' जगातील सर्वात वादग्रस्त आणि क्रूर परंपरा: स्पेनमधील ‘रनिंग ऑफ द बुल’ उत्सव! – InMarathi

जगातील सर्वात वादग्रस्त आणि क्रूर परंपरा: स्पेनमधील ‘रनिंग ऑफ द बुल’ उत्सव!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

अनेक दशकांपासून प्रत्येक जुलै महिन्यात उत्तर स्पेनमधील पॅम्पालोनाच्या रस्त्यांवर असंख्य बैल अतिशय वेगाने, वाटेत येईल त्या गोष्टीला धडक मारून नुसते पळत असतात. कारण असते नवार्रा या लहान शहराचे आश्रयदाते म्हणून ज्यांना ओळखले जाते त्या सेंट फेर्मिन यांच्या स्मरणार्थ स्पेनच्या रस्त्यांवर आयोजित करण्यात येणाऱ्या रनिंग ऑफ द बुल या साहसी उत्सवाचे! जगातील सर्वात वादग्रस्त उत्सव म्हणून या रनिंग ऑफ बुल्स परंपरेकडे पाहिले जाते.  हा उत्सव याची डोळा याची देही पाहण्यासाठी किंवा त्यात सहभागी होण्यासाठी दरवर्षी जगभरातून हजारोंच्या संख्येने पर्यटक स्पेनमध्ये हजेरी लावतात.

सेंट फेर्मिन यांच्या स्मरणार्थ स्पेनमध्ये दरवर्षी ६ जुलै ते १४ जुलै या काळात एक सोहळा साजरा केला जातो आणि त्या दरम्यानच ७ जुलै पासून रनिंग ऑफ द बुल या उत्सवाला सुरुवात होते. १४ व्या शतकापासून स्पेनमध्ये हा उत्सव साजरा केला जातो असे म्हणतात. पण या उत्सवाला जगभर खरी ओळख मिळवून दिली ती हर्नेस्ट हेमिंगवेज यांच्या १९२६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘सन अल्सो राईजेस ‘ कादंबरीने!

bull-running-festival-marathipizza02

स्रोत

पॅम्पालोनाच्या रस्त्यावर जगभरातून आलेले साहसी पर्यटक चवताळलेल्या बैलांच्या पुढे अगदी अक्षरश: वाट मिळेल तिकडे पळत सुटतात आणि प्रेक्षक बाल्कनीमध्ये उभे राहून, जोरजोराने प्रोत्साहन देत सहभागी झालेल्यांची धावपळ, धांदल, आणि बैलाने धडक मारू नये यासाठी चाललेली कसरत पाहत या अनोख्या शर्यतीचा आनंद लुटत असतात.

स्पॅनिश आणि बास्क्यू भाषेमध्ये तीन वेळा सेंट फेर्मिन यांचे गुणगान गायल्यावर आणि त्यांचे आशीर्वाद घेतल्यावर या शर्यतीला उत्सवाला सुरुवात होते. या शर्यतीमध्ये सह्भागी होणाऱ्या स्पर्धकांना पांढरा शर्ट आणि पॅन्ट तसेच मनगटावर लाल रंगाचा बॅन्ड आणि तोंडाला लाल रंगाचा स्कार्फ असा पारंपारिक वेश परिधान करावा लागतो. सकाळी ८ च्या सुमारास आकाशामध्ये एक रॉकेट सोडून असे सूचित करण्यात येते की बैलांचा गेट उघडण्यात आला आहे. दुसरे रॉकेट सोडण्यापूर्वी बैलांना गेटबाहेर पिटाळण्यात येतं आणि समोरून धावत येणारे धष्टपुष्ट आणि चवताळलेले बैल पाहताच सहभागी स्पर्धक धावत सुटल्यावर शर्यत वेग घेते. ही शर्यत अगदी काही मिनिटांचीचं असते. शहराच्या जुन्या चार रस्त्यांवरून धावत आखाड्यात (बुलरिंग) मध्ये येऊन संपते.

bull-running-festival-marathipizza03

स्रोत

या सोहळ्या दरम्यान वर्षाला डझनभर स्पर्धक हमखास जखमी होतात. बरेच जण घाबरून पायात पाय अडकून पडतात. तर अनेक जणांना बैलाची जोरदार धडक सहन करावी लागते. ही धडक बसली की आठवडाभर हॉस्पिटल निश्चित! नोंदीनुसार १९२४ सालापासून १५ स्पर्धक शर्यतीदरम्यान मृत्यू पावले आहेत.

हा सोहळा म्हणजे स्पेनमधील पर्यटनाचं प्रमुख आकर्षण असलं आणि त्यामुळे सरकारला उत्तम महसूल मिळत असला तरी प्राणी अधिकार संघटनांनी मात्र या सोहळ्याला विरोध दर्शवला होता आणि त्याविरोधात त्यांची लढाई आजही सुरु आहे.

पेटाच्या म्हणण्यानुसार,

शर्यती दरम्यान बैलांना चिथावण्यासाठी विजेचे झटके दिले जातात, त्यांच्या शरीरामध्ये अणूकुचीदार काठ्या घुसवल्या जातात. कधीकधी गोंधळामुळे आणि अडथळ्यांमुळे परिणामी बैल गोंधळतात आणि घसरून पडतात किंवा रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या वस्तूला आपटून जखमी होतात.

bull-running-festival-marathipizza04

स्रोत

बरं ही क्रूरता इथेच संपत नाही तर आखाड्यामध्ये (बुलरिंग) गेल्यावर बैलांचा अजूनच छळ केला जातो. आखाड्यामध्ये एकाच बैलावर असंख्य लोक एकाचवेळी तुटून पडतात. त्या बैलाला जखमी करतात, त्याच्यावर वार करतात आणि त्याला डिवचतात. जवळपास १५ मिनिटे त्या मुक्या प्राण्याला या नरकयातना सहन कराव्या लागतात.

bull-running-festival-marathipizza05

स्रोत

त्यानंतर बुल फायटर पुढे येतो आणि हातातील तलवारीने त्या थकलेल्या बैलाच्या शरीराला भोसकतो. त्या बैलाचे किंचाळणे आणि आर्त हाका ऐकूनही या लोकांन अजिबात दया येत नाही आणि त्यावर अधिक अत्याचार करीत ते आसुरी आनंद उपभोगत असतात.

bull-running-festival-marathipizza06

स्रोत

कधी कधी बुल फायटरचा वार चुकीच्या ठिकाणी बसल्यास बैलाला आपले प्राणही गमवावे लागतात.

bull-running-festival-marathipizza07

स्रोत

एका प्राणी अधिकार कार्यकर्त्याने या उत्सवावर टिप्पणी करता म्हटले आहे की,

जोवर या परंपरेमुळे भविष्यात एखादी अतिशय दुर्दैवी घटना घडणार नाही किंवा बैलांतर्फे इतिहासातील सर्वात मोठा मानवी रक्तपात होणार नाही तोवर या उत्सवाचे समर्थन करणाऱ्या अमानुष प्रवृत्तींना जाग येणार नाही. तो दिवस कधी न येवो. त्यापूर्वीच या सर्वांच्या अक्कला ठिकाणावर येतील अशी आशा आहे.

bull-running-festival-marathipizza01

स्रोत

इतकं असूनही वर्षागणिक या उत्सवाची ख्याती वाढतच आहे!!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 36 posts and counting.See all posts by vishal

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?