जर तुमच्यातही हे ८ गुण असतील तर समजा की तुम्ही बुद्धिमान आहात!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपण नेहमी बुद्धिमान लोकांबद्दल बोलताना त्यांची बुद्धिमत्ता, त्यांच्या सवयी, त्यांचे विचार यांबाबत बोलत असतो. आपण त्यांचे विचार आपल्या जीवनात अवलंबण्याचा प्रयत्न करत असतो. पण हे बुद्धिमान लोक देखील आपल्यासारखे सामान्य मनुष्यच असतात. फक्त त्यांच्यातील काही गुण त्यांना आपल्यापेक्षा अधिक बुद्धिमान बनवितात.

कधी तुम्ही विचार केला आहे का, की जर तुमच्याजवळ एका सामान्य व्यक्तीच्या तुलनेत जास्त बुद्धी असती तर? म्हणजे जर तुमची बुद्धिमत्ता एका साधारण व्यक्तीच्या तुलनेत जास्त असती तर? कधी तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेवर संशय आला आहे का? जर हे सर्व तुमच्यासोबत देखील घडले आहे तर तुम्ही खरंच बुद्धिमान आहात.

आता तुम्ही विचार करत असाल की, हे कसं शक्य आहे. तर हा लेख वाचल्यावर तुम्ही इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान आहात की नाही हे तुम्हाला कळेल.

स्वतःशीच बोलणे :

आपण अनेकदा स्वतःशीच बडबडत असतो. काही विषयांवर स्वतःशीच बोलत असतो. अश्या वेळी आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला वेड्यात काढतात. पण जे स्वतःशीच बोलतात ते लोक खूप बुद्धिमान असतात असे अनेकदा निरीक्षणात दिसून आले आहे.


 

Image result for talking to the mirror gif
जेव्हा आपण स्वतःशीच बोलतो तेव्हा त्यामुळे आपल्या विचारांना आधार मिळतो. ह्यामुळे आपण गोष्टींना अधिक चांगल्याने स्मरणात ठेवू शकतो. जर तुम्ही देखील स्वतःशीच बोलता तर तुम्ही वेडे नाही तर बुद्धिमान आहात.

जिज्ञासू असणे :

 

Image result for curious gif
बुद्धिमान लोकं इतरांपेक्षा जास्त जिज्ञासू असतात. ते त्यांच्या आसपासच्या लोकांबद्दल, वस्तूंबाबत अधिकाधिक जाणून घेण्यास उत्सुक असतात. त्यांच्या जिज्ञासा कधीही संपत नाही. त्यांना नवनवीन गोष्टी शोधायला नेहमी काहीतरी नवीन करत राहायला आवडते.

पुस्तकांची आवड :

 

Image result for book lover gif

जर तुम्हाला रात्री पुस्तकं वाचल्याशिवाय झोप येत नाही तर तुम्ही बुद्धिमान आहात हे समजायला काहीही हरकत नाही. ज्या लोकांना वाचनाची आवड असते ते इतरांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीबाबत माहिती असते. असे लोकं इतर कामात आपला वेळ खर्च न करता पुस्तकं वाचण्याला पसंती देतात.

चिंतीत असणे :

Intelligent
अनेक संशोधनात असे सिध्द झाले आहे की, जे लोक घाबरलेले किंवा चिंतीत असतात ते लोक अधिक बुद्धिमान असतात. असं ह्याकरिता कारण जे लोकं चिंतेत असतात ते समोर येणाऱ्या संभाव्य समस्येच्या समाधानाबाबत आधीच विचार करून ठेवतात.

अस्ताव्यस्त खोलीत काम करणे :

 

Image result for messy working plACE gif
बुद्धिमान लोकांची काम करण्याची जागा नेहमी अस्ताव्यस्त असते. कारण त्यांना अश्या स्थतीत काम करायला आवडत असते. अश्या स्थितीत त्याचं डोकं जास्त काम करतं. जर तुमची खोली देखल अशीच अस्ताव्यस्त असेल तर समजून जा की, तुम्ही देखील बुद्धिमान आहात.

रात्री उशिरापर्यंत काम करणे :

 

Image result for working at late night gif
वैज्ञानिकांच्या मते रात्री उशिरापर्यंत जागून काम करणारे लोकं इतरांच्या तुलनेत अधिक बुद्धिमान असतात. कारण साधारणपणे इतर कोणी असं रात्री जागून काम करूसशकत नाही. केवळ बुद्धिमान लोकच असं करू शकतात, ते नेहेमी त्यांच्या क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत असतात.

नवीन गोष्टी शिकायला आवडणे :

 

Image result for excited to do new things gif

बुद्धिमान लोकांना नवनवीन गोष्टी शिकायला मजा येते. म्हणून ते क्रियेटीव्ह असतात आणि त्यांना मानसिक आव्हाने स्वीकारण्यात जास्त रुची असते.

वस्तू विसरणे :

 

Related image
जर तुम्ही नेहेमी तुमच्या वस्तू किंवा कुठली गोष्ट विसरत असाल, तर तुम्ही बुद्धिमान आहात. कारण बुद्धिमान लोकांच्या डोक्यात एका वेळी अनेक विचार सुरु असतात म्हणून ते गोष्टी विसरतात.

विनोदी स्वभाव :

 

Image result for joking nature gif

एका रिसर्च नुसार बुद्धिमान लोकांचा सेन्स ऑफ ह्युमर अतिशय चांगला असतो. त्यामुळे ते अतिशय विनोदी असतात.

बुद्धिमान लोकांच्या बाबतीत नोंदवली गेलेली ही काही निरीक्षणे आहेत. पण एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे, माणसाचा बुध्यांक (Intelligence quotient) मोजण्याची एक ठराविक शास्त्रशुध्द पद्धत आहे. मानसशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात ती अंतर्भूत आहे. बुध्यांक मोजण्याची तीच योग्य पद्धत आहे. ही निरीक्षणे म्हणजे तुम्ही बुद्धिमान असण्याची काही लक्षणे आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *