वजन कमी करण्याचं ‘न्यू ईयर रिझॉल्यूशन’ कधी पूर्ण का होत नाही? जाणून घ्या

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

२०१७ चे आता काहीच दिवस बाकी आहेत, त्यानंतर आपण २०१७ ला निरोप देऊन २०१८ या नवीन वर्षामध्ये पदार्पण करणार आहोत. या नवीन वर्षामध्ये आपण सर्वांनी नवीन जोमाने उभे राहून नवीन काहीतरी करण्याचा संकल्प नक्कीच केला असेल. काहींनी या नवीन वर्षासाठी वेगवेगळ्या योजना देखील आखल्या असतील. काय करावे ? कसे करावे ? या सर्वांचे नवीन वर्षासाठीचे गणित आपण याच डिसेंबर महिन्यापासून लावायला सुरुवात करतो. पण हे नवीन वर्ष आपल्यासाठी नक्की काय घेऊन येणार आहे, हे कोणालाही ठाऊक नसते. या नवीन वर्षामधील सर्व संकल्पांपैकी बहुतेकांचा एक सारखाच संकल्प असतो, तो म्हणजे फिटनेसचा संकल्प.

 

Fitness resolution.Inmarathi
ytimg.com

या नवीन वर्षामध्ये बहुतेक लोक जिमला जाण्याचा संकल्प करतात. डिसेंबर, जानेवारी येताच जिममधील लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. आकड्यांनुसार, दरवर्षी लाखो लोक फिटनेसला आपल्या नवीन वर्षाचे संकल्प बनवतात, पण त्यातील काही मोजकेच लोकचं यामध्ये यशस्वी होतात. पण असे का होते ? जिमला जाण्याचा उत्साह का काही महिन्यांनी कमी का होतो. चला तर मग जाणून घेऊया, असे का होते त्याबद्दल..

काही लोकांचे म्हणणे असते की, या धकाधकीच्या जीवनामध्ये फिटनेसकडे लक्ष देणे किंवा जिममध्ये जाण्यासाठी पुरेसा वेळ नसतो. पण कामाचा ताण आणि कुटुंबाची जबाबदरी सर्वच लोकांच्या अंगावर असते. त्यामुळे कोणतेही कारण न देता अशा लोकांनी थोडा वेळ जिमला जाण्यासाठी आणि आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यात काढणे गरजेचे आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या किंवा आरामाच्या वेळेमधील थोडासा वेळ आपल्याला फिटनेससाठी द्यायला जमायला हवे.


 

Fitness resolution.Inmarathi1
ytimg.com

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या एका स्टडीने हे सिद्ध केले होते की, जिम जाणऱ्या लोकांसाठी सोशल सपोर्ट मोठ्या प्रमाणात गरजेचा असतो. या स्टडीमध्ये भाग घेणाऱ्या २१८ लोकांना तीन भागामध्ये विभागण्यात आले. पहिले ते लोक ज्यांना स्टॅनफोर्डच्या इंस्ट्रक्टरचा कॉल दर ३ आठवड्यांमध्ये एकदा येईल. दुसरे ते लोक, ज्यांना असाच एक कॉल एका संगणकामधून प्राप्त होईल आणि तिसरे ते लोक ज्यांना कोणत्याही प्रकारचा कॉल येणार नाही.

एका वर्षानंतर हे निष्कर्षात आले की, पहिले ग्रुपवाले लोक दर आठवड्यात १७८ मिनिट्स व्यायाम करण्यात घालवत होते. तिथेच दुसऱ्या ग्रुपचे लोक १५७ मिनिट्स आणि तिसऱ्या ग्रुपचे लोक एका आठवड्यामध्ये फक्त ११८ मिनिट्स जिममध्ये घालवत असत.

काही दिवसात जानेवारी येईल आणि तुम्ही जिममध्ये जाण्याचा संकल्प केला असेल. जिम जाण्याचा संकल्प करणारे काही उत्साही तरुण मंडळी देखील असतील, जी पहिल्यांदाच जिमला जाणार असतील. अशावेळी चुका होण्याची शक्यता वाढते आणि लोक जिम करण्याचे मोटिव्हेशन हरवून जातात.

 

Fitness resolution.Inmarathi2
mensxp.com

त्यामुळे कधीही आपल्यासमोर छोटे लक्ष ठेवा. उत्साहित होऊन खूप वजन लावून मशीनचा वापर करू नका. असे केल्याने काही दिवसांनी तुमचे मोटिव्हेशन कमी होईल आणि तुम्ही जिमला जाण्याचे बंद कराल. जिमसाठी संयमाची खूप आवश्यकता असते. तुमचे शॉर्ट टर्म फिटनेस गोल्स देखील तोपर्यंत पूर्ण होणार नाहीत, जोपर्यंत तुम्ही व्यायाम आणि खाण्यापिण्याच्या गोष्टींविषयी जागरूक होणार नाहीत.

काही लोक तर जिममधील मशीनला एवढे घाबरतात की, तिला हात देखील लावत नाही आणि हा खरचं, जिममधील काही व्यायाम खूपच बोरिंग असतात. पण तरीही तुम्ही त्यांना न कंटाळता ते केले पाहिजे आणि त्याच्याविषयीची आपल्या मनातील भीती घालवली पाहिजे. जर तुम्हाला एखादा व्यायाम करायला कंटाळा येत असेल, तर तुम्ही इंटरनेटच्या मदतीने त्याला पर्यायी असा व्यायाम शोधू शकता.

जिमला जाऊन आपली फिटनेस करण्याची इच्छा आणि त्यासाठी लागणारी मेहनत पूर्णपणे तुमच्या हातामध्ये आहे. त्यामुळे त्यासाठी तुम्हीच मनातून दृढ संकल्प केला पाहिजे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *