' इच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत ? जाणून घ्या.. – InMarathi

इच्छा मृत्यूवर इतर देशांमध्ये काय कायदे आहेत ? जाणून घ्या..

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

नुकतीच सर्वोच्च न्यायायलाने इच्छा मरणाला परवानगी दिली आहे.  सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे की, प्रत्येकाला प्रतिष्ठेने मारण्याचा अधिकार आहे. न्यायालयाने यासाठी ‘पॅसिव्ह युथेनियम’ या शब्दाचा वापर केला आहे. याचा असा अर्थ होतो की, कोणत्याही आजारी माणसाचे मेडिकल उपचार थांबवणे, जेणेकरून त्याचा मृत्यू होईल. न्यायालयाच्या या आदेशामुळे असहनीय आजाराशी लढणाऱ्या रुग्णांना मदत मिळेल आणि त्यांना या वेदनेमधून मुक्ती मिळेल.

 

Death of desire.inmarathi
bhaskar.com

याचिका सादर करणाऱ्यांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले. त्यांचे म्हणणे आहे की, कृत्रिम साधनांचा वापर करून रुग्णाला जिवंत ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये फक्त रुग्णालयांना पैसे कमावण्याचे एक साधन मिळते आणि ते त्यातील आपला नफा काढू पाहत असतात. त्यामुळे ज्या माणसाची जगण्याची काहीही शाश्वती नसते, अशा रुग्णाला देखील व्हेंटिलेटरवर ठेवून त्याच्या कुटुंबियांकडून पैसे काढले जातात. पण या विषयीचे नियम अजूनही पूर्णपणे अस्पष्ट आहेत.

पॅसिव्ह युथेनियम म्हणजे काय ?

पॅसिव्ह युथेनियम ही  स्थिती असते, जेव्हा डॉक्टर एखाद्या गंभीर आजाराशी लढणाऱ्या रुग्णाचा मेडिकल उपचार करणे बंद करतात आणि त्याला मरू देतात. यामध्ये रुग्णाची लाईफ सपोर्ट मशीन काढून टाकणे, खाण्याची ट्यूब हटवणे, कोणत्याही प्रकारचे खास ऑपरेशन न करणे आणि गरजेची असलेली औषधे देखील बंद करून टाकणे. यांचा समावेश आहे.

 

Death of desire.inmarathi1
veja.abril.com

कोणत्या ठिकाणी इच्छा मरणाला परवानगी आहे ?

ब्रिटेन बरोबरच युरोपचे कितीतरी मोठे देश इच्छा मृत्यूला आजही हत्या मानतात. पण नेदरलँड, बेल्जीयम, कोलंबिया आणि पश्चिमी युरोपच्या लक्झमबर्गमध्ये इच्छा मृत्यूला परवानगी आहे.

स्वित्झर्लंडमध्ये याला असिस्टेड सुसाईड म्हटले जाते. यामध्ये एक व्यक्ती कायदेशीर संमतीच्या मदतीने एखाद्या अन्य व्यक्तीला आत्महत्या करण्यासाठी मदत करू शकते. पण मदत करणाऱ्या त्या व्यक्तीला हे लिहून देणे गरजेचे असते की, यामध्ये त्याचा कोणताही फायदा नाही आहे.

 

Death of desire.inmarathi2
veja.abril.com

वर्ष २०१५ मध्ये अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्याने देखील वॉशिंग्टन, ओरेगन, मोन्टाना आणि वेरमॉन्ट राज्यांसारखेच इच्छा मृत्यूला परवानगी दिली होती.

खूप वर्षांच्या वादानंतर कॅनडामध्ये देखील २०१६ मध्ये इच्छा मृत्यूला परवानगी दिली.

ब्रिटेन, नॉर्वे, स्पेन, रशिया, चीन, फ्रान्स आणि इटली यांसारख्या कितीतरी मोठ्या देशांमध्ये आजही या विषयाला धरून कितीतरी वाद अजूनही चालू आहेत आणि या ठिकाणांवर सध्या इच्छा मृत्यू ही  बेकायदेशीर किंवा सशर्त दिली जाते.

इच्छा मृत्यू हा कोणासाठी असतो ?

