चेतक वंशाच्या या घोडीची किंमत ऐकून आपल्या मुख्यमंत्र्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपल्यातील बहुतेकांना वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाळायला आवडत असतील. कुत्रा, मांजर यांसारखे प्राणी तुम्हाला खूप घरांमध्ये पाहण्यास मिळतात. हे घरातील पाळीव प्राणी घरातील इतर सदस्यांसारखे एक सदस्यच असतात. या प्राण्यांना पाळणारे लोक त्यांची खूप काळजी घेतात आणि त्यांचे तितकेच लाडही करतात.

त्यांची प्रत्येक गरज हे लोक वेळोवेळी पूर्ण करत असतात, त्यामुळे हे पाळलेले प्राणी देखील आपल्या मालकाशी खूप ईमानदार असतात. ते देखील आपल्या मालकाची साथ कधीही सोडत नाही. या प्राण्यांमध्ये आणि त्यांच्या मालकांमध्ये मैत्रीचे एक प्रेमळ नाते निर्माण झालेले असते.

 

Sarangkheda horse festival.Inmarathi
abplive.in

प्रत्येकजण आपापल्या पसंतीने पेट्स पाळत असतो. तसे तर प्राण्यांना पाळण्याची प्रथा आताची नाही, तर पूर्वीपासूनची आहे. जुन्या काळामध्ये लोक हत्ती, घोडे, पोपट आणि इतर प्राणी – पक्षी इत्यादी पाळत असत.

जर इतिहासामध्ये डोकावून पाहिल्यास प्रत्येक योद्ध्याचा एक पाळलेला प्राणी होता, जो त्याला खूपच आवडत असे आणि तो त्याच्यावर खूप प्रेम करत असे.

तुम्ही महाराणा प्रताप यांचा घोडा चेतक याचे नाव तर ऐकले असेलच. चेतकला त्यावेळी सर्वात प्रतापी आणि तेजस्वी घोडा मानले जात असे. सध्या अशीच एक घोडी चर्चेत आलेली आहे, जी चेतकची वंशज आहे. त्यामुळे तर लोक या घोडीला पाहण्यासाठी खूप दूरवरून येत आहेत. या घोडीची किंमत कोटींमध्ये असल्याचे सांगितले जाते.

 

Sarangkheda horse festival.Inmarathi1
intoday.in

महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्ह्याच्या सारंगखेडा येथे घोड्यांची जत्रा चालू होती. कितीतरी वर्षांपासून दरवर्षी भरणारी ही जत्रा खूप प्रसिद्ध आहे. या जत्रेमध्ये दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे घोडे खरेदी – विक्रीसाठी येतात. यावर्षी देखील देशभरातून लोक वेगवेगळ्या जातीचे घोडे घेऊन आले होते. पण सर्वात जास्त चर्चा पद्मा नावाच्या घोडीची होत होती.

पद्मा घोडीच्या बाबतीत सर्वात जास्त हैराण करणारी गोष्ट म्हणजे, या घोडीची किंमत इतर घोड्यांपेक्षा कितीतरी पटीने जास्त होती. राजनेत्यांपासून स्टार्सपर्यंत आणि घोडे पाळण्याचा छंद ठेवणाऱ्या लोकांपर्यंत सर्वांनी या घोडीची २ कोटींपर्यंत बोली लावली…

जसे की आम्ही सांगितले, लोकांनी या घोडीची किंमत कोटींमध्ये लावली आहे. पण या घोडीचा मालक बडका चंदना या घोडीला विकायला तयार नाही आहे. त्याचा दावा आहे की, ही घोडी चेतकची वंशज आहे. तसे तर या जत्रेमध्ये एकूण २००० घोडे आले आहेत, पण या सर्वांमध्ये पद्मा घोडी ही सर्वात उंच आणि सुंदर आहे. या घोडीला पाहण्यासाठी लोक खूप दूरवरून येत आहेत.

 

Sarangkheda horse festival.Inmarathi2
amazonaws.com

पद्माचे मालक चंदना यांचे म्हणणे आहे की, पद्माला कानपूरच्या एका जात्रेमधून तेव्हा खरेदी करण्यात आले आहे, जेव्हा पद्मा ही फक्त ४ महिन्याची होती. तेव्हापासून आतापर्यंत तिला फक्त दुध आणि काजू – बदाम इत्यादीच खाद्यपदार्थ देऊन वाढवण्यात आले आहे.

पद्माच्या व्यतिरिक्त ऑस्कर, बादल, राजा आणि चेतक यांसारखे घोडे देखील या जत्रेचे खास आकर्षण आहे. काही काळापूर्वी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येऊन या आकर्षक घोड्यांना पाहिले होते. पद्माचे मालक चंदनाने सांगितले की, पद्माची किंमत ऐकून मुख्यमंत्र्यांना आश्चर्य वाटले होते.

गेल्या वर्षीच पद्माने या जत्रेमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये एक लाखाचे बक्षीस जिंकले होते. महाराष्ट्रा व्यतिरिक्त पद्माने गुजरात, राजस्थान, पंजाब या जत्रेमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली आहे.

या जत्रेमध्ये घोड्यांच्या खरेदी – विक्री व्यतिरिक्त घोड्यांशी निगडीत असलेले कितीतरी प्रकारचे स्पोर्ट्स आणि हॉर्स रायडींग यांसारखे खेळ देखील होत आहेत. जे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

 

Sarangkheda horse festival.Inmarathi3
intoday.in

अशी ही पद्मा खूपच आकर्षक आहे आणि त्याचबरोबर या जत्रेमध्ये आलेल्या घोड्यांमध्ये ती खूप उठून देखील दिसते, त्यामुळे कदाचित तिची  एवढी थक्क करून टाकणारी किंमत लावण्यात आली आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?