' हजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर! – InMarathi

हजारो भारतीयांच्या मृत्यूला कारणीभूत विन्स्टन चर्चिल आणि हिटलर एकसारखेच- शशी थरूर!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

एडॉल्फ हिटलरची प्रतिमा आपल्या सर्वांच्या मनात एक वर्णभेदी, क्रूरकर्मा, हुकुमशहा, अति महत्वकांक्षी आणि असंख्य लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेला माणूस अशीच आहे. हिटलरला आदर्श मानणारे ह्या जगात फार थोडे लोक असतील पण यूनायटेड किंगडमचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे जगात बरेच लोकप्रिय आहेत. अनेक लोक त्यांनी वेळोवेळी बोललेली वाक्य सोशल मिडिया वर शेअर करत असतात. हिटलर बद्दल कोणीही चांगलं बोलायला धजावत नाही, पण चर्चिल बद्दल असे नाही. त्यांच्याविषयी फार कोणी वाईट बोलत नाही. पण शशी थरूर ह्यांच्या मते हिटलर इतकेच विन्स्टन चर्चिल सुद्धा मोठे गुन्हेगार आहेत. कारण ते सुद्धा अनेक लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत.

charuchil-hitler-marathipizza
gizmodo.com

थरूर ह्यांच्या मते

हिटलर प्रमाणेच चर्चिल सुद्धा क्रूरकर्माच आहे. जरी लोकांच्या मते आजही चर्चिल हिरो आहे तरीही सत्य मात्र हेच आहे की हिटलरने जो गुन्हा केला आहे तोच गुन्हा चर्चिलने सुद्धा केला आहे.

shashi-tharoor-marathipizza
independent.co.uk

थरूर ह्यांनी त्यांच्या शैली मध्ये ब्रिटीश राजवटीबद्दल अनेक धक्कादायक गोष्टी उघड केल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे कि

जसे हिटलरचे हात ज्यू लोकांच्या रक्ताने माखलेले होते तसेच चर्चिल हे हजारो भारतीय लोकांच्या मृत्यूला कारणीभूत आहेत. जेव्हा बंगाल मध्ये दुष्काळ उद्भवला होता तेव्हा चर्चिलने धान्य बंगालला न पाठवता इंग्लंडला पाठवले. बंगालमध्ये लोक दुष्काळाने मरत होते, पण तरीही चर्चिल ह्यांनी मुद्दाम धान्य बंगालमध्ये पोहोचू दिले नाही. चर्चिलने ऑस्ट्रेलिया येथून निघालेल्या धान्याच्या जहाजांना कोलकाता येथे धान्य उतरवण्याची परवानगी दिली नाही. (तेव्हा भारत ब्रिटीश राजवटीखाली होता.) त्या जहाजांना मुद्दाम त्याने इंग्लंडच्या दिशेने वळवले जेव्हा की त्या धान्यामुळे भुकेल्या भारतीय लोकांचा जीव वाचला असता. हे बघून जेव्हा विवेकबुद्धी जागृत असलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी चर्चिलला पत्र पाठवले तेव्हा त्याने थंड डोक्याने उत्तर देऊन शेवटी असे लिहिले कि ‘अजून गांधी का मरण पावले नाहीत?

india-starving-marathipizza
thedoctorssurgery.blogspot.in

थरूर ह्यांची इच्छा आहे कि लोकांना ब्रिटीश राजवटीच्या वेळी काय काय झाले हे सत्य कळावे. चर्चिल भारताबद्दल आणि भारतीयांबद्दल काय बोलायचे हे त्यांनी जगापुढे आणले आहे. चर्चिल म्हणायचे की

मी भारतीयांचा तिरस्कार करतो. ते जंगली आहेत आणि त्यांचा धर्म सुद्धा पशुतुल्य आहे. व्हाईसरॉय ह्यांना मोठ्या हत्तीवर बसवा आणि गांधींना धुळीत मिळवा. पायदळी येऊ द्या.

हे असे वाचल्यावर तुमच्या मनात नक्कीच चर्चिलविषयी राग आणि तिरस्कार निर्माण झाला असेल. शशी थरूर ह्यांचा प्रयत्न आहे की लोकांना भारतातील ब्रिटीश राजवटीविषयी सत्य समजावे आणि त्यांचे काही इंटरव्ह्यू वाचल्यावर लोकांना हे कळू लागले आहे की इंग्रज लोक हे भारतीयांना काय समजत होते आणि त्यांच्याशी कसे वागत होते. त्यांच्याविषयी काय विचार करीत होते! लोकांना हे लक्षात येऊ लागले आहे कि ब्रिटीश राजवटीचा काळ हा भारतासाठी नक्कीच चांगला नव्हता. उलट वाईटच होता.

charuchil-marathipizza
globalresearch.ca

ह्याशिवाय चर्चिल ह्यांनी त्यांच्या कार्यकाळात बऱ्याच अशा गोष्टी केल्यात ज्याने इतर राष्ट्रांचेही खूप नुकसान झाले.

उदाहरणार्थ,

दुसऱ्या महायुद्धात जपानचा सहभाग त्यांनीच करवला. कारण त्यांना ह्या युद्धामध्ये अमेरिकेचा सुद्धा समावेश करून घ्यायचा होता. युद्धात ब्रिटनला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी ही चाल खेळली. त्यांनी हे टाळले असते तर जगभरातील हजारो लोकांचा जीव वाचला असता. शिवाय पर्ल हार्बर च्या हल्ल्याविषयी आधी कल्पना असून सुद्धा त्यांनी अमेरिकेला ह्याची पूर्वकल्पना दिली नाही असे म्हणतात. असेही म्हणतात की भारतात हिंदू मुस्लीम तेढ निर्माण करून (फोडा आणि राज्य करा) भारतीयांवर राज्य करणे ही चर्चिल ह्यांच्याच सुपीक डोक्यातील कल्पना होती. ही तेढ निर्माण झाल्याने भारताचे अपरिमित नुकसान झाले आहे. तसेच १९४४ साली Palestine च्या फाळणीचा निर्णय UK War Cabinet ने घेतला तेव्हा चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान होते. ह्या निर्णयामुळे Palestine मध्ये अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले.

असेच अनेक निर्णय चर्चिल ह्यांनी घेतले ज्याचा परिणाम अनेकांना भोगावा लागला. म्हणूनच थरूर ह्यांचे म्हणणे आहे की ईतिहासात ज्यामुळे हिटलरला क्रूरकर्मा समजले जाते तोच गुन्हा चर्चिलने सुद्धा केला आहे. त्यामुळे ते धुतल्या तांदळाचे आहेत असे समजणे मूर्खपणाचे ठरेल.

charuchil-marathipizza01
ww2today.com

थरूर ह्यांचे बोलणे वाचून काही लोक म्हणतील की आता हे बोलण्यात आणि मागचे उगाळून काढण्यात काय हशील आहे? पण त्यावर शशी थरूर ह्यांचे म्हणणे आहे की

भूतकाळात काय काय सहन केले हे कळल्याशिवाय लोकांना आजच्या चांगल्या दिवसांची किंमत कशी कळणार?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?