शॉपिंग मॉलमध्ये ‘ह्या’ ट्रिक्स वापरून तुमच्याकडून जास्त खरेदी करवली जाते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

====

खोगिरभरती.. हा शब्द आपण ऐकला असेल. नको असलेल्या वस्तू जमवणे म्हणजे खोगिरभरती. यामध्ये महिला आघाडीवर असतात असं काही पुरुषांचं म्हणणं असतं. तसेच महिलांनंतर बालकांचे बालहट्ट आपल्याला म्हणजे पालकांना पुरवावे लागतात. हे काही वेगळे सांगायला नको. त्यातच हे मॉल्स, म्हणजे आणखी खिश्याला कात्री. त्या मॉलच्या झगमगत्या प्रकाशात आणि लाडावून बोलणाऱ्या त्या सेल्समन्सच्या नादात कधी आपला खिसा खाली होतो हे कळतच नाही.

मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाणे त्या मॉलमधून काहीना काही खरेदी करावी यासाठी तेथील व्यापारी नवनवीन शक्कल लढवत असतात. आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की कश्या प्रकारच्या स्मार्ट ट्रिक्सने आपण या मॉल वाल्या मंडळींचे “गिऱ्हाईक” होऊन बसतो.

प्रवेशद्वार 

 

trics of mall management 01 - InMarathi
daily.social.com

प्रवेशद्वारावरच तुम्हाला बेकरी प्रोडक्ट्स किंवा अशाकाही पदार्थांचा वास येईल की तुमची भुक चवताळेल. तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही गरज नसतानाही ज्या प्रोडक्टच्या सुगंधाने तुमची भुक चवताळली किंवा तोंडाला पाणी सुटले ते विकत घ्याल. ही सर्वात पहिले नजरेत येणारी पण नकळत आपला खिसा हलका करणारी ट्रिक आहे.

 

मांडणी 

 

trics of mall management 03 - InMarathi
i5design.com

मॉलमध्ये आल्यावर आपल्या नजरेत फेमस कंपनींचे भलेमोठ्ठे प्रोडक्ट आकर्षक पद्धतीने ठेवलेले असतात. तसेच तुम्हाला ते सहज दिसतील याची विशेष काळजी घेतली जाते. त्याच प्रोडक्टची लहान साइज ही नजरेत बसणार नाही अशी ठेवली असते. म्हणजे शेल्फच्या अगदी खालच्या बाजूला जिथे सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी ठेवलेली असते.

 

रंगसंगती 

 

trics of mall management 04 - InMarathi
newidea.com.au

एखाद्या प्रोडक्टचा खप वाढवण्यासाठी आकर्षक, सुंदर व सुडौल मॉडेल दाखवले जातातच, पण त्या प्रोडक्टची विक्री करण्याच्या ठिकाणी आकर्षक मांडणी आणि रंगसंगती केली जाते. तुम्ही ज्यावेळी एखादे प्रोडक्ट बघता त्यावेळी तिथे त्या मॉडेलचे पोस्टर तर असतेच पण, तिथे तुम्हाला मुक्तपणे फिरण्यासाठी जागाही सुटसुटीत असते.

 

डिस्काउंट

 

trics of mall management 06 - InMarathi
vouchercodesindia.com

डिस्काउंट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि परवलीचा शब्द आहे. हे दिसले की आपण नको असलेल्या गोष्टीही विकत घेतो. कारण एकच त्यावर डिस्काऊंट असतं. मोठ्या आकारात हे डिस्काउंटचे फ्लेक्स लावलेले असतात. तसेच ज्या गोष्टींवर डिस्काऊंट नसते त्या अत्यंत चालाखीने त्या प्रोडक्टच्या अवती भवती ठेवलेल्या असतात. जेणेकरून तुम्ही त्या घ्याव्यात. ज्यावेळी आपण त्या काऊंटरवर घेऊन जातो त्यावेळी त्यावर डिस्काउंट नसल्याचे लक्षात येतं.

 

आवश्यक वस्तू आणि साइज 

 

trics of mall management 07 - InMarathi
static1.squarespace.com

तुम्ही आवश्यक वस्तुच घेण्यासाठी मॉलमध्ये आलेले आहात. याची पूर्ण कल्पना मॉलच्या मॅनेजर्सना असते. म्हणून ते तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू तुमच्या गरजेपेक्षा जास्त मोठ्या पॅकमध्ये ठेवतात. जेणेकरून त्यांच्या व कंपनीवाल्यांच्याही गरजा पूर्ण व्हाव्यात.

 

मॉलमध्ये गेल्यावर काय टाळावे 

 

trics of mall management 08 - InMarathi
nikkibush.com

तुमच्या खिशातील कमीत कमी पैसे मॉलमध्ये खर्च व्हावेत असं तुम्हाला वाटतं का ? तर मग तुम्ही तुमच्या लहान मुलांना मॉलमध्ये घेऊन जाणे टाळा. तसेच तुमच्या पत्नी किंवा पती बरोबर जाणे ही टाळा ते तुमच्या बजेटपेक्षा जास्त खरेदी करू शकतात.

त्याचप्रमाणे मॉलमधील कार्ट वापरू नका त्यामुळे होते असे की आपण फक्त गरजेपुरती शॉपींग केली तर ती त्यामध्ये अगदी थोडी वाटते उचलण्याचा त्रास नसल्याने आपण सहज ती उचलून पटापट आपल्या कार्टमध्ये टाकतो. घरी गेल्यावर आपल्या लक्षात येते की यातल्या काही गोष्टी आपण वापरणारच नाही आहोत .

 

वेळेचे भानविसरावे अशी व्यवस्था

 

trics of mall management 09 - InMarathi
i4.mirror.co.uk

तुम्ही मॉलमध्ये गेला असालच. पण तिथे शॉपिंग करण्याच्या ठिकाणी तुम्हाला घड्याळ शोधूनही सापडणार नाही. कारण जर तुम्हाला वेळेचं भान आलं तर तुम्ही त्यांना आवश्यक असलेले आणि तुम्हाला क्वचितच आवश्यक असलेले पदार्थ, वस्तू विकत घ्याल म्हणून इतक्या मोठ्या मॉलमध्ये घड्याळाची व्यवस्था केली जात नाही.

तर बघितलत कश्या प्रकारे हे मॉल वाले आपल्याकडून पैसे काढून घेतात आणि तेही हसत हसत… म्हणून यानंतर मॉलमध्ये खरेदी करायला वरील बाबी लक्षात असू द्या… म्हणजे तुमचे पैसे निरुपयोगी वस्तूंवर खर्च होणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?