्या मागे उभा असलेला तिसरा खेळाडू असतो. म्हणूनच तो ज्या जागी उभा राहतो, त्या जागेला आणि त्या फिल्डरला Third Man हे नाव देण्यात आलं.

 

third-man-marathipizza01

 

आजकाल टेस्ट मॅचेसमध्ये Third Man ला फिल्डर उभा असलेला दिसत नाही कारण पूर्वीसारख्या सर्वच टीम डिफेन्सीव्ह न खेळता अटॅकिंग मोड मध्ये खेळतात. त्यामुळे अश्या वेळेस Third Man ला जास्त महत्त्व उरत नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?