' अविश्वसनीय ! ह्या फोटोग्राफरने चक्क मोबाईलने टिपले लग्नाचे अद्भुत क्षण! – InMarathi

अविश्वसनीय ! ह्या फोटोग्राफरने चक्क मोबाईलने टिपले लग्नाचे अद्भुत क्षण!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

लग्नामध्ये फोटोग्राफी हा एक अत्यंत महत्त्वाचा असा भाग असतो. नवरा नवरीच्या आयुष्यातील हा अनमोल क्षण टिपण्यासाठी फोटोग्राफर्सचा संपूर्ण लवाजमा असतो. विविध कॅमेरे, लेन्सेस आणि उपकरणांचा वापर करून हे फोटोग्राफर लग्नाच्या दिवसाच्या आठवणी साठवत असतात. पण इस्रायलचे फोटोग्राफर सेफी बर्गरसन यांनी कोणताही लवाजमा न वापरता केवळ एका फोनद्वारे संपूर्ण लग्नाची फोटोग्राफी करण्याची करामत केली आहे. त्यांनी iphone 6 चा वापर करून ही फोटोग्राफी केली. विशेष म्हणजे प्रोफेशनल कॅमेऱ्याच्या फोटोएवढेच सुंदर फोटो फोनद्वारे मिळवण्यात त्यांना यश आले.

sephi-bergerson-marathipizza01

सेफी बर्गरसन हे २००७ पासून भारतीय विवाह सोहळ्यांचे फोटो टिपत आहेत. काहीतरी वेगळे करायचे म्हणून नवरी आणि तिच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत फोनद्वारे सोहळा टिपण्याचा निर्णय घेतला. iPhone 6S Plus द्वारे त्यांनी संपूर्ण लग्नाचे फोटो काढले आणि ते एडीटही फोनवरच केले. उदयपूरच्या महालात हा विवाहसोहळा संपन्न झाला होता.

sephi-bergerson-marathipizza02

सेफी म्हणाले,

थेट एवढ्या मोठ्या सोहळ्यात मी हा धोका पत्करला होता, पण आयफोनवर हे शक्य होऊ शकते याचा मला विश्वास होता. स्पेशल लायटींग वापरण्याऐवजी मी नैसर्गिक लायटींग वापरण्यावरच अधिकाधिक भर दिला. केवळ काही ठिकाणी छोट्या एलईडी लाइटचा वापर केला. फोटोग्राफी ही एक भाषा आहे आणि फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही बोलता येते असे ते म्हणाले. या प्रयोगाचा रिझल्ट फारच उत्कृष्ट होता, माझे त्यासाठी भरपूर कौतुकही झाले. काढल्यानंतर काही क्षणांत फोटो शेअर करता येणे ही सर्वात चांगली बाब होती.

sephi-bergerson-marathipizza03

 

हे पहा अजून काही भन्नाट फोटोज…

sephi-bergerson-marathipizza04

 

विश्वास बसतच नाही ना..?

sephi-bergerson-marathipizza05

 

महागड्या कॅमेराची फोटोग्राफीही ह्यासमोर फिकी पडावी!

sephi-bergerson-marathipizza06

 

म्हणतात ना फोटो कॅमेऱ्याने नाही तर क्रियेटीव्हिटीने टिपले जातात.

sephi-bergerson-marathipizza07

 

इतकी भन्नाट फोटोग्राफी पाहून वाटतंय ना की आपण पण आपल्या कडच्या मोबाईलने हे एकदा ट्राय करून पाहिलं पाहिजे… चला तर मग चांगल्या कॅमेरा क्वालिटीचा फोन असेल तर नक्की प्रयत्न करून पहा…

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?