हे ५ प्रोब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात

“काय रे विजयदादा, कसल्या टेंशनमध्ये आहेस??”

“काही नाही रे, जरा जॉबचं टेंशन होतं.”

“श्या ऽऽऽ काहीपण हा! नोकरी म्हटलं की कसं ८ तास काम मग आराम.  आरामाचं कुठं टेंशन येतं होय???”

सर्वसाधारणपणे सगळ्यांचंच असं मत असतं नोकरीबद्द‍ल ( नोकरीला लागण्याआधी ), पण आपल्याला जसं वाटतं तसं खरंच असतं का हो?  नोकरीमध्ये काहीच त्रास नसतो का? कुठल्याच समस्या नसतात का?

जर नवीन जॉब जॉईन करत असालं तर ह्या ६ गोष्टी नक्की करा!!

उत्तर आहे- 

’नाही. नोकरीवाल्यांना देखील खुप समस्या असतात.’’  

त्यातल्या काही महत्त्वाच्या समस्या आज तुम्हाला या लेखामार्फत सांगतो आहोत:

=====

=====


 

  • खडुस बॉस

problems-at-job-place-marathipizza01

स्रोत

 

‘’माझं चुकलं किंवा नाही चुकलं तरीही माझ्यावर ओरडणारा प्राणी म्हणजे माझा बॉस.’’(फार क्वचितच एखादा अपवाद असतो). दिवसाचे ८ तास अश्या व्यक्तीच्या निगराणीखाली काढायचे ज्या व्यक्तीला आपण मनापासुन खडुस मानतो, हे काय सोप्पं वाटलं का??

उगाचंच नाही म्हटलंय,’’ जर तुमच्या कंपनीतील चांगले चांगले एम्पलॉयी तुम्हाला सोडुन जात असतील, तर त्यांच्या बॉसच्या कामाचा आढावा घ्या.’’

 

  • बदली

नोकरी सरकारी असो वा खासगी, कंपनीच्या गरजेनुसार कंपनी, कधीही, कुठेही आणि सर्वात महत्वाचं कोणाचीही बदली करु शकते आणि करते सुद्धा….

problems-at-job-place-marathipizza03

स्रोत

त्या ‘धमाल’ नावाच्या हिंदी पिक्चरमध्ये नाही का हो, कमिश्नर साहेब आपल्या लाडक्या संजुबाबाला यवतमाळला बदलीची धमकी पुर्ण पिक्चरमध्ये देत असतात!!

problems-at-job-place-marathipizza02

स्रोत

 

  • कामाचा अचानक वाढलेला वेळ

problems-at-job-place-marathipizza04

स्रोत

 

हुश्श्श्श्श्ऽऽऽ आजचं काम संपलं, दहाच मिनिटांमध्ये आॉफिस सुटणार, मग घरी जाऊन मस्तपैकी आरामच आराम…!!

Sorry to Burst Your Little Bubble Pal, You will have to stay a bit longer in office & Finish this work today only. अश्या आशयाचा मेल/मेसेज येतो आणि अगदी शेवटच्या मिनिटाला कामाचे तास वाढलेले असतात.

 

  • सुट्ट्यांचा तुटवडाः-

problems-at-job-place-marathipizza05

स्रोत

 

आईः- “अरे बाळा, त्या संजय दत्तलासुद्धा जेलमधुन 30 दिवसांची सुट्टी भेटली अरे. तुलाच का नाही भेटत कधी सुट्टी.”

यावर अजुन काय बोलणारे? घरोघरी मातीच्याच चुली… आपल्या खात्यात मारे १०० सुट्ट्या का बाकी असेना, त्या भेटतीलच याची शाश्वती साक्षात् ब्रम्हदेवसुद्धा नाही देऊ शकणार!!

 

  • कँटीन

problems-at-job-place-marathipizza06

स्रोत

‘’ साला चार दिवस घरी होतो तर पक्वान्न जेवायचो रे, आणि आता हे पाहिलं की जेवायची इच्छाच मरुन जाते. वाटतं सरळ राजीनामा टाकावा आणि घरी जाऊन जेवत बसावं.’’

अर्थात जेवण आवडलं नाही म्हणुन नोकरी सोडतोय इतका नोकरींचा पुर अजुन तरी आलेला नाही भारतामध्ये म्हणुनचं, इथं बरीच जणं दुषणं देत का होईना पण जे वाट्याला येईल ते खातात आणि गपगुमानं नोकरी करतात.

नोकरी मध्ये आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या असंख्य प्रोब्लेम्सपैकी हे काही प्रॉब्लेम्स आणि ह्या प्रॉब्लेम्संना दररोज तोंड द्यावंच लागतं. आता ह्या सर्व समस्यांना सामोरे कसं जायचं? ह्यांना टॅकल कसं करायचं? हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबुन  आहे बरं का..! काही ह्यावर रडणं पसंद करतात, काही ह्यावर तोडगा काढतात, काहींना ह्या सगळ्याने काही फरकच पडत नाही.

problems-at-job-place-marathipizza07

=====

=====

स्रोत

So?? What is you going to choose ha????

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com.

Copyright (c) 2016 मराठी pizza. All rights reserved.

One thought on “हे ५ प्रोब्लेम्स नोकरी करणाऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेले असतात

Leave a Reply

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?
%d bloggers like this: