' TV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो! – InMarathi

TV वर दिसणारा हा क्रमांक अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुम्ही देखील लक्ष दिलं असेल की आपण टीव्ही बघताना अचानक एक नंबर मध्येच आपल्याला दिसायला लागतो. टीव्हीशी किंवा केबल वाल्याशी निगडीत काहीतरी असेल म्हणून बरेच जण त्याकडे दुर्लक्ष करतात,

पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की हा नंबर अतिशय महत्त्वाची कामगिरी बजावतो. चला जाणून घेऊया या मागे काय लॉजिक दडलंय! हे नंबर random पद्धतीने आपल्याला दिसत असतात.

म्हणजे प्रत्येक वेळेस हा नंबर तुम्हाला वेगळा दिसेल. या नंबर्सना क्षेत्र आणि DTH च्या आधारानुसार चॅनेलवर Algorithm केलं जातं. त्यामुळेच टीव्ही वर कोणत्याही कार्यक्रमावेळी हा नंबर दिसून येतो. या नंबरला डिजिटल वॉटरमार्क म्हणतात.

टीव्ही वरच असं नाही तर आजच काल प्रत्तेक ठिकाणी जस कि फोटोज, व्हीडीओज प्रत्तेकावर आपल्याला त्या त्या निर्मात्या संस्थेचा लोगो किवा वॉटरमार्क दिसतो. तो लोगो किवा वॉटरमार्क हा त्या कलाकृतीवर असणारा मालकी हक्क दाखवण्यासाठी असतो.

मोठ मोठ्या कंपनीज ज्या कलात्मक कंटेंट बनवतात ते या गोष्टीचा वापर करतात, आणि काही वाईट प्रकारापासून बचावले जातात. अर्थात आपण बोलतोय तो  वॉटरमार्क वेगळा आहे. या  वॉटरमार्क मुळे बऱ्याच गोष्टी होऊ शकतात.

 

digital-watermark-marathipizza

तुम्हाला ही गोष्ट तर माहित असेलंच की DTH कंपन्या आपल्या ग्राहकांना चालू कार्यक्रम रेकोर्डिंग करण्याची सेवा देतात. पण जेव्हा एखादी व्यक्ती DTH रेकोर्डिंगच्या माध्यमातून किंवा कॅमेऱ्याच्या माध्यमातून एखादा कार्यक्रम रेकॉर्ड करतो तेव्हा हा नंबर देखील त्यात रेकॉर्ड केला जातो.

ज्यावरून त्या व्यक्तीचा माग घेणं सोप्प होतं. या नंबरवरून हे कळतं की व्हिडियो कोठून रेकॉर्ड झाला आहे आणि कोणत्या DTH च्या माध्यमातून रेकॉर्ड झाला आहे.

 

Digital Watermark Inmarathi
ZDNet

कला या विभागात अत्यंत निर्लज्जपणे एखाद्याचा कंटेंट चोरला जातो. तो प्रसारित करून त्यावर पैसे मिळवले जातात तेही मूळ कलाकाराला क्रेडीट न देता.

जस बाकीच्या व्यवसायात किवा कामात त्यांचं साहित्य किवा उत्पादन असतं, तसच कलाकाराचं देखील ते कंटेंट एक प्रोपरटी असते. यावर काहीतरी उपाय हा असायलाच हवा, ज्याने करून अशी चोरी लगेच पकडली जावी.

म्हणजेच समजा एखादा व्यक्ती कार्यक्रमाचे चित्रीकरण करून पैसे मिळवण्याच्या उद्देशाने अनधिकृतपणे ते विकत असेल किंवा तसा त्याचा वापर करत असेल तर ती पायरसी मानली जाते आणि या क्रमांकामुळे पायरेटेड कंटेन्ट बनवणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचणे सोप्पे होऊन जाते.

 

digital-watermark-marathipizza01

तसेच एखाद्या केबल टीव्ही ऑपरेटरने अनधिकृतपणे दुसरा एखादा चॅनेल (जो चालवण्याची त्याला परवानगी नाही) आपल्या नेटवर्क वर चालवला तर त्याची देखील माहिती या क्रमांकाद्वारा मिळवता येते.

जर तुम्ही अश्याच एखाद्या कार्यक्रमाचे चित्रीकरण करून ते सोशल मिडीयावर अपलोड केले आणि त्यात हा नंबर रेकॉर्ड झाला तरी तुमचाही माग हा नंबर काढू शकतो.

म्हणजेच पायरेसीला आळा घालण्यासाठी डिजिटल वॉटरमार्कचा वापर केला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?