मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? वाचा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मोबाईल पाण्यात पडला की आपल्या हृदयात एकदम धस्स होतं. बोलून चालून यंत्रच हो ते, त्यामुळे पाण्यात पडल्यावर ते जिवंत राहील की नाही याची शाश्वती देणे कठीणच! आणि आपल्याला या इवल्याश्या पण उपयुक्त यंत्राने इतकी सवय लावलेली असते की तो पाण्यात पडल्यावर जेवढी इजा त्याला होत नाही त्यापेक्षा जास्त मार आपल्या मनाला बसतो. मग पाण्यातून त्याला बाहेर काढल्यावर अगदी भरल्या डोळ्यांनी आपणं त्याच्याकडे पाहतो आणि त्याला सुरु करायचा प्रयत्न करतो. नशिबात असेल तर सुरु होतो नाही तर बोंबला!

 

mobile-fell-in-water-tips-marathipizza00

स्रोत

अश्यावेळी पाण्यात पडलेला मोबाईल जरी सुरु झाला तरी तो अजून किती वेळ नीट काम करेल हे सांगता येत नाही, कारण मोबाईलच्या आता जर पाणी गेले असेल तर त्यामुळे आतील यंत्रणेला धोका पोचून मोबाईल कायमचा बंद होऊ शकतो.

अश्यावेळी सर्वप्रथम – मोबाईल सुरु झाल्यास सर्वप्रथम फोन स्विच ऑफ कराआणि त्याची बॅटरी काढून ठेवा.


सिम कार्ड, मेमरी कार्डही काढा. या गोष्टी मोबाईलमधून काढल्यानंतर शॉर्ट सर्किटचा धोका कमी होतो.

त्यानंतर मोबाईलच्या आता गेलेले पाणी काढून टाकणे गरजेचे आहे. आता हे पाणी कसे काढावे याच्या अनेक पद्धती आहेत.

बहुतेक पद्धती तुम्ही ऐकून असालच, तर काही पद्धती अजून तुमच्या कानापर्यंत पोचायच्या बाकी असतील. आज आम्ही त्या सगळ्या पद्धती तुम्हाला सांगणार आहोत ज्याच्या सहाय्याने मोबाईलमध्ये पाणी गेले असल्यास आपण मोबाईल वाळवू शकतो.

एक पद्धत म्हणजे भिजलेला फोन तांदूळ असलेल्या भांड्यात ठेवा. त्यानंतर हे भांडं सूर्यप्रकाशात किंवा उष्ण ठिकाणी कमीत कमी दोन दिवसा ठेवावा.

मोबाईल कोरडा करण्याची ही सर्वात उपयुक्त पद्धत असल्याचे बोलले जाते.

 

mobail-fell-in-water-tips-marathipizza02

स्रोत

दुसरी एक पद्धत म्हणजे मोबाईल फोन व्हॅक्यूम क्लिनरने 20-30 मिनिटं कोरडा करा. यामुळे इंटरनल पार्ट्समधील पाणी चांगल्या प्रकारे वाळतं. मात्र फोन ऑन करण्याची घाई अजिबात करु नये.

ओला मोबाईल हेअर ड्रायरने कधीही वाळवू नये.

ड्रायरमधील हवा अतिशय गरम असते, त्यामुळे फोनमधील सर्किट वितळू शकतात. हेअर ड्रायर पाणी वाळण्यापेक्षा पाणी फोनमधील इंटरनल पार्ट्सपर्यंत पोहोचवतं. त्यामुळे मोबाईल फोन खराब होऊ शकतो.

 

mobile-fell-in-water-tips-marathipizza03

स्रोत

मोबाईल वाळवण्यासाठी सिलिका जेल पॅकचाही वापर करु शकता.

हे जेल पॅक शूज बॉक्समध्ये ठेवावं. सिलिका जेल पॅक तांदळापेक्षा जास्त वेगाने ओलावा शोषण्याची क्षमता असते.

 

mobile-fell-in-water-tips-marathipizza04


स्रोत

अजून एक पद्धत म्हणजे – मोबाईल वाळवण्यासाठी टिश्यू पेपरचा वापर करा. या शिवाय फोन पुसण्यासाठी मऊ कपड्याचा वापर करता येऊ शकतो.

mobile-fell-in-water-tips-marathipizza05

स्रोत

आता ह्यापुढे जर कधी मोबाईल पाण्यात पडला की घाबरून न जाता यापैकी जी पद्धत तुम्हाला शक्य व सोप्पी वाटते ती वापरा… आणि तुमच्या लाडक्या मोबाईलचे प्राण वाचवा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

 

One thought on “मोबाईल पाण्यात पडल्यावर काय करावं? वाचा!

  • April 6, 2017 at 12:42 pm
    Permalink

    This is useful for mobiles when our mobiles fall in water all systems are usefull for mobiles.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *