शेरलॉक होम्स – पुन्हा एकदा, नव्या अवतारात !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

शेरलॉक होम्स!

1887 साली पहिल्यांदा अवतरलेलं हे पात्र एक शतकाहून अधिक काळ गेल्यानंतरसुद्धा कथा-कादंबऱ्या, चित्रपटांमधून आपल्यापर्यंत येत रहातं. सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ह्या काल्पनिक व्यक्तिरेखेवर “सर्वाधिक चित्रपटांमधून झळकण्याचा” गिनीज रेकॉर्ड आहे.

विशेष हे की – अजून ही त्यावरच्या कथा, चित्रपट लोकांना तेवढेच मनोरंजक वाटतात.

===
===

Sherlock holmes 00 marathipizza

स्त्रोत

२०१० साली आलेल्या BBC च्या Sherlock ह्या मालिकेने मात्र या ही पुढे जाऊन शेरलॉकला अगदी नव्या पद्धतीने – म्हणजे “आज”च्या काळात आणलं. प्रेक्षकांच्या नजरेत, Bennedict Cumberbatch च्या अभिनयातला contemporary शेरलॉक जुन्या victorian काळातल्या शेरलॉकपेक्षा अधिक सरस ठरला.

Sherlock holmes 01 marathipizza

स्त्रोत

अगदी पहिल्या एपिसोडपासूनच BBC ची ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरली. नव्या शेरलॉकचं “Science of Deduction” – तर्कशास्त्र आणि अगदी वेगवान, खिळवून ठेवणारी, विचारात पाडणारी पटकथा — हे सारं छान जुळवून आल्यामुळे प्रेक्षक पुन्हा आपल्या आवडत्या detective कडे वळले.

आता पर्यंत ह्या मालिकेचे 3 seasons येउन गेले आहेत. प्रत्येक भाग तेवढाच उत्कंठावर्धक असलेल्या तीनही season नंतर आता शेरलॉक fans आतुरतेने चौथ्या season ची वाट पाहत आहेत. 2016 च्या पहिल्याच दिवशी ह्या मालिकेचा विशेष भाग प्रदर्शित करण्यात आला.

===
===

“The Abominable Bride” नावाच्या ह्या विशेष भागामध्ये आपल्याला एकोणिसाव्या शतकातील शेरलॉक पहायला मिळाला आहे.

Sherlock: The Abominable Bride चं एक ट्रेलर :

विचारांना खाद्य शोधणाऱ्या, थरार पटांची आवड असणाऱ्या, cerebral ड्रामा आवडणाऱ्या प्रत्येकाने हा नवा शेरलॉक पहायलाच हवा. आतापर्यंत तुम्ही पहिला नसेल तर जरूर पहा…!

 

: नीरज कुलकर्णी 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 206 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?