' अपघात होऊ नये म्हणून रेल्वेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात? जाणून घ्या! – InMarathi

अपघात होऊ नये म्हणून रेल्वेमार्फत कोणकोणत्या उपाययोजना केल्या जातात? जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात सहसा लोक रेल्वेनेच प्रवास करतात. रेल्वे मंत्रालयातर्फे लोकांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी प्रत्येक महत्वाचे पाऊल उचलले जाते. परंतु बऱ्याच वेळा काही संकटे ही अचानक निर्माण होतात. अश्या आपत्कालीन स्थितीमुळे संपूर्ण यंत्रणा ठप्प होते. गेल्या काही दिवसांत भारतात रेल्वे अपघाताच्या घटना खूप वाढल्या आहेत.

दर दिवसाआड एखादी तरी रेल्वे अपघाताची किंवा रेल्वे मार्ग बंद झाल्याची बातमी कानावर येतेच. मुंबई सारख्या शहरात तर लोकांना जणू याची सवयच झालीय.

अश्या या रेल्वे दुर्घटनांपासून बचाव व्हावा, म्हणून रेल्वे खाते काही उपाययोजना अंमलात आणते.

 

security of train.marathipizza
dubeat.com

रेल्वे मंत्रालयाने ह्या सुरक्षा उपायांना दोन भागांत विभागले आहे-

१) लोकोमोटिव्ह आणि रेल्वेशी निगडीत सुरक्षा उपाय

२) रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर जसे की रेल्वेरूळ, स्टेशन आणि सिग्नलशी निगडीत सुरक्षा उपाय

चला जाणून घेऊया भारतीय रेल्वे दुर्घटना रोखण्यासाठी काय-काय उपाय करते :

 

१) रेल्वे ब्रेक्स :

रेल्वे हे देखील एक प्रकारचे वाहनच आहे, त्यामुळे ब्रेक्स हे रेल्वे नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. तरीही ट्रेनची लांबी जास्त असल्याने ट्रेनच्या प्रत्येक चाकाला ब्रेकने थांबवणे ते देखील कमी वेळात… अतिशय कठीण असते. यातही एका सिस्टमची गरज असते जेणेकरून रेल्वे योग्य वेळात योग्य अंतरावर थांबेल आणि रुळांवरून घसरणार नाही.

रेल्वेचे ब्रेक्स हे डिफॉल्ट अवस्थेमध्ये असतात. जर कधी मशीन किंवा सिस्टम काम करण्यास सक्षम नसेल तर अश्यावेळेस ब्रेक स्वत: अॅक्टीव्ह होतात आणि रेल्वे स्वत:च थांबते. ट्रेनमधील सर्वात सुरक्षित ब्रेक असतात एयर ब्रेक जे हवेच्या सिद्धांतानुसार काम करतात.

 

security of train.marathipizza2
mapsofindia.com

२) चालकाचे सुरक्षा डिव्हाईस :

हे अतिशय जुने पण आजही वापरात येणारे डिव्हाईस आहे. यामध्ये एक पेडल असते ज्यावर पायाने सारखा दाब देऊन प्रेशर संतुलित ठेवण्यासाठी त्याला सारखे कार्यरत ठेवले जाते. जर समजा चालक झोपी गेला किंवा तो बेशुद्ध झाला तर अश्यावेळेस या डिव्हाईसच्या माध्यमातून आपत्कालीन ब्रेक्स ट्रेन थांबवू शकतात.

आहे की नाही अतिशय महत्त्वपूर्ण डिव्हाईस!

३) ऑटोमॅटिक ब्लॉक स्विचिंग :

ट्रॅक सर्किटिंगने सिग्नलच्या एका शृंखलेच्या सहाय्याने रेल्वेच्या लोकेशनची माहिती मिळवणे सोपे केले आहे. हे इलेक्ट्रिक सिग्नल आता प्रोग्राम डिव्हाईससाठी एका इनपुटच्या रुपात कार्य करण्यासाठी वापरले जातात, जे रेल्वेच्या संकेतांना नियंत्रित करतात.

४) इंटरलॉकिंग :

रेल्वे स्विचेसमध्ये जे पॉइंटस आणि क्रॉसिंग जोडलेले असतात, ज्यांच्या माध्यमातून ट्रेनच्या पटऱ्या जातात, ते बिंदू खूप महत्त्वाचे असतात. या बिंदूंमुळे कधी-कधी पटरीवरून ट्रेन उतरणे, यांसारखे अपघात होण्याची संभावना असते.

त्यामुळे या बिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करणे खूप गरजेचे असते. इंटरलॉकिंग सिस्टमच्या मदतीने सिग्नल आणि स्वीचला एका स्टिक सिंक्रोनाइजेशनमध्ये ऑपरेट केले जाते.

 

security of train.marathipizza1
media2.intoday.in

५ ) रेल्वेची टक्कर होण्यापासून वाचवणारी पद्धत (Train Collision Avoidance System) :

ही रेडीओवरून ऑपरेट करता येणारी प्रणाली आहे. जी प्रत्येकवेळी रेल्वेच्या हालचालींवर लक्ष ठेवते.

या प्रणालीचा उद्देश हा आहे की, जेव्हा रेल्वेला कोणत्याही संकटाचा सिग्नल मिळत असेल आणि चालकाला गती कमी करता येत नसेल, अशावेळी दुसऱ्या चालकाला संदेश देण्याचे काम ही प्रणाली करते.

रेल्वे सिस्टमच्या लोकोमोटीव्हच्या आतमध्ये डीएमआयच्या स्क्रीनवर देखील हा सिग्नल प्रदर्शित केला जातो.

६ ) केंद्रीकृत प्रभाव निरीक्षण प्रणाली :

रेल्वे व्हील इंपॅक्ट लोड डिटेक्टर, रोलिंग स्टॉक सिस्टम आणि केंद्रीकृत प्रभाव निरीक्षण प्रणाली (Centralized Bearing Monitoring System) ऑनलाइन लक्ष ठेवण्यासाठी स्थापित करण्याची योजना सुरू आहे.

७ ) पॉवर ब्रेक नियंत्रक :

हे एक असे उपकरण आहे, जे रेल्वेच्या एक्सीलेटर आणि ब्रेकवर एकाचवेळी नियंत्रण ठेवते, याच्यामुळे चालक एकाचवेळी रेल्वेचा वेग वाढवू शकत नाही किंवा लगेचच ब्रेक दाबून रेल्वे थांबवू शकत नाही.

जर गार्डद्वारे किंवा प्रवाश्याने चैन खेचल्याने ब्रेक लागला असेल किंवा आपत्कालीन ब्रेक लावण्यात आलेला असेल, तर रेल्वे स्वतःच थांबेल आणि तिचा वेग वाढणार नाही. या सर्व प्रणालीला पॉवर ब्रेक नियंत्रक चालवत असते.

security of train.marathipizza3
engineeringexpert.net

अश्या ह्या रेल्वेच्या उपाययोजना खूप महत्त्वाच्या आहेत आणि संकटाच्या वेळी जर यांचा योग्यप्रकारे वापर करण्यात आला तर रेल्वे अपघात रोखले जाऊ शकतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?