कॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखाचं शीर्षक वाचून थोडं आश्चर्यचकित वगैरे झाला असाल ना? हे स्वाभाविकच आहे. कारण आपल्याकडे या गोष्टी सार्वजनिक मंचावर सहसा उघड बोलल्या जात नाहीत. हे बरोबर की चूक? ते प्रत्येकाने वैयक्तिक अनुभवाने ठरवायला हवं. पण आशा धारणांच्या माध्यमातूनच लैंगिक गोष्टींविषयी अज्ञान पसरते आहे हे लक्षात घ्यायला हवे.

स्त्री पुरुष संबंध, लैंगिकता, संततीनियमन या गोष्टींवर मोकळी चर्चा व्हायला हवी.

लेखाचा विषय याच्याशीच संबंधित आहे. आज संततिनियमन आणि सुरक्षित लैंगिक संबंधाचा सर्वात स्वस्त मार्ग म्हणून कान्डोम्स जगभर वापरले जातात. पण त्याच्या वापराबाबत अनेक समज-गैरसमज आहेत. काहीना वाटते त्यांच्या वापरामुळे संभोगातल्या सुखाचा पूर्ण आनंद घेता येत नाही, तर काहींचे म्हणणे असते की कंडोम वापरल्याने लैंगिक शक्तीचा ऱ्हास होतो.

 

condoms-inmarathi
newshunt.com

हे गैरसमज दूर करणारी अनेक संशोधनेही शास्त्रज्ञांनी केली आहेत. पण कॉन्डोमबद्दल आशा काही गोष्टी आहेत ज्या कदाचित तुम्ही आजवर ऐकल्या नसतील. अशाच काही गमतीशीर आणि महत्वाच्या गोष्टी आपण या लेखातून जाणून घेणार आहोत..

१. शास्त्रज्ञ असे म्हणतात की कोन्डोम्स चा वापर इ. स. पूर्व ११, ००० (!) वर्षांपासून होतो आहे. ते म्हणतात की प्राचीन काळातही संततीच्या नियमनासाठी कोन्डोम्स चा वापर होत असे.

 

फ्रांस मधील काही प्राचीन लेण्यांमध्ये त्यांना इतके वर्ष जुनी असलेली कोन्डोम्स ची काही चित्रे सापडली आहेत. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला. म्हणजे आपल्या पूर्वजांना सुद्धा कोन्डोम्स च्या उपयुक्ततेची कल्पना होती तर!

२. सध्या बाजारात मिळणाऱ्या लेटेक्स कोन्डोम्स च्या जाडीबद्दल ग्राहकांच्या तक्रारी असतात असे उत्पादक सांगतात. पण प्राचीन इजिप्शियन लोक कंडोमसाठी प्राण्यांच्या मूत्राशयाचा वापर करायचे.

schlesinger.radcliffe.harvard.edu

त्याचे अवशेष इजिप्तमध्ये उत्खननात सापडले आहेत. त्याचबरोबर माशाची कातडी, चामडे, रेशीम यांपासून बनवलेले कोन्डोम्स सुद्धा प्राचीन काळी वापरले जायचे.

३. कोन्डोमच्या वापरणे लैंगिक संबंधाची सुरक्षितता १०,००० पट वाढत असल्याचा निष्कर्ष एका संशोधनातून काढला गेला आहे. लैंगिक संपर्कातून संसर्ग होणाऱ्या एच आय व्ही सारख्या रोगांपासून वाचण्यासाठी कोन्डोम्स हा सर्वात विश्वासार्ह पर्याय म्हणून समोर आला आहे. स्त्री पुरुष संबंधात इतकी सुरक्षिततेची हमी देणारे कोन्डोम हे एकमेव साधन आहे.

 

condoms2-inmarathi
st1.thehealthsite.com

४. जगात कोन्डोम्स ची जी एकूण विक्री होते त्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के खरेदी ही स्त्रियांनी केलेली असते. भारतात स्त्रियांनी खरेदी केल्याचे प्रमाण कमी असू शकते, परंतु ही आकडेवारी जगाची आहे. सुरक्षितता आणि कोन्डोम्स वापरण्याच्या बाबतीत स्त्रियाही पुरुषांच्या इतक्याच जागरूक आहेत असे यातून दिसून येते.

 

girl-condom-inmarathi
media-exp2.licdn.com

५. चाळीस पेक्षा जास्त वय असणाऱ्या जोडप्यांमध्ये कान्डोम्स वापरण्याबद्दल कमालीची उदासीनता दिसून येते. याची करणे वेगवेगळी आहेत. यामागेही बरेच गैरसमज आहेत. पण वय वाढत गेल्यानंतर लोक कान्डोम्स वापरात नाहीत असा हा निष्कर्ष आहे. सरासरी २५ % जोडपी कोन्डोम्स चा नियमित वापर करतात.

 

durex-inmarathi
designersagainstaids.com

६. एकोणिसाव्या शतकात जर्मन सैनिकांना कोन्डोम्स अधिकृतपणे मिल्ट्री प्रशासनाकडून वाटले जात असत. १९२७ ते १९३१ या कालावधी दरम्यान अमेरिकन सैनिकांनाही अधिकृतपणे कोन्डोम्स वाटले गेले आहेत. याचा उद्देश प्रामुख्याने एच आय व्ही आणि तत्सम दुर्धर रोगांची सैन्यात लागण होऊ नये हा होता. एवढेच नव्हे तर त्यांचा वापर वाढवा यासाठी छापील साहित्य, घोषवाक्ये यांचाही प्रशासन वापर करत असे.

 

condoms-military-inmarathi
cdn.24.co.za

 

=====

=====


७. गमतीचा भाग म्हणजे वॅलेंटाइन डे हा अमेरिकेत कान्डोम्स च्या विक्रमी विक्रीचा दिवस ठरला आहे. अमेरिकेत या दिवशी प्रती सेकंदाला तब्बल ८७ कोन्डोम्स वापरले गेले आहेत. भारतातही या दिवशी कोन्डोम्स चा खप वाढल्याचे विक्रेते सांगतात.

 

velentine-inmarathi
t4.ftcdn.net

८. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा हा, की कोन्डोम्स वापरल्याने तुमच्या लैंगिक सुखात किंचितही बाधा येत नाही. National Survey of Sexual Health and Behavior या संस्थेने केलेल्याअ सर्वेक्षणात असे दिसून आले की कोन्डोम्स वापरणारे लोक प्रणयाच्या बाबतीत न वापरणाऱ्या लोकांच्या इतकेच समाधानी होते.

 

condom-655x353-inmarathi
st1.thehealthsite.com

त्यामुळे कोन्डोम्स वापरल्याने सेक्स चा आनंद घेता   येत नाही हा ऐकीव माहितीवर पसरलेला गैरसमज आहे ज्याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही.

लोकसंख्येची वाढ आणि लैंगिक रोगांचे वाढते प्रमाण हा आपल्यासाठी चिंतेचा विषय राहिला आहे. या दोन्ही समस्यांचा सामना करायचा असेल तर कोन्डोम्स बद्दल प्रबोधन करणे आणि त्याचा वापर वाढवण्याचा प्रयत्न करणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “कॉन्डोमबद्दल कुणालाच माहिती नसणाऱ्या काही गमतीशीर तर काही महत्वाच्या गोष्टी

  • March 10, 2018 at 7:23 pm
    Permalink

    छान माहिती मिळाली चांगला लेख आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?