रुग्णाला जेव्हा त्याच्या आजाराच्या वेदना असहनीय होतात, तेव्हाच तो रुग्ण इच्छा मृत्यूची मागणी करू शकतो. ज्या देशांमध्ये इच्छा मृत्यू हे कायदेशीर बरोबर आहे, त्यामध्ये जास्त करून या नियमांचे पालन केले जाते. नेदरलँडमध्ये हे पाहिले जाते की, रुग्णाचा आजार शान न होणार आहे की नाही आणि त्याच्यामध्ये सुधारणा होण्याच्या किती संभावना आहेत.

 

Death of desire.inmarathi3
bbc.com

बेल्जीयमचा कायदा देखील याच्याशी काहीसा मिळता – जुळता आहे. येथे देखील रुग्णाचा आजार हा त्याला सहन न होणारा पाहिजे आणि त्याला सारख्या या त्याच्या आजारामुळे वेदना सहन कराव्या लागल्या पाहिजेत, तेव्हाच त्याच्या इच्छा मृत्यूच्या विनंतीला स्वीकार करण्यात येते.

अमेरिका आणि कॅनडामध्ये रुग्णाला इच्छा मृत्यूसाठी मदत तेव्हाच केली जाते, जेव्हा त्याला जडलेला तो आजार त्याला सहन होत नसेल, उपचारांनी त्याला चांगले करणे शक्य नसेल आणि त्याला त्यामुळे सारख्या वेदना सहन कराव्या लागत असतील.

 

Death of desire.inmarathi4

viral.khaasre.comया देशांमध्ये कसा बदलला कायदा ?

कोलंबिया, मोन्टाना आणि कॅनडाच्या न्यायालयाने मानवाधिकाराच्या दाव्याना लक्षात घेत कायद्यामध्ये बदल केले आणि इच्छा  मृत्यूला परवानगी दिली. बेल्जीयम, क्यूबेक आणि वेरमॉन्टमध्ये विधायिकेने  या कायद्याला बदलले. ओरेगन आणि वॉशिंग्टनमध्ये याच्याशी निगडित तेव्हा कायदा बनवायला लागला, जेव्हा खूप मोठ्या संख्येने या गोष्टीला पाठिंबा देत वोट मिळाले.

इच्छा मृत्यूची विनंती कशी केली जाते ?

ज्या देशांमध्ये इच्छा मृत्यूला परवानगी दिली आहे, त्या सर्व देशांमध्ये रुग्णाला एक लिखित विनंतीपत्र करणे आवश्यक असते. या विनंतीपत्रातून हे सुनिश्चित होते की, रुग्णाला याविषयी पूर्ण माहिती आहे आणि त्याच्या कुटुंबातील लोकांना देखील याची पूर्ण माहिती आहे की, ते काय करायला चालले आहेत. अमेरिकेमध्ये इच्छा मृत्यूच्या विनंती पत्राबरोबरच दोन साक्षीदार देखील सादर करावे लागतात.

 

Death of desire.inmarathi5
ledevoir.com

काय असावे वय ?

फक्त नेदरलँड आणि बेल्जीयममध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या रुग्णांना इच्छा मृत्यूची विनंती करण्याची परवानगी आहे. जर १६ ते १८ वर्षांमधील कोणता रुग्ण इच्छा मृत्यूची विनंती करत असेल, तर रुग्णाच्या आई – वडिलांना देखील यामध्ये कोणत्याही प्रकारची रोकटोक करण्याची परवानगी नाही. पण बेल्जीयममध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाचा रुग्ण आई – वडिलांच्या परवानगीने विनंती करू शकतो.

ज्या देशांमध्ये इच्छा मृत्यू कायद्याने योग्य आहे, त्यामधील जास्तकरून देशांमध्ये १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या रुग्णांना विनंती करण्याची परवानगी नाही आहे. जास्तकरून देशांमध्ये काही मानसिक आजारांशी लढत असलेल्या रुग्णांच्या इच्छा मृत्यूच्या अर्जाला स्वीकारले जात नाही.

अशाप्रकारे भारताप्रमाणेच इतर देशांमध्ये देखील इच्छा मृत्यूला वेगवेगळ्या अटींच्या आधारावर परवानगी दिली गेली आहे आणि त्याबद्दल वेगवेगळ्या नियम देखील बनवण्यात आलेले आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?