' भारतात येणाऱ्या शिंकासेन बुलेट ट्रेनची “ही” वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का ? – InMarathi

भारतात येणाऱ्या शिंकासेन बुलेट ट्रेनची “ही” वैशिष्ट्ये तुम्हाला माहिती आहेत का ?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लवकरच भारतामध्ये बुलेट ट्रेन येणार आहे, हे तर आपल्या सर्वांना माहित असेलच. भारतापेक्षा प्रगत असलेल्या देशांमध्ये ही बुलेट ट्रेन कधीच आलेली आहे. आता भारतामध्ये सगळीकडे या बुलेट ट्रेनची चर्चा सुरु आहे. मुंबई ते अहमदाबाद यांच्या दरम्यान ही बुलेट ट्रेन धावणार आहे आणि जवळपास ३६० मैलांचा हा प्रवास फक्त दोन तासांत पूर्ण होणार आहे. काहींना वाटते कि, हा निर्णय योग्य आहे तर काहींना अयोग्य वाटतो. असो हा ज्याच्या त्याच्या विचाराचा प्रश्न आहे. त्याबद्दल भाष्य न केलेलेच बरे. भारत जपानमधील शिंकासेन बुलेट ट्रेन आयात करणार आहे. त्यामुळे या दोन राष्ट्रांमधील संबंध अजून मजबूत होणार आहेत. ही शिंकासेन बुलेट ट्रेन सुरक्षित, विश्वसनीय आणि अप्रतिम डिझाईन यासाठी प्रसिद्ध आहे. चला तर मग जाणून घेऊया जपानमधील या शिंकासेन बुलेटबद्दल काही माहिती….

shinkasen bullet.marathipizza
i.ytimg.com

१. शिंकासेनची निर्मिती माजी जपानी प्रमुख रेल्वे अभियंता हिडीओ शिमा यांनी केली. त्यांना या ट्रेनमध्ये बसल्यावर विमानात बसल्यासारखे वाटावे अशाप्रकारचे डिझाईन बनवायचे होते. रेल्वेमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते नॅशनल स्पेस डेव्हलपमेंट ऑफ जपान यांचे मुख्य बनले.

२. जपानच्या सरकारने आणि रेल्वे कंपन्यांनी अमेरिकेला या बुलेट ट्रेन बनवण्याचे तंत्रज्ञान विकण्यास खूपवेळा नकार दिला आहे.  भारत हा शिंकासेन ही बुलेट आयात करणारा पहिला देश आहे.

३. मोदी सरकारने सांगितले की, या प्रकल्पामुळे भारतातील रोजगाराच्या संधी वाढतील. जवळपास २०,००० लोक या प्रकल्पाच्या बांधकामासाठी लागतील. ४००० प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी आणि २०,००० अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

shinkasen bullet.marathipizza1
thebetterindia.com

४. शिंकासेन ही ट्रेन खूप सुरक्षित आहे, जपानमध्ये या ट्रेनचा security service record खूप चांगला आहे. गेल्या ५० वर्षांचा इतिहास बघितल्यास चक्रीवादळ आणि भूकंप यामुळे कोणत्याही प्रवाश्याचा मृत्यू झालेला नाही.

५. यामध्ये असे तंत्रज्ञान आहे की, ही शिंकासेन बुलेट ट्रेन वाऱ्याच्या वेगाने पळू शकते. या बुलेट ट्रेनचा वेग ३२० किमी प्रती तास म्हणजेच २०० मैल प्रती तास एवढा आहे.

६. जपानमध्ये दिवसाला जवळपास ८०० शिंकासेन ट्रेन धावतात, मात्र ही ट्रेनची संख्या त्या – त्या दिवसावर अवलंबून असते.

shinkasen bullet.marathipizza2
india.com

७. जपानमध्ये शिंकासेन थेटर आहे, जिथे ट्रेन साफ करण्यासाठी सफाई कामगार असतात. हे कामगार ७ मिनिटांमध्ये संपूर्ण ट्रेन स्वच्छ करतात.

८. प्रवासी या ट्रेनमध्ये बाहेरील खाद्यपदार्थ आणि शीतपेये आणू शकतात आणि निसर्गाच्या सुंदर दृश्यासह त्यांचा आनंद उपभोगू शकतील.

९. जर प्रवासी शिंकासेनमधून प्रवास करत असतील आणि ट्रेन शिझूआकाच्या जवळपास असेल, तसेच वातावरण चांगले असेल तर या ट्रेनमधील प्रवासी जपानमधील माउंट फुजीचे दृश पाहू शकतात.

shinkasen bullet.marathipizza3
todayonline.com

१०. भारतामधील या बुलेट प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल कॉपोरेशनने ८० टक्के रक्कम दिली आहे. ते देखील फक्त ०.१ टक्के व्याज दराने आणि हा व्याजाचा दर देखील १५ वर्षाच्या नंतर लावण्यात येणार आहे.

अशी ही शिंकासेन आपल्या भारतासाठी किती उपयोगी पडते हे तर वेळच ठरवेल… 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?