जगातील अश्या विचित्र गोष्टी, ज्या कोठून उत्पन्न झाल्या, ते कोणालाच माहित नाही!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये दगडे सरकण्यामागचे सहस्य काय? रशियाच्या मॉस्कोमध्ये खोदकामादरम्यान मिळालेल्या ३ हजार वर्षे जुन्या लोखंडाच्या बोल्टमागचे रहस्य काय? त्याबरोबरच प्राचीन मेक्सिकन शहरामध्ये आर्किटेक्टने काय विचार करून अभ्रकाच्या शीटपासून इमारतीच्या भिंती तयार केल्या होत्या? जगातील असे अनेक गूढ, रहस्य आहेत ज्यांच्याबाबत खुलासा होणे गरजेचे आहे. वैज्ञानिकही त्यासाठी झटत आहेत. या रहस्यांवर अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे. पण ती चर्चा कधी पुढे सरकतच नाही. चला तर मग जाणून घेऊयात जगातील अशाच गूढ रहस्यांबाबत, ज्याबाबत नासाच्या वैज्ञानिकांनाही विचार करणे भाग पडले आहे.

 

दगडाची बाहुली

unsolved-mystery-marathipizza01
1.bp.blogspot.com

१८८९ मध्ये ईदाहोच्या नाम्पाबाबत अचानक वैज्ञानिकांमध्ये रस वाढू लागला. त्याचे कारण म्हणजे याठिकाणी खोदकामादरम्यान आढळलेली दगडाची बाहुली. मानवाने हाताने तयार केलेली ती बाहुली होती. दगडाची ही बाहुली ३२० फूट खोल खोदकामादरम्यान आढळली. जगात मानवाच्या अस्तित्वात आल्यानंतर अशा बाहुली तयार केल्या जात असाव्यात असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र पडद्यामागील सत्य अजूनही गूढच आहे.

 

पिरॅमिड द पॉवर 

unsolved-mystery-marathipizza02
i.ytimg.com

प्राचीन मेक्सिकन शहराच्या भिंती अभ्रकच्या मोठ्या शीटपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. अभ्रकाच्या खाणींबाबत बोलायचे तर त्या ब्राझीलमध्ये आहेत. पण या खाणी शहरापासून हजारो मैल दूर आहेत. अभ्रकचा वापर औद्योगिक आणि ऊर्जा उत्पादनासाठी केला जातो. मग या इमारतींसाठी अभ्रकासारख्या खनिजाचा वापर का केला असेल, असा प्रश्न उपस्थित होतो. आर्किटेक्ट शहरात वीजेच्या स्त्रोतासाठी असे करत होते का, असाही प्रश्न आहेच.

 

विचित्र रेषांची आकृती

unsolved-mystery-marathipizza03
dailymail.co.uk

फोटोमध्ये दिसणाऱ्या या विचित्र रेषा ४० अंश २७’२८.५६ उत्तर व ९३ डिग्री २३’२४.४२ पूर्व दिशेला पाहण्यात आल्या आहेत. या विचित्र आकृतीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. चीनच्या गानसू शेंगच्या वाळवंटात या रेषा आहेत. इंग्रजीमध्ये याला चीनी मोझॅक लाइन्स म्हटले जाते. एका आकडेवारीनुसार २००४ मध्ये या रेषा काढण्यात आल्या होत्या. महत्त्वाचे म्हणजे या रेषा मोगाओच्या गेहेच्या आसपास रेखाटल्या आहेत. त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा आहे. याचे वैशिष्ट्य म्ङणजे टेकडी ओबड ढोबड असूनही या रेषा अनेक वर्षांपासून सरळच आहेत.

 

 

नेवाडाचा भीमकाय मानव 

unsolved-mystery-marathipizza04
i0.wp.com

असे म्हटले जाते की, नेवाडामध्ये लाल केस असणारे १२ फूट उंच मानव राहत होते. ही कथा अमेरिकींनी एका गुहेत भीमकाय मानवांच्या केलेल्या हत्येबाबत आहे. १९११ मध्ये खोदकामादरम्यान एक मानवी जबडा आढळला आहे.  त्याशिवाय १९१३ मध्ये दोन सांगाडेही आढळले होते. त्यांची लांबी ८ आणि १० फूट होती.

