' पाकिस्तानची इतकी मजल? US, UK चे मिलिटरी फोन्स हॅक?! – InMarathi

पाकिस्तानची इतकी मजल? US, UK चे मिलिटरी फोन्स हॅक?!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

पाकिस्तानने नेहमीप्रमाणे आपल्या नापाक कृत्यांची परंपरा कायम ठेवली आहे. पण यावेळी भारत नाहीतर अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाचे अधिकारी व प्रतिनिधि त्यांचा रडारवर आहेत. पाकिस्तानच्या सैन्याने बेकायदेशीरपणे एक ऑपरेशन करून त्या अधिकारी व राजनैतिक प्रतिनिधींचा डेटा चोरला आहे.

यूएस मोबाईल सेक्युरिटी कंपनी लुकआउटच्या माहितीनुसार पाश्चिमात्य अधिकाऱ्यांची मँगो आणि tangel या surveillanceware tools च्या मदतीने Data Gathering Operation करून माहिती चोरली आहे.

मागच्या आठवड्यात आलेल्या रिपोर्टनुसार, लुकआउटच्या संशोधकांच्या माहितीनुसार पाकिस्तानी मिलेटरीच्या जवानांनी पाकिस्तान, भारत आणि दुबईतल्या सामान्य नागरिक, सरकारी अधिकारी, राजनैतिक प्रतिनधी आणि काही लष्करातल्याच अधिकाऱ्यांचा डेटा चोरला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार एका विशिष्ट प्रकारच्या tools चा वापर त्यांनी यासाठी केला आहे. या टूलच्या मदतीने यशस्वीरीत्या सरकारी अधिकारी, सैन्यसदस्यांचा, वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा आणि सामान्य नागरिकांचा डेटा चोरला आहे.

 

indiatoday.in

लुकआउटने छाननी केलेल्या 15 GB compromised data पैकी, फसवणुकीसाठी आणि टार्गेट करण्यासाठी वेगवेगळ्या अँड्रॉइड अँप्सच्या मदतीने खोटा मेसेज तयार करून पसरवला जात होता.

एकदा का ते अँप डाउनलोड झालं की ते अँप टेक्स्ट मेसेज, ऑडियो फाइल्स, फोटोस, कॅलेंडर्स, कॉन्टॅक्टसची यादी, GPS लोकेशन याची माहिती चोरते. एवढंच नाही तर ती व्यक्ती केव्हा कार चालवत आहे, केव्हा इंटरनेट बंद करते आहे याची माहितीदेखील चोरली आहे.

फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून एक लिंक/ URL पाठवलि जात होती. ती URL ओपन करताच मोबाईल मध्ये त्या मालवेअरचा प्रवेश होऊन सिस्टिम हॅक होण्यास सुरुवात होत होती.

अँप डाउनलोड झाल्याबरोबर सिस्टम आजून मोठ्या प्रमाणावर हॅक होऊन आजून माहिती चोरीला जाण्यास सुरुवात होत असे. बनावट व्यक्तींच्या अकाउंटच्या मदतीने ती लिंक पाठवली जात होती आणि अँप इंस्टॉल करण्यास सांगितलं जात होते. यात फसवणूक झालेल्यांनि अजाणतेपणाने हॅकर्सला वेगवेगळ्या पर्सनल माहिती बरोबर, आयडी, फोटो पासपोर्ट, GPS लोकेशन, कायदेशीर व गुप्त डॉक्युमेंटसच्या PDF files, अंतर्गत सरकारी दूरसंचार व्यवस्था, सैन्य अधिकाऱ्यांचे बंद दारातील मीटिंग मधले फोटो ही सर्व माहिती त्या पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणेला दिली आहे.

अमेरिका व इराणचे सामान्य अधिकारी असोत आणि ब्रिटिश व ऑस्ट्रेलियाच्या राजनैतिक प्रतिनिधींचा डेटा चोरला नसून तर त्यांचा डेटा compromise करून घेण्यात आला आहे.

 

hacking-pak-inmarathi
static.asianetnews.com

या compromised डेटा मध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:-

अमेरिकेची अफगाणिस्तानला पाठवलेली गोपनीय पत्रे, पाकिस्तानातील राजदूत निवासातून अमेरिकेचा डिफेन्स सिक्युरिटी कार्यालयाला पाठवलेली पत्रे, क्वेटा शहरातील माहिती, बलुचिस्तान ची माहिती, पाकिस्तानातील जर्मन राजनैतिक अधिकाऱ्यांची माहिती, अफगाण आणि पाकिस्तान सैन्याचा अधिकाऱ्यांची माहिती व अनेक गोपनीय दस्तावेज आहेत.

लुकआउटच्या माहितीनुसार हे मालवेअर पाकिस्तान, भारत आणि अमेरिकेतल्या मुक्त डेव्हलपर्स कडून बनवण्यात आले असून, त्याचा वापर पाकिस्तानी सैन्याने केला आहे.

याचा प्रमुख डेव्हलपर हा एक फुल टाइम अँप निर्माता असून त्याने सिडनी, ऑस्ट्रेलियाच्या एका कंपनीत काम केले आहे. LinkedIn वरुन मिळालेल्या माहितीनुसार है कंपनीचे सर्व कर्मचारी पाकिस्तानी आहेत. जेव्हा यासंदर्भात लुकआउटने गुगलशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी माहिती दिली की यापैकी कुठलीच अँप प्ले स्टोअर वर नाही. तरी गूगल प्ले प्रोटेक्टला अपडेटकरून मोबाईल फोनच या अँप्स पासून संरक्षण केलं जाणार आहे आणि आधीच अफेक्ट झालेल्या डिव्हायसेसमधून मालवेअर हटवल जाणार आहे.

यासंदर्भात भारतीय नागरिक, पोलीस अधिकारी आणि सैन्यातील जवानांनी सतर्क राहणं गरजेचं असून कुठल्याही unprotected साईट वरून कुठलंच अँप डाउनलोड करणं टाळलं पाहिजे.

==

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?