' रशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा ! – InMarathi

रशियाने लॉन्च केलाय ‘मयाक’ – जगातील पहिला कृत्रिम तारा !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही आर्टिफिशियल अर्थात कृत्रिम सॅटेलाईट बद्दल ऐकले असेलच, परंतु आता तुम्हाला आर्टिफिशियल तारा देखील पाहायला मिळणार आहे. अहो खरंच ही कोणतीही अफवा नाही. रशियाने Baikonur स्पेसपोर्ट मधून Soyuz 2.1a रॉकेटच्या सहाय्याने जगातील पहिला नकली तारा ‘Mayak’ अवकाशात लॉन्च केला. हा तारा सध्या पृथ्वीच्या भ्रमणकक्षेत पोचला असून त्याला असलेले Sun Reflector देखील उघडले गेले आहेत. मॉस्कोच्या University of Mechanical Engineering मधील विद्यार्थ्यांनी हा कृत्रिम तारा बनवून जगामध्ये धुमाकूळ घातला आहे.

project-mayak-marathipizza01
हा तारा बनवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मते हा अवकाशातील सर्वात जास्त प्रकाशित तारा आहे. मुख्य म्हणजे पृथ्वीच्या कोणत्याही भागातून आपल्याला हा तारा पाहता येणार आहे.

पिरॅमिड सारख्या आकाराचा हा तारा म्हणजे २८,९०० फुट मोठा एक  रिफ्लेक्टर आहे. ज्या पॉलीमर फिल्म पासून हा तर निर्माण करण्यात आला आहे ती फिल्म आपल्या केसांपेक्षा २० पट जास्त पातळ आहे हे विशेष!

project-mayak-marathipizza02
या प्रोजेक्टचा लीडर Alexander Shaenko याने या संदर्भात माहिती देताना सांगितले की,

हा कृत्रिम तारा बनवण्यामागे दोन कारणे होती. एक म्हणजे पॅराशूट सारखे असणारे या ताऱ्याचे डिजाईन केवळ दिखाव्यासाठी नसून ते अवकाशातील सर्व कचरा स्वत:कडे खेचून घेईल आणि तो जाळून नष्ट करेल. दुसरे कारण म्हणजे रशियामधील विज्ञान संशोधनाला चालना देण. हे अनोखे संशोधन रशियातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल याची आम्हाला खात्री आहे.

project-mayak-marathipizza06

या कृत्रिम ताऱ्याच्या निर्मितीसाठी आणि लॉन्चसाठी तब्बल २०,००० डॉलर अर्थात १२,८८,००० रुपये इतका खर्च आला आहे. हा सगळा खर्च विद्यार्थ्यांनी क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून उभा केला. सध्या ह्या ताऱ्याचे स्थान नेमके कुठे आहे हे समजणे शक्य नाही, पण लवकरच या ताऱ्याचे आयओएस आणि अॅण्ड्रोईड अॅप सदर करण्यात येणार आहे. ज्या माध्यमातून कोणीही व्यक्ती हा तारा नेमका कोणत्या स्थानी आहे ते पाहू शकतो.

project-mayak-marathipizza04
संपूर्ण रशियाभर या Project Mayak चे कौतुक होत असले तरी जगातील काही प्रसिद्ध शास्त्रज्ञांनी मात्र हा प्रोजेक्ट आणि तर निरुपयोगी अल्स्ल्याचे मत व्यक्त केले आहे.

project-mayak-marathipizza05

काहीही असो, पण या प्रोजेक्टमुळे पुन्हा एकदा रशियाच्या वैज्ञानिक दृष्ट्या विकसित होत चाललेल्या तरुण पिढीचे कौशल्य पुन्हा एकदा जगासमोर आले.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?