दहशतवाद्यांशी लढत, वयाच्या २२व्या वर्षी बलिदान देऊन ३६० लोकांचे प्राण वाचवणारी शूर भारतीय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काही लोकांच्या साध्या सरळ जीवनात काही प्रसंग असे उभे रहातात की ज्यामुळे त्यांच्या धैर्य, प्रसंगावधान आणि चातुर्याचा कस लागतो. काही मोजकेच लोक अश्यावेळी अतुलनीय शौर्य गाजवतात. नीरजा – अशीच एक शूर वीर होती.

५ सप्टेंबर १९८६ रोजी अबू निदाल ह्या दहशतवादी संघटनेने Pam Am Flight 73 चं अपहरण केलं. विमान कराची एअरपोर्टवर असतानाच हे अपहरण झालं. अपहरण घडताच फ्लाईटचा पायलट, को-पायलट आणि फ्लाईट इंजिनिअर हे तिघेही अमेरिकन cabin crew मेंबर्स पळून गेले. मग, फ्लाईटची सर्वात सिनीअर cabin crew म्हणून chief flight purser असलेल्या नीरजा भानोतने जबाबदारी घेतली.

=====

=====


The_True_Story_of_Neerja_Bhanot_the_Heroine_of_Pan_Am_Flight_73_-_YouTube

 

फ्लाईट वरील सर्व प्रवाश्यांचे पासपोर्ट गोळा करण्याचा आदेश दहशतवाद्यांनी दिला. त्यांचा हेतू प्रवाश्यांमधील अमेरिकन लोक मारण्याचा होता. नीरजाने, तिच्या काही सहकाऱ्यांच्या मदतीने ४१ अमेरिकन लोकांचे पासपोर्ट लपवून ठेवले आणि त्यांचा जीव वाचवला.

१७ तासांनंतर अतिरेक्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. तेव्हा नीरजाने तत्परतेने emergency door उघडून अनेक प्रवाश्यांना पळून जाण्यास मदत करून वाचवलं. लक्षणीय गोष्ट ही की दरवाजा उघडून नीरजा स्वतः सर्वप्रथम पळून जाऊ शकत होती. पण तिने तसं नं करता इतरांना जाऊ दिलं.

शेवटी – ३ लहान मुलांना वाचवण्याच्या प्रयत्नात नीरजा दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडली.

नीरजाच्या ह्या शौर्यासाठी भारत, पाकिस्तान आणि अमेरिका ह्या तिन्ही देशांनी तिला मरणोत्तर शौर्य पदकं बहाल केली.

नीरजाने Miami हुन flight attendant ची ट्रेनिंग घेतली होती. त्या आधी, सासरहुन हुंड्याची मागणी होत असल्याने ती मुंबईला रहायला आली होती. तिने एक यशस्वी model म्हणूनसुद्धा स्वतःची ओळख निर्माण केली होती.

neeraja-bhanot-binaca-marathipizza

Image Source: thequint

 

२००४ मध्ये, सरकारने नीरजाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित केलं. शिवाय घाटकोपरला एका चौरस्ताला नीरजाचं नाव दिलं गेलं, ज्याचं अनावरण अमिताभ बच्चन हस्ते करण्यात आलं.

 

neerja-bhanot-stamps_marathipizza

Source: Indiatimes

१९ फेब्रुवारी, २०१६ ला प्रदर्शित झालेला आणि सोनम कपूर प्रमुख भूमिकेत असलेला ‘नीरजा’ हा हिंदी चित्रपट देखील याच कथेवर आधारित आहे.

चित्रपटाची झलक इथे बघू शकता.

 

=====

=====

भारताच्या ह्या शूर सुपुत्रीला त्रिवार वंदन!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 201 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?