महाभारतातील दोन क्रूर कौरव – दुर्योधन आणि दुष्यासन ह्यांच्या नावांमागच्या ‘कथा’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

महाभारत हा आपल्या हिंदू धर्मामधील एक महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा ग्रंथ मानला जातो. महाभारतामधील घडलेल्या घडामोडी ह्या आपल्याला ते वाचताना स्वतः अनुभवल्यासारखे वाटतात. द्रोपदीने पाच पांडवांबरोबर केलेला विवाह, सारीपाटामध्ये पांडवांनी हरलेले संपूर्ण राज्य, पांडव आणि कौरव यांच्यामधील युद्ध, कृष्णाने पांडवांना केलेली मदत या महाभारतातील सर्व गोष्टी खूपच विलक्षण आहेत. गांधारीला मिळालेल्या वरदानामुळे तिला १०० कौरव झाले, हे आपल्याला माहीतच असेल. हे सर्व कौरव माहित नसले तरी, दुर्योधन आणि दुष्यासन हे तर तुम्हाला नक्कीच माहित असतील. पण तुम्हाला हे माहित आहे का? की त्यांना ही नावे कशी पडली, नाही ना. ते एक मोठे आश्चर्यच आहे. चला तर मग जाणून घेऊया यामागील रहस्य..

duryodhan and dushasan.marathipizza
ytimg.com

कौरवांचे वडील धृतराष्ट्र आणि आई गांधारी होती. धृतराष्ट्र हे जन्मापासूनच दृष्टिहीन होते. आपला पती दृष्टिहीन असल्याने गांधारीने देखील पत्नी धर्मासाठी आपले डोळे झाकून घेतले. महर्षी व्यास यांनी गांधारीला शंभर पुत्र होण्याचे वरदान दिले होते. त्यामुळे गांधारीला गर्भधारणा झाली. पण दीर्घकाळ गर्भधारणा होऊन देखील तिला मुल झाले नाही. पण त्याचवेळी कुंतीने एका बालकाला जन्म दिला.
यामुळे गांधारी क्रोधीत झाली आणि तिने स्वत:च्या पोटावर भयानक प्रहर केला. त्यानंतर तिच्या पोटामधून शंभर मांसाचे तूकडे बाहेर आले. महर्षी व्यासांनी त्या मांसाच्या तुकड्यांना तुपासह १०० वेगवेगळ्या भांड्यांमध्ये ठेवले. ही भांडी दोन वर्ष तशीच झाकून ठेवण्यात आली. त्यानंतर पहिले भांडे दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस उघडण्यात आले. त्यामध्ये एक मुल आढळले आणि हा मुलगा म्हणजेच दुर्योधन होता.

जेव्हा दुर्योधन जन्माला आला, तेव्हा तो दिवस खूप भयानक होता. सगळीकडे अशांती होती आणि घुबड, लांडगे संपूर्ण राज्यात ओरडत होते. त्यावेळी महर्षी व्यास यांनी धृतराष्ट्राला सांगितले की, ‘तुझा सर्वात मोठा मुलगा हा या राज्यासाठी हानिकारक आहे, त्याला कुठेतरी बाहेर सोड, येथे ठेवू नकोस. पण त्यावेळी धृतराष्ट्राने त्यांचे ऐकले नाही आणि पुढे खरचं दुर्योधनाने पूर्ण राज्याची हानी केली.

duryodhan and dushasan.marathipizza1
newhdwallpapers.in

दुर्योधनाचे खरे नाव सुयोधन हे होते. असे मानले जाते की, त्याच्या वाईट कर्मामुळे त्याचे नाव बदलले गेले. काही दंतकथेनुसार काही लोक मानतात की, दुर्योधनाने स्वतःचे नाव स्वतःच बदलले होते. सुयोधन या नावाचा अर्थ होतो, ‘खूपच भारी योद्धा’ आणि दुर्योधन या नावाचा अर्थ “असा कोणीतरी जो कधीही होऊ शकत नाही.” आता तुम्हाला समजले असेल की, त्याने त्याचे नाव का बदलले.

दुष्यासन हा दुर्योधनाचा धाकटा भाऊ होता आणि दुर्योधनाला आपला हा भाऊ खूप प्रिय होता. दुष्यासनाचे खरे नाव सुशासन होते. पण त्याने केलेल्या चुकांमुळे त्याचे नाव बदलून दुष्यासन करण्यात आले.

duryodhan and dushasan.marathipizza2
wikimedia.org

काही लोकांचे असे देखील मत आहे की, कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव यांच्यामध्ये झालेल्या युद्धादरम्यान जेव्हा भीमाने दुर्योधनाला, दुर्योधन म्हणून संबोधले होते, तेव्हा त्याला खूप राग आला आणि तो भीमाला म्हणाला,

मला दुर्योधन म्हणू नको, माझे नाव सुयोधन आहे.

दुर्योधनाला ‘काली’ नावाच्या राक्षसाचा अवतार मानले जाते. दुर्योधनावर त्याच्या शकुनीमामाचा खूप प्रभाव होता. तो शकुनीच होता, ज्याने दुर्योधनाला पांडवांबरोबर युद्ध करण्यास सांगितले होते.

अशी ही या दुर्योधन आणि दुष्यासन यांच्या नावामागची कथा आहे. संपूर्ण महाभारत घडण्यामागे ह्या दोन भावांची महत्त्वाची भूमिका होती आणि म्हणूनच महाभारतातील ही दोन पात्रे दुर्लक्षित न करता येण्यासारखी आहेत. 

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?