मुंबईला लाजवेल असं ‘व्यवस्थापन’ स्पिरीट असलेल्या या देशात पूरस्थितीही साजरी केली जाते!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

सध्या पावसाळा सुरु आहे आणि नेहेमीप्रमाणे ह्यावर्षी देखील निसर्गाने मानवनिर्मित व्यवस्थेवर मात केली आहे. ह्यावर्षी देखील पावसामुळे रस्त्यावर पाणी साचत आहे, रेल्वे रूळ नदीमध्ये रुपांतरीत होत आहे, कुठे पूर येतो आहे तर कुठे पावसामुळे लोकांना घराबाहेर निघणे देखील अवघड झाले आहे.

पावसाळ्याची सुरवात होते तेव्हा सर्व अगदी प्रसन्न वाटत असतं, कारण वातावरणात गारवा पसरलेला असतो, हलक्या हलक्या पावसाच्या सरी अंगावर पडत असतात. सर्वच कसं सुंदर वाटायला लागतं. पण काहीच दिवसात ह्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होते आणि मग हा पाऊस नकोसा होतो.

हे निसर्गचक्र आहे त्याला आपण थांबवू शकत नाही, पण ह्यावर राजकारण नक्कीच करता येतं. ज्या पक्षाचं सरकार असेलं त्यावर विरोधक तुटून पडतात की, आधीच योग्य उपाययोजना का राबवल्या गेल्या नाहीत? पूरस्थिती का निर्माण झाली? ह्याला जबाबदार कोण? सरकार आपलं काम करण्यात अपयशी ठरलं वगैरे वगैरे..

पण सरकार कुणाचीही असली तरी अजूनही ह्यावर काहीही तोडगा निघालेला तरी दिसत नाही.

 

Netherlands-inmarathi06
wired.com

पण एक असाही देश आहे ज्याने ह्यावर तोडगा न काढता हे मान्य केलं आहे. तो देश म्हणजे नेदरलँड. हा असा देश आहे ज्याचे बहुतांश क्षेत्र हे पूरग्रस्त भागात येते. पण तरी देखील तिथले लोक चिंताग्रस्त नसतात. कारण त्यांनी ह्या परिस्थितीला मान्य केलं आहे. आणि नुसतच मान्य केलेलं नाही तर अश्या परिस्थितीत कसं जगायचं ते देखील ते शिकले. त्यांच्या मते,

“पाणी आपला वैरी नाही, तो कधीच नव्हता, त्याच्याशी लढाल तर पराजीतच व्हाल.”

पूरस्थितीतही सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत.

 

Netherlands-inmarathi04
nytimes.com

नेदरलँडच्या Rotterdam शहरात समुद्रात एक आयफेल टावरएवढे उंच गेट तयार करण्यात आले आहे. हे गेट समुद्राच्या पाण्याला थांबविण्याचं काम करतं. पूर किंवा सुनामी आला तर ते या गेटचा वापर करू शकतात. पण सध्यातरी हे गेट वापरायची गरज पडलेली नाही.

तसेच येथे पाण्यात अनेक वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन देखील केल्या जाते. २०१६ साली World Rowing Championships चे आयोजन येथेच करण्यात आले होते. आता हे एक मोठे पर्यटन स्थळ बनले आहे.

 

Netherlands-inmarathi03
ichef.bbci.co.uk

नेदरलँडच्या वैज्ञानिकांनी एक अशी मशीन तयार केली आहे ज्यामध्ये जगातील सर्वात मोठी कृत्रिम लाट बनवली जाऊ शकते. ह्या मशीनने समुद्रासारखी परिस्थिती कृत्रिमरीत्या तयार केली जाऊ शकते ज्याचा उपयोग पूरपरिस्थितीत करता येतो.

 

Netherlands-inmarathi02
nytimes.com

निदरलंडच्या सरकारने आपल्या नागरिकांना आपल्या घरी बगिचा बनविण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे पूरस्थितीत जास्तीत जास्त पाणी जमिन शोषून घील. ह्यासाठी तेथील सरकार आर्थिक मदत देखील देते.

 

Netherlands-inmarathi01
homesthetics.net

नेदरलँडचे सरकार पूरग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना दोन पर्याय देते, एकतर त्यांनी ती जागा सोडून/विकून दुसरीकडे जावे, ज्यामोबदल्यात त्यांना योग्य भरपाई दिली जाते. तर दुसरा पर्याय असा की त्यांनी उंच ठिकाणी राहावे. त्यासाठी देखील त्यांना आर्थिक सुविधा दिल्या जातात.

 

Netherlands-inmarathi07
psmag.com

नेदरलँडमध्ये अशी घरं बनविण्यात आली आहेत जी पाण्यावर तरंगतात. त्यांना Floating Homes म्हणतात. नेदरलँडमध्ये तुम्हाला अशी अनेक घरे दिसतील, ही घरे पूर आल्यास पाण्यासोबत वाहून जाऊ शकतात. आता तिथले लोक ह्या घरांमध्ये देखील राहायला शिकले आहेत.

 

Netherlands-inmarathi
flickr.com

सोबतच इथल्या सरकारने तिथल्या नद्या आणि समुद्रावर मोठमोठे बांध उभारले आहेत. ह्यामुळे ते पूरस्थितीत पाण्याला शहरात पोहोचण्यापासून थांबवू शकतात. ह्या बांधांना Delta Works म्हणतात.

आधुनिकता आणि तंत्रज्ञान हे आज जगातील सर्वच देशांजवळ आहे तरी देखील त्याचा कसा वापर करायचा हे निदरलंडकडून शिकण्यासारखे आहे. सर्वच पूरग्रस्त देशांसाठी निदरलंडने एक आदर्श उभा केला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?