' भारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग? – InMarathi

भारतीय वायुसेनेची मदार असणारे मिग-२१ : अभिमानास्पद गौरव की लाजिरवाणे डाग?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – श्रीनिवास देशमुख 

===

फेब्रुवारी २०१८ जामनगर वायूसेना तळ. फ्लायिंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी यांनी मिग-२१ bison मधून सोलो उड्डाण करत एक अभिनव इतिहास रचला. भारतीय वायू सेनेच्या इतिहासातले हे एक सोनेरी पर्व आहे. हा क्षण जेवढा महत्वाचा आहे तेवढेच हे लढाऊ विमानसुद्धा महत्वाचे आहे. एप्रिल २०१३ मध्ये भारताने मिग-२१ च्या विकत घेण्याच्या कराराला ५० वर्षे पूर्ण केली.

सोविएत युनिअन सोबत १९६२ मध्ये हा करार झाला आणि १९६३ पासून हि विमाने भारतीय आकाशात आपले वर्चस्व सिद्ध करू लागी. १९६७ मध्ये HALने करारात अंतर्भूत असलेलेल्या परवानातून भारतात मिग-२१ बांधणी चालू केली.

मिग-२१ ने आजपर्यंत आपल्या नावावर बरेच विक्रम प्रस्थापित केले आहेत. कदाचित जगात असणार्या लढाऊ विमानानापैकी मिग-२१ एक अतुलनीय उदाहरण आहे. द्वितीय महायुद्धानंतर जगातील सर्वात जास्त कोणत्या विमानाची बांधणी झाली असेल तर मिग-२१ हे ते विमान आहे. जवळपास ११००० विमाने बांधली गेली आहेत. मिग-२१ च्या सोबतीचे विमाने, जसे की F-104, Mirage III कधीच काळाच्या आड गेली आहेत.

२००५ साली नामिबियाने मीग-२१ विमाने विकत घेत या विमानावर असेलल्या भरवशावर शिक्कामोर्तब केले. मिग-२१ने Vietnam, middle east आणि भारतात युद्धाचे ढग बघितले.

 

mig 21-inmarathi

हे ही वाचा – शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग १)

१९५६ मध्ये मॅास्कोच्या तुशिनो विमानतळावर मिग-२१चे अनावरण झाले. १९५३ मध्ये सोविएत रशियाच्या वायू सेनेने कमी वजन असलेल्या, ध्वनीच्या वेगापेक्षा दुप्पट वेगाने उडणार्या, interceptor विमानाची मागणी केली. या विमानात रडारची अपेक्षा करण्यात आली, जेणेकरून अस्त्रांचा मारा अचूक करता येईल. त्याच काळात मिग-गुरेवीच कंपनी विमानाच्या वेगवेगळ्या पंखांच्या आकारवर संशोधन करत होते. त्यात बरेच यशपण मिळाले होते.

या कंपनीने हे आवाहन स्वीकारले. ५ वेगवेगळे नमुने तयार केले, ज्यात वेगवेगळे पंखांचे design होते. शेवटी, डेल्टा design निवडले गेले.डेल्टा designचा एक फायदा आहे. डेल्टा पंख चांगला लिफ्ट देते. त्यामुळे भरपूर इंधन वाहून नेता येते. तसेच, वेगवेगळे अस्त्र वाहून नेण्याची क्षमता वाढते. या कारणास्तव आपले तेजस विमान अशाच संरचनेचे पंख वापरते.

तसे बघितले तर मिग-२१ वायू सेनेची पहिली पसंती नव्हतीच. पहिली पसंती होती Lockheed F-104. अमेरिकेने पाकिस्तानला F-104 दिले आणि जेव्हा भारताने हे विमान मागितले तेव्हा नकार दिला. कारण, अमेरिकेला पाकिस्तानची नाराजी ओढवून घ्यायची नव्हती.

अमेरिकेने त्याकाळी एक स्पष्ट केले की आम्ही तुम्हाला असे कुठलेही अस्त्र विकणार नाही, ज्याचा mountain warfareशी संबंध येणार नाही.

याचे दोन उद्देश होते. एक म्हणजे पाकिस्तानला लष्करीदृष्ट्या सक्षम करणे आणि चीनला शह देण्यासाठी अमेरिकन सामरिक धोरणा अंतर्गत भारताला प्यादा बनवणे. इथेच खेळाचे नियम बदलले. भारताने सोविएत रशियाला निरोप धाडला.

