' पाकिस्तानी आर्मीचं नवं संकट : हिट सिग्नेचर लपवणारे नवे आधुनिक सूट – InMarathi

पाकिस्तानी आर्मीचं नवं संकट : हिट सिग्नेचर लपवणारे नवे आधुनिक सूट

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पाकिस्तान नेहमी त्याचा नापाक कृत्यांनी भारतासाठी बाधा निर्माण करत असतो. पाकिस्तानी सैनिक व भारतीय सैनिकांमध्ये रोज खडाजंगी होत असते. एकमेकांचा प्रतिकार करायची संधी दोन्ही देशाचे सैन्य सोडत नसतात. दिवसरात्र सीमेवर गोळीबार चालूच असतो. या गोळीबारात अनेक सैनिक रोज शहीद होतात. मुळात ह्या गोळीबारामागे सुरुवात ही पाकिस्तानच्या बाजूनेच होते व शेवट ही भारतीय सैन्याचा बाजूनेच होत असतो.

एकमेकांचा सामना करण्यासाठी अत्यंत हायटेक तंत्रज्ञान दोन्ही देशांकडून वापरले जाते. यामुळे एकमेकांवर वरचढ होण्यासाठी दोन्ही सैन्य कसोशी युद्ध करतात.

सध्या भारतीय सीमा अशांत आहे. रोजच सीजफायरच उल्लंघन चालू आहे. दोन्ही बाजूचे सैनिक एकमेकांच्या रडार वर आहे. एका विशिष्ट थर्मोरेडियल उपकरणाच्या मदतीने सीमेपल्ल्याड असलेल्या सैनिकांचा बिमोड करणे सोपे जाते. या यंत्रामुळे दाट जंगल, पर्वतरांगा अश्या भागात लपलेल्या दहशतवादी गटांना निशाणा बनवणे सोपे जात असते.

 

border-inmarathi
indiatimes.com

परंतु काही दिवसांपासून पाकिस्तानी सैन्याने या यंत्रापासून स्वतःच संरक्षण करण्यासाठी एक नामी शक्कल लढवली आहे. त्यांनी या उपकरणापासून बचावासाठी एका विशिष्ट जॅकेटची निर्मिती केली आहे. हे जॅकेट घातल्यावर रडार सिग्नल व थर्मल रेडिएशन पासून स्वतःची रक्षा करणं सोपं होतं.

हे जॅकेट परिधान केल्यामुळे पाकिस्तानी सैनिक रडारला सहजरित्या टाळून भारतीय क्षेत्रात प्रवेश करतात. हे प्रकरण तेव्हा उजेडात आलं जेव्हा एका भारतीय जवानांची सीमेवर हत्या करण्यात आली.

बीएसएफच्या 192व्या बटालियनचा जवान कॉन्स्टेबल सीताराम यादव (28) यांची आरएस पुराक्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ ड्युटी होती. 18 मेच्या रात्री 1:30 वाजेच्या सुमारास पाकिस्तानी सैन्याचा सर्व्हिस ग्रुपचा कमांडोनि गोळ्या घातल्या, अत्यंत गंभीर अवस्थेत असलेल्या सीताराम यादवला त्याचे सैनिक मित्र हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वीच मृत्यूने गाठले.

 

soldier-in-ghillie-suit-inmarathi
videoblocks.com

सुरुवातीला बीएसएफच्या कमांडरला वाटलं की सीताराम ला Sniper ने मारण्यात आले आहे. परंतु स्थानिक हँड हेल्ड थर्मल इमेजर ( HTI) च्या मॉनिटर वर एक गडद काळ्या रंगाची हालचाल करणारी छाया दिसली. ही छाया बीएसएफ चौकीच्या अत्यंत जवळ येऊन गेली आणि गोळी मारून परत गेली.

चिंतेची बाब ही आहे की हे अत्याधुनिक HTI सुद्धा त्या काळ्या छायेला पकडू शकले नाही. या कारणामुळे भारत – पाकिस्तान सीमेवरील बिना कुंपणाच्या नियंत्रण रेषांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेले शीर्ष कमांडर त्रस्त आहेत.

या कारणामुळे भारताला लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करून ह्या समस्येवर तोडगा काढणं गरजेचं बनलं आहे. या घटनेच्या प्रतिउत्तरात केलेल्या जोरदार गोळीबारी नंतर पाकिस्तान बिथरला आहे. त्यांचे अनेक जवान प्रतिउत्तर दाखल केलेल्या या कारवाईत शहीद झाले आहेत.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?