' थ्री जी, फोर जी विसरा: मध्यप्रदेशचा प्रतिक 7-G च्या शोधावर काम करतोय! – InMarathi

थ्री जी, फोर जी विसरा: मध्यप्रदेशचा प्रतिक 7-G च्या शोधावर काम करतोय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पहिले २ जी इंटरनेट आलं…मग ३ जी आणि आता जग अनुभव घेतयं ४ जी चा.

४ जी इतकं वेगवान आहे की त्यापुढचे व्हर्जन्स किती वेगाने काम करतील याचा विचार देखील आपण करू शकत नाही. या क्षेत्रात भारतीयांचे पहिल्यापासूनच वर्चस्व राहिलेले आहे कारण अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांना अश्या टेक्नोलॉजी विकसित करण्यासाठी भारतातील प्रज्ञावंतांची गरज असते.

याच क्षेत्रात एका महत्वपूर्ण शोधावर एक प्रतिक श्रीवास्तव नामक भारतीय व्यक्ती काम करत आहे…हा शोध आहे ७ जी म्हणजेच 7 G चा…!

7 G prateek marathipizza 00

 

आश्चर्य वाटलं ना? मधले ५ जी आणि ६ जी सोडून थेट ७ जी कसं काय मिळालं बुवा याला – असा प्रश्न तुम्हाला पडला असणारचं. पण या शोधाला ७ जी म्हणण्यामागे देखील कारण आहे. ते म्हणजे याचा वेग इतका भन्नाट असेल की त्यासमोर ४ जी फिकं पडेलं आणि आपल्याला ५ जी आणि ६ जी ची गरज देखील भासणार नाही.

 

भोपाल स्थित प्रतिक श्रीवास्तव या व्यक्तीने हा ७ जी वर संशोधन सुरू केलं आहे.

7 G prateek marathipizza 01

मुख्य गोष्ट या भारतीय व्यक्तीला भारत सरकार सहाय्य करत नसून त्याला या संशोधनामध्ये मदत करण्यासाठी इटलीने ५० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. प्रतिक आपले हे संशोधन चीनच्या युनिव्हर्सिटी ऑफ चायनीज अॅकेडमी ऑफ सायन्स मध्ये करणार आहे.

 

७ जी ची काही ठळक वैशिष्ट्ये:

  • इंटरनेटसाठी मोबाईल टॉवर्स वर अवलंबून राहावे लागणार नाही
  • नेटवर्क साठी लोकांना सेन्सर्ड सीम दिले जाईल
  • इंटरनेट चा वेग हा हजार पटीने वाढेल
  • दूरसंचार क्षेत्रामधील हा सर्वात मोठा शोध ठरेल

 

जर प्रतिक श्रीवास्तव आपल्या संशोधनात यशस्वी झाला तर दूरसंचार क्षेत्रामध्ये भारताच्या नावाचा त्रिवार डंका वाजेल यात शंकाच नाही…!

स्त्रोत: ,

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?