' पुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार – InMarathi

पुणे: जगातील पाहिलं “गुगल स्टेशन” – २०० ठिकाणी वायफाय हॉटस्पॉट सुरू होणार

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

स्मार्ट शहरांच्या यादीत नाव पटकावलेल्या पुण्याकडे आता गुगल ची नजर वळली आहे. भारताच्या आर्थिक राजधानी मुंबईपासून १५० किमी अंतरावर असलेल्या ह्या सांस्कृतिक राजधानीची झपाट्याने होत असलेली वाढ उद्योगाला आकर्षित करत आहे. गुगल ने जगभरातल्या अनेक शहरांपैकी भारतातल्या आपल्या पुण्यात गुगल स्टेशन उभं करायचं असं ठरवलंय…!

google station marathipizza

नुकतंच गुगल ने Larsen & Toubro (L&T) कडुन पुण्याला वायफाय सिटी बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळवलं आहे. IBM, Larsen & Toubro (L&T) and RailTel ह्या कंपन्यांना सोबत घेऊन गुगल ने हे १५० कोटींचं कॉन्ट्रॅक्ट खिशात टाकलं आहे. ह्या अंतर्गत संपुर्ण पुण्याला जलदगती इंटरनेट आणि त्यासोबतच काही आधुनिक प्रणाली पुरवण्याचा बेत आहे. आयुक्तांच्या मते ह्या प्रकल्पातून होणाऱ्या नफ्यात २० ते ३०% वाटा सरकारी यंत्रणेचा असणार आहे.

launching of google station marathipizza

Larsen & Toubro (L&T) ही कंपनी पुण्याचा स्मार्ट सिटी मध्ये कायापालट करण्यात एका lead Integrator ची भूमिका बजावत आहे. सोबतीने गुगल आणि IBM तांत्रिकदृष्ट्या ह्या प्रकल्पाला बळ देणार आहेत.

१५० कोटींच्या ह्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये गुगल पुण्यात आपलं स्वतःचं असं गुगल स्टेशन सुरु करणार आहे. ह्याच प्रकल्पाचा भाग म्हणून गुगल पुण्यातल्या काही मोजक्याच २०० सार्वजनिक ठिकाणी वायफाय स्पॉट्स सोडणार आहे. ह्या २०० जागांवर पोहोचण्यासाठी RailTel कंपनी केबल सुविधा पुरवणार आहे. मॉल्स, सभागृहं, स्थानकं ह्यांसारख्या सार्वजनिक जागांचा ह्यात समावेश असेल. ह्या सगळ्या जागांना एकाच प्लॅटफॉर्म वर उत्तम प्रतीची इंटरनेट सर्व्हिस देणे गुगल स्टेशन चे लक्ष्य असेल.

google station marathipizza

गुगलकडून मिळालेल्या माहिती नुसार

झपाट्याने वाढत चाललेल्या इंटरनेटच्या वापरामुळे लाखो नवीन वापरकर्त्यांना सोयीचं इंटरनेट वापरता यावं हा त्यामागचा हेतू आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वायफाय हॉटस्पॉटमुळे इंटरनेट वापरणाऱ्यांना एक नवीन आणि आधीपेक्षा चांगला अनुभव नक्कीच वाट्याला येणार आहे.

स्वतःहून गुंतवणूक न करता गुगल स्थानिक डिलर्सशी पार्टनरशिप करणार आहे. केबल्स, नेटवर्क ऑपरेटर ह्यांना सोबत घेऊन गुगल स्टेशन उभारणार आहे. हल्लीच केंद्र सरकारच्या रेल्वे स्थानकांवर वायफाय बसवण्याच्या कामात गुगल आणि RailTel कंपनीने भारतीय रेल्वेसोबत काम करत आहेत. देशभरातील रेल्वेच्या ४०० स्थानकांपैकी पैकी १०० स्थानकांवर वायफाय पुरवण्याचं काम पूर्ण झालं आहे.

India_Google_marathipizza

Source

Larsen & Toubro (L&T) च्या राममुर्तींनी Economic Times ला दिलेल्या माहितीनुसार

स्थानिक इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर, वायफाय कंपनीज आणि सरकारी कार्यालयांना जलदगती इंटरनेट पुरवण्यासाठी गुगल स्टेशनची मदत होणार आहे. इंटरनेट हॉटस्पॉट सोबतंच गुगल स्टेशन emergency call बूथ, पत्ता शोधणे सोपे होण्यासाठी अद्ययावत प्रणाली, पर्यावरणाबद्दलची माहिती मिळण्यासाठी सेन्सर्स आणि जाहिरातींसाठी डिजिटल बोर्ड्स ह्यासारख्या आधुनिक सुविधा सुद्धा पुरवणार आहे.

गुगलनंतर IBM चा वाटा मोठा आहे. IBM ने केलेल्या स्मार्ट सिटी सोल्युशन ची मदत हि पुणे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कणा असुन IBM संपूर्ण शहराचा कारभार एकाच प्लॅटफॉर्म वरून करता यावा ह्यासाठीसुद्धा मदत करत आहे. एकूणच पुण्याला पडलेलं स्मार्ट सिटीचं स्वप्नं सत्यात उतरू लागलंय.

पुणे स्मार्ट सिटी होत आहे मित्रांनो…आहात कुठे!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?