हस्तमैथूनाच्या या फायद्यांची तुम्ही कल्पनाही केली नसेल !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

हस्तमैथुन आपल्या लैंगिक वासनेवर ताबा मिळवण्याचा एक उत्कृष्ट रस्ता आहे. हस्तमैथून ही एक अशी गोष्ट आहे ज्यावर आपण कधी मोकळंपणे बोलत नाही, ना कधी चर्चा करतो. अगदी गुपित आणि खाजगी असलेली ही गोष्ट कोणाला सांगायला देखील प्रचंड लाज वाटत असते. परंतु काही धक्कादायक रिपोर्ट्स सांगतात की ९५ टक्के पुरुष आणि ८९ टक्के महिला हे नेहमी हस्तमैथुन करत असतात.

हस्तमैथुनाने शरीरावर कुठलाच परिणाम होत नसतो. परंतु जर तुम्ही हस्तमैथुन मर्यादेच्या बाहेर करत असाल आणि तुम्हाला हस्तमैथुनाचं व्यसन लागलं असेल तर तुम्ही लैंगिक रोगतज्ञाचा सल्ला मात्र घेतला पाहिजे.

हस्तमैथुन नेहमी करत राहिल्याने जरी नुकसान होत असलं तरी त्याचे अनेक फायदे देखील आहेत, तर आपण आज हस्तमैथुनाचे ९ फायदे कोण कोणते आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.

 

benefits-of-masturbation-inmarathi
firpost.com

१) हस्तमैथुन हे लैंगिकतेच दर्शक आहे

जगभरातील हेल्थ रिपोर्ट्सचा अभ्यास केल्यावर माहिती मिळते की हस्तमैथुन लैंगिक तणाव नष्ट करायला मदत करते. हेल्थ प्रोफेशनल्सच्या माहिती नुसार आपल्या लैंगिक अवयवांना स्पर्श करणे ही खूप साधारण गोष्ट आहे. याला लैंगिकतेच दर्शन देखील म्हटलं जातं.

२) हस्तमैथुनाने आनंद मिळतो

पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये ऑर्गझम ( चरमानंद) जास्त गुंतागुंतीचा असतो. पुरुष सामान्यतः आपले स्पर्म निघाल्यावर आनंदी होतात. परंतु अपूर्ण उत्तेजन आणि चुकीचा पध्दतीमुळे महिलांमध्ये ऑर्गझम कमी असतो. वेळेआधी स्पर्म निघणे अथवा फोरप्ले मधील कमतरतेमुळे महिलांचा आनंद कमी होत असतो.

३) खूप अधिक हस्तमैथुन

हस्तमैथुन करायला कुठलीच ठराविक मर्यादा नाही. ते व्यक्ती व त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर अवलंबून असते की तो किती हस्तमैथुन करण्याची क्षमता बाळगतो. काही लोक रोज करतात, काही लोक आठवड्यातून, तर काही लोक महिन्यातून… परंतु डॉक्टरांच्या सांगण्यावरून आठवड्यातून तीन वेळा करण्यात काहीच हरकत नाही. फक्त प्रकृतीची काळजी घेतली गेली पाहिजे.

 

Masturbation-Myths-inmarathi
agoramedia.com

४) हस्तमैथुन नैसर्गिक आहे

हस्तमैथुन पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रजनन क्षमतेवर कुठलाच प्रभाव पडत नसतो. अशक्तपणा येणे अथवा लैंगिकतेत कमतरता ह्या पुर्णपणे अफवा आहेत. मांजर, कुत्रे आणि माकडं हे देखील हस्तमैथुन करतात !

५) हस्तमैथुनाने ताण नाहीसा होतो

हस्तमैथुन करताना हृदयाची गती वाढते, रक्ताभिसरण वाढते, मांसपेशी मजबूत होतात. या सर्व शारीरिक प्रक्रियेबरोबरच तणावातून देखील मुक्तता भेटत असते. जशी सेक्स केल्यानंतर मिळत असते.

 

musterbation-inmarathi
ongo5.com

६) हस्तमैथुन पूर्णपणे सुरक्षित आहे

आपल्या लैंगिकतेवर ताबा ठेवण्यासाठी हस्तमैथुन पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे.

७) लैंगिक विफलतेवर नियंत्रण :-

जर पुरुष अथवा महिला लैंगिक दृष्ट्या विफलतेने त्रस्त आहेत तर हस्तमैथुनाने या गोष्टी लवकर समजू शकतात. जर पुरुषात पहिलेच वीर्यपतन होत असेल तर हस्तमैथुन एका लर्निंग टूल सारखं कामात येऊ शकतं. यातून स्वतःवर नियंत्रण कसं मिळवायचं हे देखील शिकू शकतात.

 

musterbation-inmarathimusterbation-inmarathi
almanaquesos.com

८) हस्तमैथुनाने रात्री शांत झोप लागते

जेव्हा तुम्ही लैंगिकतेच्या परमोच्च ( क्लायमॅक्स) पातळीवर असतात आणि गुड झोन मध्ये प्रवेश करतात तेव्हा तुमचे सर्व हार्मोन्स निघून जातात. जेव्हा ऑक्सिटोसिंन आणि एन्डोर्फीन हार्मोन्स निघून जातात. तेव्हा आपल्याला वेगळाच आनंद जाणवत असतो. त्यानंतर तुम्ही कसलाही विचार न करता झोपी जातात. चांगली झोप सुदृढ शरीर व निरामय आरोग्यासाठी उपयुक्त ठरते. खूप थकवून टाकणाऱ्या दिवसानंतर हस्तमैथुन ही एक एक थकवा मिटवणारी व शांत झोप देणारी प्रक्रिया ठरते.

९) सकारात्मकतेत वाढ होते

जेव्हा आपण हस्तमैथुनाच्या क्लायमॅक्सला पोहचतो तेव्हा एन्डोर्फीन हार्मोन रिलीज होतात. यांमुळे ताण व बेचैनी निघून जाते व मनाला शांती मिळून सकारात्मकता वाढते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?