दिवाळीच्या फराळा मागचं शास्त्रीय महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग ११

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

मागील भागाची लिंक : Citrus Fruit चे आजवर कोणीही न सांगितलेलं महत्त्व : आहारावर बोलू काही – भाग १०

===

“दिवाळी “हा सण म्हणजे पावसाळा संपुनहिवाळ्याकडे वाटचालीचा काळ. आयुर्वेदानुसार, ६ ऋतुंपैकी हेमंत ऋतुंमध्ये दिपावली येते. मंदावलेली पचनसंस्था पुन्हा जोमाने कार्यरत होते. त्यामुळे या काळात जड, पोषक पदार्थ खायलाच हवेत. ऊलट न खाल्ल्यास वातदोषाचे अधिक्य होवून बद्धकोष्टता, पोटात वायू होणे, असे विकार होतात. हे पदार्थ आहारात समाविष्ट व्हावेत म्हणून हा दिवाळीचा फराळ!!!

 

diwali-faral-marathipizza01
themasalaroute.com

आयुर्वेदीय ग्रंथ “निघंटु रत्नाकर” यामध्ये हे पदार्थ शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे बनवावेत याची माहिती दिली आहे.


===

चकली

 

diwali-faral-marathipizza02
4.imimg.com

उडदाचे पीठ, हिंग, मीठ, बारीक केलेले आले हे सर्व पदार्थ पाण्यात एकत्र घट्ट मळून नंतर त्याच्या वाती करून वर्तुळे करावीत आणि वाफेवर शिजवावीत. नंतर तळावीत.

गुणधर्म

1. ही शुक्रकर( पौरूष शक्ती वाढवणारे) असते.
2. बल्य (पोषक) असते.
3. वाताचे शमन करणारी असते.

===

अनारसे

 

diwali-faral-marathipizza03
madhurasrecipe.com

दोन ते तीन वेळा तांदूळ चांगले धुऊन वाळवावेत. त्यांचे पीठ करून त्यात थोडेसे तूप, गूळ व पाणी घालून मळावे व त्याचे वडे करून एका बाजूने खसखस लावून तुपात तळावे.

गुणधर्म

हे प्रकृतीसाठी थंड असुन रूचीवर्धक (तोंडाला चव आणणारे) असतात. शरीरास पोषक असतात. अतिसार कमी करण्यास मदत करतात.

===

करंजी

 

diwali-faral-marathipizza03
nilons.com

गव्हाचा रवा तुपात भाजून त्यात साखर, वेलची, लवंग, मिरी, नारळ, चारोळ्या, थोडा कापूर मिसळून सारण तयार करावे.

गुणधर्म

हृदयासाठी हितकर आहे. मलप्रवृत्ती सिफ करणारी असल्याने बद्धकोष्टतेमध्ये ऊपयुक्त ठरते. पित्ताचे व वाताचे शमन करणारी आहेत.

===

चिरोटे

 

diwali-faral-marathipizza04
2.sailusfood.com

गव्हाचा रव्याला थोडेसे तूप चोळावे, नंतर पाणी घालून मळून कुटून कुटून मऊ करावा. त्याची सुपारीएवढी गोळी करून कागदासारखी पातळ पोळी लाटावी. अशा तीन पोळ्या कराव्या. एका पोळीवर तूप लावून वरून दुसरी पोळी ठेवावी, त्यावर तूप लावून तिसरी पोळी ठेवावी. हे सर्व तीन पदरी वा चार पदरी दुमडून पट्टी तयार करावी. या पट्टीचे पुन्हा तुकडे पाडावेत. ते पुन्हा पातळ लाटून पुन्हा दुमडावेत व चौकोनी आकाराचे करून तुपात तळून साखरेबरोबर खावेत.

गुणधर्म

वातशामक आहेत.

शुक्रवर्धक आहेत.

यावरून एक तर ध्यानात येते की हे पदार्थ हिवाळ्यातील रूक्षतेने वाढणाऱ्या वातव्याधींपासुन आपले संरक्षण करतात. मात्र तरीही मधुमेहींनी हे खाताना काळजी घ्यावी. आजच्या काळात हे पदार्थ बनवताना आपण थोडी काळजी घ्यायला हवी. जेणेकरून हे पदार्थ ऊपयुक्त ठरतील.

 

diwali-faral-marathipizza05
2.imimg.com

सर्वांनीच हे पदार्थ तयार करतांना, खाताना पुढील काळजी घ्यावी :


१) मैदा, साखर न वापरता तांदुळ, गहु, नाचणी, मुग, ऊडीद या धान्यांचा वापर करावा

२) cold pressed तेल वापरावे किंवा साजुक तुप वापरावे.

३) साखरेऐवजी सेंद्रीय गुळ वापरावा.

४) भुक असेल तेवढेच खावे…! 😀

MarathiPizza.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. MarathiPizza.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. । आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *