“त्या” नाजूक क्षणांचं काहीतरी विचित्रच होऊ शकतं -विवाहित / प्रेमी युगुलांनो – सावध रहा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्रेम ही मानवी इतिहासाच्या सुरवातीपासून चालत आलेली भावना आहे. आज पर्यंत असंख्य गाणी, कथा प्रेमावर लिहल्या गेल्या आहेत. त्याहीपुढे जात भारतीय आणि आशिया खंडातील काही देशांमधील परंपरेत शरीरशास्त्र, कामशास्त्र यावर अभ्यासपूर्ण ग्रंथ आहेत. कामसुत्र, वत्सयान हे आपल्याला माहित आहेच.

प्रेम व्यक्त करणे, शरीर संबंधाचा आनंद घेणे हे नैसर्गिक आहे. त्या नैसर्गिक भावना व्यक्त करण्याचे प्रकार आणि काही कान गोष्टी या ग्रंथांमध्ये सांगितला आहे.

 

Romantic-Picture-marathipizza

 

आज विज्ञान खूप पुढे गेले आहे. त्यामुळे शरीर शास्त्राचे नवनवीन शोध, गोष्टी आपल्यापर्यंत लगेच येतात.  विज्ञानाचे जसे फायदे आहेत तसे तोटे देखील आहेत. त्यापैकी काही तोटे आपण टेक्नॉलजीचा गैरवापर आणि अतिवापर केल्याने होतात. तर काही आपल्या निष्काळजीपणामुळे तर काही अतिआत्मविश्वासामुळे होतात. नाही आम्ही शरीर संबंध कसे ठेवावेत, यावर प्रवचन देत नाही.

मोबाईलचा वापर आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर विपरीत परिणाम करतो तेही सांगणार नाही. या जुन्या गोष्टी झाल्या आहेत. तसंच कोणत्या सणांच्या वेळी कंडोमची सर्वाधिक विक्री होते तेही सांगणार नाही. या घटना आपण आत्तापर्यंत वाचल्या असतील.

तुम्ही जर कुणाच्या प्रेमात असाल आणि ते प्रेम एकांतात व्यक्त करत असाल आणि “त्या” एकांतातल्या आठवणी सवयी प्रमाणे मोबाईलमध्ये कैद करत असाल, रेकॉर्ड करत असाल तर सावधान.

या आधी आपण हनीमुन साजरं करणा-या  युगुलांचे एकांतातले व्हिडिओ पॉर्न साईटवर गेल्याची बातमी वाचली असेल. किंवा तसे एमएमएसही मोबाईलवर बघितले असतील. अशा घटनांवर “रागिणी एमएमएस” हा चित्रपटही येऊन गेला आहे.


ragini_mms_inmarathi

 

त्या चित्रपटात नेमके काय दाखवले ते आम्ही इथे सांगणार नाही. पण एकांतातल्या गोष्टी एकांतात रहाव्या किंवा दुस-या भाषेत सांगायचे तर,  इशारों को अगर समझो राज को राज रेहने दो, किंवा हम तुम एक कमरे में बंद हो और चाबी खो जाय… असं झाल्यावर जे काही होतं ते मोबाईलमध्ये रेकॉर्ड करू नका.

कारण काही आंबट शौकीन तुमच्या एकांतातले व्हिडिओ पॉर्नसाईटवर व्हायरल करतील, तुम्हाला किंवा तुमच्या गर्लफ्रेंडला ब्लॅकमेल करण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

त्यामुळे प्रितीचं झुळझुळं पाणी, झुळझुळ न वाहता त्याचे रुपांतर त्सुनामी मध्ये होऊ शकते किंवा तो प्रेमाचा झरा कायम स्वरुपी आटू शकतो.

इंडिया टुडे सेक्स सर्व्हे 2017 मध्ये असं समोर आलं आहे की पाच पैकी  एक युगूल आपल्या एकांतातल्या “त्या” आठवणी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करतात. आणि मग मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास वर सांगितलेले प्रकार होतात.

हे या सर्व्हेच्या माध्यमातूनही समोर आले आहे. तसंच अशा ब्लॅकमेलिंगला कंटाळून, घाबरून आत्महत्या झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. तसंच डिव्होर्स झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.

तुमचा असा नको तिथे मोबाईलचा वापर करणं तुमचे संबंध कुठपर्यंत बिघडवू शकतं याचं हे जिवंत उदाहारण आहे. अशा घटनांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी लोक घाबरतात. विशेषतः महिला. फक्त मोबाईल हरवला, ही वरवर इतकी साधी वाटणारी गोष्ट आपल्याला खात राहिल.

 

video recording in mobile inmarathi
lehsys.com

 

तुम्ही म्हणाल आम्ही मोबाईलमध्ये पासवर्ड टाकतो. तो अनलॉक करणं कोणालाही शक्य नाही. तर अशा भ्रमात राहू नका. चोर हे आपल्यापेक्षा चार पाऊलं पुढे असतात. तुम्ही काचरत काचरत तक्रार करायला गेलात. तक्रार जरी झाली तरी त्या चोरांना, आंबट शौकीनांना पकडणं हे सहज सोपं असू शकत नाही. तसंच त्यांनी तो एकांतातला व्हिडिओ दुसऱ्या देशातून व्हायरल केला तर मग त्याहून मोठं दुर्दैवं नसेल.


कारण आपण फारतर आपल्या सायबर पोलिसांकडे तक्रार करू पण दुसऱ्या देशातून त्या चोर, आंबट शौकिनांना पकडणं हे कर्मकठीण आणि जिकरीचं काम असेल. साधं पाकिट किंवा घड्याळ हरवलं तर तक्रार नोंदवल्यानंतरही आपल्याला अनेकदा पोलीस स्टेशनला जावं लागतं.

तुमच्या “त्या” गोष्टींच्या तक्रारीसाठी तुम्हाला किती हेलपाटे मारावे लागतील. तसंच प्रत्येकवेळी नेमकं काय घडलं हे त्यांना सांगावं लागेल. हे लाजीरवाणं तर आहेच. पण मनस्ताप देणारं ही आहे. ज्या लोकांना तुमच्याबद्दल आदर, आत्मियता आहे, त्यांच्यापर्यंत या गोष्टी गेल्या तर काय होऊ शकतं याची कल्पना करा. किंवा एमएमएस व्हायरल झाला तर तोंड दाखवणं महा कठिण होईल.

तेव्हा अति आत्मविश्वासात किंवा निष्काळजीपणे न जगता याबाबत जागृक आणि सावधान रहा. मोबाईल हा जरी दोघांना जवळ आणणारा असला तरी जवळ आल्यावर तो वापरणं टाळा.

हे मॅनफोर्स ने बनवलेल्या एका शॉर्ट फिल्ममधून सांगण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे. एका सुंदर मधुचंद्राचा किती करुण विचका होतो हे बघून फार वाईट वाटतं. या अॅडफिल्मला इंडिया टुडे ने केलेल्या सर्व्हेचा संदर्भ आहे. तेव्हा याबाबतची सत्यता अधिक गडद होते.

 

 

तेव्हा दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा असं होऊ द्यायचं नसेल तर तुमच्या दोघांत तिसरा अजिबात येणार नाही, किमान रेकॉर्डिंगसाठी तरी, हे कटाक्षाने पाळा. तसंच अशा दुर्घटनांमध्ये आपले मित्र सहकारी अडकू नयेत म्हणून हा लेख तसंच या जनजागृतिची लिंक जास्तित जास्त आपल्या मित्रांपर्यंत पोहचवा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *