' माणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला! – InMarathi

माणसाऐवजी टेक्नोलॉजीवर विश्वास ठेवला आणि सरळ नदीत जाऊन कोसळला!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

एखादे तंत्रज्ञान वापरताना अनेक अफलातून गमतीजमती घडताना आपण अनुभवल्या असतील. सोशल मिडीयावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. अशीच एक विचित्र घटना घडली आणि त्या घटनेचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतो आहे.

 

map-technology-inmarathi
fm.cnbc.com

तारा ग्वेरटीन नावाच्या व्यक्तीला रस्ता माहित नव्हता म्हणून तो जीपीएसची मदत घेत अमेरिका नॉर्थईस्ट स्टेट ऑफ वरमॉन्ट येथे आपल्या एसयुव्ही कार ने जात होता. एका ठिकाणी त्याने जीपीएसचे इंस्ट्रक्टशन्स ऐकून गाडी समोर नेली तर बघतो तर काय, ती गाडी थेट नदीत गेली.

ही घटना सोशल मिडीयावर ह्याचा व्हिडिओ वायरल झाल्यावर कळली. ही घटना १२ जानेवारीला घडली होती

 

कार चालक त्या परिसरातील नसल्यामुळे त्याला तेथील रस्त्यांची माहिती नव्हती. त्याने ती कार देखील भाड्याने घेतली होती. चालकाच्या मते तो जीपीएसच्या मदतीने गाडी चालवत होता.

एका ठिकाणी जीपीएसने त्याला सरळ जाण्याचे नोर्देश दिले, पण जेव्हा त्याने गाडी सरळ दिशेने नेली तर त्याची गाडी बर्फाने गोठलेल्या नदीत गेली.

 

nevigation-inmarathi
imore.com

ह्या घटनेनंतर चालकाने नॅव्हिगेशन अॅप विरोधात तक्रार दाखल केली. त्यांची तक्रार घेणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते चालकाने कुठल्याही प्रकारचे मद्यपान न केल्याच तपासात कळाले आहे.

ग्वेरटिन सांगतात की,

“जेव्हा ही घटना घडली तेव्हा खूप पाऊस होता आणि धुक देखील होतं. त्यामुळे त्यांना रस्ता दिसत नव्हता. म्हणून ते गुगल जीपीएस जसं सांगेल त्या दिशेने गाडी नेत होते. अश्यात जीपीएसने त्यांना चुकीची माहिती दिली आणि त्यांची गाडी नदीत उतरली. नंतर कारच्या बम्पर मुळे त्यांना लोकांनी पाहिले.”

आधी त्यांना काही कळालेच नाही. ते तेव्हापर्यंत काही बोलू शकले नाही जेव्हापर्यंत त्यांना त्यांच्या कारमध्ये असणारे सर्व लोकं सुखरूप आहेत ह्याची खात्री पटली नाही.

पण नशीबच म्हणावं की ह्या अपघातात कुणाचेही काही नुकसान झाले नाही.

 

car-map-inmarathi
googleusercontent.com

ह्याबाबत गुगलने सांगितले की,

“ते ह्याचा तपास नक्की लावतील की जीपीएसने अशी चूक कशी केली. पण त्यांनी हे देखील सांगितले की, वेज मॅप लाखो एडिट नंतर रोज अपडेट केला जातो. त्याच्याजवळ प्रत्येक गोष्टीशी माहिती असते.”

तसेच त्यांनी चालकांना खबरदार राहण्याचा सल्ला देखील दिला. त्यांनी सांगितले की, गाडी चालवताना नेहेमी रस्त्यावर नजर ठेवा आणि वातावरणाची माहिती देखील घेत राहा, जेणेकरून अपघात टाळता येतील.

एखाद्या तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यावर पूर्णतः अवलंबून राहणे कितपत योग्य आहे हे या अपघातावरून लक्षात आले आहे. मानवी शक्तीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी करणे तंत्रामुळे शक्य होत असले तरी त्याचा अनिर्बंध आणि अविवेकी वापर आत्मघातकी ठरू शकतो हे समजून घ्यायला हवे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?