' सौरउर्जेवर चार्ज होणारा हा रस्ता रात्रीच्या वेळी डोळ्यांचं पारणं फेडतो ! – InMarathi

सौरउर्जेवर चार्ज होणारा हा रस्ता रात्रीच्या वेळी डोळ्यांचं पारणं फेडतो !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम

 

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

===

सूर्य म्हणजे अगणित उर्जेचा स्रोत. त्याची ऊर्जा कधीही न संपणारी. या सौरउर्जेवर आधारित कित्येक शोध लावले गेले, ज्यामुळे मनुष्य जातीला फायदाच झाला आहे. सोबतच पर्यावरणाला देखील काहीच हानी होत नाही. त्यामुळे जगभरातून सौरउर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर व्हावा हा संदेश दिला जात आहे. पोलंड देशाने देखील असाच संदेश एका अनोख्या माध्यमातून दिला आहे.

या देशाने सौरउर्जेवर आधारित एक रस्ता बनवण्यात यश मिळवले आहे. जो रात्रीच्या वेळी झळाळून उठतो.

हा प्रयोग संपूर्ण देशात यशस्वी ठरला तर त्यामुळे रस्त्यांवर दिवे लावण्याची गरज भासणार नाही, परिणामी विजेचा देखील शून्य वापर होईल.

 

light-road-marathipizza01

स्रोत

या रस्त्याला ल्युमीनस ब्लू साईकल स्ट्रीप असे नाव देण्यात आले आहे. हा रस्ता टीपीए इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी तयार केला आहे. हा रस्ता सिंथेटिक पदार्थापासून बनवण्यात आला असून सौर उर्जेने चार्ज झाल्यावर सलग दहा तास प्रकाश देऊ शकतो.

सामान्यत: संपूर्ण दिवसभर सूर्याची ऊर्जा या रस्त्याला मिळत असल्याने दहा तासांच्या वर देखील प्रकाश परावर्तीत करण्याची या रस्त्याची क्षमता आहे.

 

light-road-marathipizza02

स्रोत

ही संकल्पना मुळात हॉलंड देशातील रुस्गार्डे स्टोरी नाईट्स बाईक लेन या स्टुडियोची आहे. प्रसिद्ध डच आर्टिस्ट आणि डिजाईनर डान यांना हॉलंडमधील या तंत्रज्ञानाचे श्रेय जाते.

डान यांनी प्रसिद्ध चित्रकार वेन गॉगची पेंटिंग स्टोरी नाईट्सच्या स्मरणार्थ चमकदार दगडे आणि एलईडी लाईट्सच्या मदतीने एक किमीचा रस्ता हॉलंडच्या या स्टुडियोमध्ये बनवला होता.

याच संकल्पनेपासून प्रेरणा घेत पोलंड सरकारने वेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करीत असे प्रकाशित रस्ते बनवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. आणि हे वेगळे तंत्रज्ञान होते सौरउर्जेचे आणि त्यात ते यशस्वी देखील  झाले आहेत.

 

light-road-marathipizza03

स्रोत

सध्या या तंत्रज्ञानावर टेस्टिंग सुरु आहे. एकदा का अंतिम निष्कर्ष हाती आले की हे तंत्रज्ञान जगासमोर उघड करण्यात येईल.

===

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?