त्यांनासुद्धा मोठा खरीददार हवाच होता. त्यांनी मग पूर्ण ToT आणि परवाना बांधणी सकट मिग-२१ विकायचा निर्णय घेतला. १९७१च्या युद्धापर्यंत भारताकडे १०० मिग-२१ विमाने येऊन ठेपली होती. तसेच, मिग-२१ भारतीय वायू सेनेतले पहिले सुपरसोनिक विमान झाले.

 

mig-inmarathi

हे ही वाचा – “फिशबेड व्हर्सेस फाल्कन” : जुन्या मिग २१ ने आधुनिक एफ-१६ विमानावर कशी मात केली?

मिग-२१ने कोणत्या युद्धात भाग घेतला हे जगजाहीर आहे. आपण आज जरा वेगळ्या विषयावर चर्चा करू. ह्या विमानाला ‘उडती शवपेटी’ असेही संबोधले जाते. माझ्या मते ही एक अतिशयोक्ती आहे. कुठलेही विमान आणि त्याची उड्डाणक्षमता बर्याच गोष्टींवर अवलंबून असते. ज्या देशात हे विमान उडत आहे त्या देशाचे भौगोलिक स्थान, वातावरण ह्या गोष्टीतर फार महत्वाच्या असतात.

भारताचे वातावरण उष्णकटिबंधीय प्रकारात मोडते. उष्णता जास्त असल्याने विमानाचे इंजिन कमी thrust तयार करते. तसेच हवा विरळ झाल्याने पंख लिफ्टपण कमी तयार करतात. युरोपमध्ये थंड वातावरण असल्यामुळे तिथे विमान व्यवस्थित उडते.

त्यातल्या त्यात सिमेंटची जंगले वायूतळांना जवळपास खेटली आहे. विमानतळाच्याजवळ मोठी बांधकामे होऊ नये, तसेच दाट लोकवस्ती तयार होऊ नये हे नियम धाब्यावर बसवले गेले आहेत. अश्यामुळे पक्षी विमानाच्या उड्डाणात अडथळा आणतात आणि अपघात होतात. आपल्याकडे मिग-२१ मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे असे दर्शवले जाते कि या विमानाचा अपघात दर खूप मोठा आहे, जे सपशेल चुकीचे आहे.

आपल्या वायुसेनेची रचना बघितल्यास दुध का दुध आणि पाणी का पाणी होऊन जाईल.

जर आकडेच बघायचे असतील तर ऐका ! या विमानासोबत बनेलेले विमान म्हणजे F-104 Starfighters. १९६० ते १९८७ च्या काळात कॅनडाने जवळपास १०० विमाने गमावली. जर्मनीने हजार पैकी २९२ विमाने गमावली. १९७५ ते ९३ या काळात अमेरिकेने २०४ विमाने आणि २१७ अधिकारीवर्ग आणि इतर अशी मोठी किमत मोजली.

 

mig-21-crash-lands-inmarathi

 

सोविएत रशियाच्या पतनानंतर आलेल्या रशियाची अर्थव्यवस्था मजबूत नव्हती. त्यांचे बरेच कारखाने जे मिग-२१ चे सुटे भाग बनवत होते, ते बंद पडले. मग, भारतीय वायु सेनेने पूर्व-युरोपच्या देशांकडून (warsaw pact) मिग-२१ चे सुटे भाग विकत घेतले. त्या देशांनासुद्धा पैशाची अतोनात गरज होती म्हणून ते त्यांच्या मिग-२१ चे सुटे भाग विकायला तयार झाले होते. त्यामुळे, उगीच कोणी फुकट आरोप केले तर त्यात काही तथ्य नाही.

भारतीय वायू सेना पश्चिमी राष्ट्र जेवढे आपल्या अधिकारी आणि इतर वर्गाच्या लोकांच्या प्रशिक्षणावर घेते, तेवढेच घेते. आपल्याकडे कमी आहे ती या गोष्टी समजून घेणार्या पत्रकारांची.

२०२५ पर्यत ही विमाने भारतीय वायू सेनेत राहतील. राफेल विमान कधी येणार याची पक्की तारीख अजून नाही. त्यामुळे आपली वायू सेनेची मदार सु-३० आणि मिग-२१वर राहणार यात शंका नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?