 

दगडांची रचना

unsolved-mystery-marathipizza05
metabunk.org

सहारा वाळवंटामध्ये जगातील सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे. ते म्हणजे दगडांची ही विशिष्ट रचना. १९७३ मध्ये खगोल शास्त्रज्ञ सर्वात आधी याठिकाणी पोहोचले होते. १९९८ मध्ये प्रोफेसर फ्रेड वँडोर्फच्या टीमने दगडांच्या या रचनेचा अभ्यास केला होता. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, ते ईसवीसनपूर्व ६००० वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहे. नाब्टा प्लायामध्ये आढळलेल्या दगडांच्या स्ट्रक्चरबाबत संशोधन केल्यानंतर ते खगोल आणि ज्योतिष शास्त्रािवषयी असल्याची माहिती मिळाली. पण हजारो वर्षांपूर्वीही त्या लोकांनी एवढा विकास कसा केला होता, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याकाळी ते याचा वापर कसा करायचे? हे आजही एक रहस्य बनलेले आहे.

 

प्राचीन रॉकेट

unsolved-mystery-marathipizza06
algorhythym.files.wordpress.com

फोटोमध्ये तुम्हाला रॉकेटसारखे काहीतरी दिसत असेल. हे जपानच्या एका गुहेत तयार करण्यात आलेले एक प्राचीन पेंटिंग आहे. हे पेंटिंग ईसवीसनपूर्व ५,००० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मग प्राचीनकाळात अशा प्रकारचे एखादे विमान होते की काय, हा प्रश्न अजूूनही संशोधकांच्या मनात आहे. तसे नसेल तर हे चित्र काय विचार करून काढले असेल?

 

लोलाडॉफ प्लेट 

unsolved-mystery-marathipizza07
2.bp.blogspot.com

नेपाळमध्ये १२,००० वर्षांपूर्वी दगडापासून तयार केलेले ताट वापरले जात होते. मात्र हे ताट पाहिले की यूएफओची प्रतिकृती असल्याचे जाणवते. ताटावर एलियनसारखे चित्र असल्याचे तुम्ही फोटोत पाहू शकता.

 

अनाकलणीय खिळा 

unsolved-mystery-marathipizza08
circa71.files.wordpress.com

१९७४ मध्ये ट्रान्सिल्व्हेनियाच्या मूर्स नदीमध्ये २०,००० वर्षे जुन्या हाडांबरोबर एक अॅल्युमिनियमचा खिळा सापडला होता. त्यावर ऑक्साईडचा एक मिमी जाड थर होता. शास्त्रज्ञांच्या मते, हा खिळा ३०० ते ४०० वर्षे जुना आहे. विशेष म्हणजे अॅल्युमिनियम नेहमी इतर धातुंबरोबर मिश्रित केलेले आढळते. पण चारशे वर्षे जुना असलेला हा खिळा पूर्णपणे अॅल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेला आहे. १८०८ पूर्वीपर्यंत अॅल्युमिनियमचा शोधही लागला नव्हता. मग चारशे वर्षांपूर्वी शुद्ध अॅल्युमिनियम आले कुठून हा प्रश्न उभा राहतो.

 

तीन हजार वर्षे जुना लोखंडी नट

unsolved-mystery-marathipizza09
2.bp.blogspot.com

१९९८ मद्ये रशियाचे वैज्ञानिक दक्षिण-पश्चिम मॉस्कोपासून सुमारे ३०० किमी अंतरावर एका उल्केच्या अवशेषाचे संशोधन करत होते. यादरम्यान त्यांना एक दगडाचा तुकडा आढळला. त्याच एक लोखंडी नट लावण्यात आलेला होता. भूगर्भ तज्ज्ञांच्या मते हे दगड ३००० ते ३२०० वर्षे जुना आहे. त्यावेळी पृथ्वीवर केवळ डायनॉसॉर होते. त्यामुळे त्याचे गूढ वाढले आहे. या दगडामद्ये एक सेंटीमीटर लांबीचा आणि तीन मिलीमीटर व्यासाचा नट दिसून येतो.

तर अशी आहेत ही न उलगडलेली रहस्ये ज्यांनी आजही आधुनिक जगताला बुचकळ्यात टाकले आहे. 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?