' ऑस्करसाठी पात्र झालेला ‘न्यूटन’ चित्रपट चक्क चोरलेला आहे? खरे सत्य जाणून घ्याच! – InMarathi

ऑस्करसाठी पात्र झालेला ‘न्यूटन’ चित्रपट चक्क चोरलेला आहे? खरे सत्य जाणून घ्याच!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या बॉलीवूडमध्ये खूप चांगले चित्रपट येत असल्याचे आपल्याला दिसून येते. त्यांच्या स्टोरी देखील अप्रतिम असल्याचं त्यांच्या ट्रेलरवरून दिसून येते. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे ‘न्यूटन’. हा चित्रपट भारतातर्फे ऑस्करवारी देखील करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित मसुरकरने केले आहे. तसेच या चित्रपटामध्ये राजकुमार राव, अंजली पाटील, पंकज त्रिपाठी यांनी अभिनय केला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर एवढा मस्त आहे की, चित्रपट येण्यापूर्वीच त्याच्याबद्दल सगळीकडे चर्चा चालली आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहण्याची लोकांमधील उत्सुकता अजुनची वाढत चालली आहे. यामध्ये न्यूटनची भूमिका करणाऱ्या राजकुमार रावने सुरेख अभिनय केल्याचे चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यावर समजते. पण आता एका नवीन चर्चेला उधाण आले आहे, ते म्हणजे हा चित्रपट चक्क चोरीचा वाटतोय, असा काहींनी आक्षेप घेतला आहे. चला तर मग जाणून घेऊया, नेमके हे प्रकरण काय आहे..

Newton.marathipizza
pinimg.com

काही लोकांनी असा आक्षेप घेतला आहे की, न्यूटन हा चित्रपट सिक्रेट बॅलॉट या इराणी चित्रपटाहून चोरलेला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या दोन्ही चित्रपटाच्या स्टोरी सारख्याच आहेत आणि जशीच्या तशी स्टोरी त्या चित्रपटामधून न्यूटन या चित्रपटामध्ये उचलली आहे. पण आज आम्ही तुम्हाला यामध्ये किती सत्य आहे, ते सांगणार आहोत.

सिक्रेट बॅलॉट हा इराणी चित्रपट २००१ रोजी आला होता. या चित्रपटामध्ये एक स्त्री प्रमुख भूमिकेमध्ये दाखवण्यात आलेली होती. या चित्रपटात आणि न्यूटन या चित्रपटामध्ये खूप समानता आहे, पण या दोन्ही चित्रपटांची स्टोरी मांडण्याची पद्धत पूर्णपणे वेगळी आहे. दोन्ही चित्रपटामधील प्रमुख भूमिकेतील पात्र हे आदर्शवादी दाखवलेली आहेत. सिक्रेट बॅलॉटमधील स्त्री आणि न्यूटनमधील राजकुमार राव हे पोलिंग ऑफिसर दाखवले आहेत आणि त्यांना गावाच्या भागामध्ये ड्युटी लागते.

Newton.marathipizza1
fansshare.com

हे दोन्ही प्रमुख पात्र मतदान बजावण्यासाठी लोकांना प्रेरित करतात. सिक्रेट बॅलॉट या चित्रपटामध्ये ज्या स्त्रीचे प्रमुख पात्र दाखवले आहे ती तस्कर आणि गुंड यांचे वास्तव्य असलेल्या बेटावर जाते, जेथे तिच्या जीवाला देखील धोका उत्पन्न होण्याची शक्यता असते. त्यामुळे तिला योग्य ती सुरक्षा प्रदान केलेली असते. तसेच, न्यूटन या चित्रपटामध्ये राजकुमार रावचे जे प्रमुख पात्र दाखवले आहे तो नक्षलवाद्यांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये मतदानाचे काम करण्यासाठी जातो, म्हणून त्याला देखील सुरक्षा प्रदान केली जाते. दोन्ही चित्रपटामध्ये सामाजिक आणि राजकीय आव्हाने हाताळताना विनोदाचा वापर केला गेला आहे. या विषयावरील प्रभाव वगळता, दोन्ही चित्रपट विविधता दर्शवतात.

इराणी चित्रपटात एक मूल्यवादी मतदान अधिकारी दिसून येते, जी मतदानाबद्दल जागृत असते. यामध्ये दूरगामी देशांमधील कायद्याचा निरर्थकपणा दिसून येतो, जिथे तिच्यासारख्या स्त्रियांना दुय्यम मानले जाते. न्यूटन चित्रपटामधील राजकुमार राव हा या भूमिकेमधून कर्तव्यनिष्ठा दाखवतो आणि भारतीय नोकरशाहीचे महत्त्वकांक्षी चित्र अचूक रेखाटतो.

Newton.marathipizza2
indianexpress.com

सिक्रेट बॅलॉट चित्रपटामध्ये शेवटी त्या प्रमुख भूमिका असलेल्या स्त्रीचे तिच्याबरोबर असलेल्या सुरक्षा रक्षकावर प्रेम जडते. त्यामुळे या चित्रपटाला रोमांटिक वळण प्राप्त झाले आहे. पण न्यूटन या चित्रपटामध्ये असे काहीही दाखवले गेले नाही आणि हा चित्रपट पूर्णपणे त्याच्या कामावर आणि त्याच्या मुल्यांवर आधारित आहे. म्हणून न्यूटन हा चित्रपट चोराला आहे, हा गैरसमज आपल्या मनातून काढून टाका आणि हा चित्रपट नक्की पाहायला जा.

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?