' मेरठच्या या लेडी सिंघमचं कर्तृत्व पाहून थक्क व्हाल! – InMarathi

मेरठच्या या लेडी सिंघमचं कर्तृत्व पाहून थक्क व्हाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

बी. चंद्रकला ह्या २००८ पासून Indian Administrative Service (IAS) च्या सदस्य आहेत. त्या अतिशय प्रामाणिक व मेहनती आयएएस ऑफिसर म्हणून प्रसिद्ध आहेत.

आयएएस जॉईन करण्या आधी बी. चंद्रकला ह्या ८ जून २०१४ ते १४ ऑक्टोबर २०१४ पर्यंत District Magistrate (DM) होत्या. १२९ दिवस डीएम म्हणून काम केल्यानंतर त्यांची बदली झाली आणि त्या मथुरा जिल्ह्याच्या दुसऱ्या महिला डीएम झाल्या.

 

b chandrakala 1 InMarathi

 

त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९७९ साली झाला. त्या मुळच्या आंध्र प्रदेशच्या आहेत. त्यांना दोन भाऊ व एक बहिण अशी भावंडे आहेत. त्यांची मातृभाषा लांबडी आहे.

त्यांनी भूगोल ह्या विषयात हैद्राबाद येथील ओस्मानिया विद्यापीठातून बी.ए. केले आहे तसेच अर्थशास्त्रामध्ये एम. ए. केले आहे. त्या सोशल मिडीयावर सुद्धा अतिशय सक्रीय आहेत.

 

b chandrakala InMarathi

 

असे म्हणतात की, राज्याचे प्रशासन चांगले असेल तरच शासन चांगले राहील. देशासाठी काम करणारे अधिकारी सक्षम, प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष असतील तरच देशाचे कामकाज व्यवस्थित चालते व देशाचे कल्याण होते.

एखाद्या जिल्ह्याची संपूर्ण जबाबदारी जिल्ह्याच्या डीएम वर असते आणि जर जिल्ह्याचा डीएम जर कर्तव्यनिष्ठ असेल तर जिल्ह्याचे काम अगदी व्यवस्थित चालते.

प्रामाणिकपणा, जबाबदारीची जाणीव, धैर्य, हुशारी हे चार गुण माणसाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी, प्रगती करण्यासाठी मदत करतात. आयएएस अधिकारी बी.चंद्रकला ह्यांच्याकडे हे चारही गुण आहेत.

 

b chandrakala 2 InMarathi

 

म्हणूनच त्या एक सक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या कामाप्रती त्यांची निष्ठा व त्यांच्या मेहनतीमुळे त्यांचा सर्व लोक आदर करतात. त्यांच्या कामाची पद्धत व काम पूर्ण करण्याचा सपाटा बघून त्यांची जिथे जिथे पोस्टिंग होते, तिथे तिथे लोक त्यांचा सन्मान करतात.

सध्या बी. चंद्रकला ह्या मेरठच्या जिल्हाधिकारी आहेत. त्याची कामाची शिस्त व कामाप्रती निष्ठा व समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायक आहे. मेरठ आधी त्यांनी हमीरपुर, मथुरा आणि बुलंदशहर ह्या जिल्ह्यांसाठी डीएम म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.

आयएएस मध्ये निवड होण्यासाठी चंद्रकला ह्यांनी अत्यंत मेहनत घेतली आहे. भरपूर संघर्ष केला आहे. त्या २००८ सालच्या batch च्या युपी केडर मधून सिलेक्ट झाल्या होत्या. बी. चंद्रकला ह्यांनी ह्या परीक्षेत ४०९वे स्थान प्राप्त केले होते. त्या बीए च्या दुसऱ्या वर्षाला असतानाच त्यांचा विवाह रामुलू ह्यांच्याशी झाला. त्यांचे पती डेप्युटी एक्झीक्युटीव्ह इंजीनियर आहेत.

 

b chandrakala 3 InMarathi

 

त्यांनी आयएएसचा अत्यंत कठीण असा अभ्यास घर व त्यांची लहान मुलगी ह्या दोन्हींना सांभाळून केला. त्यांच्या मुलीची काळजी घेण्यात व त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा म्हणून त्यांचे पती त्यांना मदत करत असत. त्यांच्या पतीने त्यांना सपोर्ट केला म्हणूनच त्यांना सिव्हील सर्विसेस ची परीक्षा देण्याची उर्जा व प्रेरणा मिळाली.

 

b chandrakala 4 InMarathi

 

त्यांनी जिल्ह्याच्या विकास कार्यात भ्रष्टाचार करून अडथळे आणणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध मोर्चेबांधणी केली. हीच पुढे त्यांची ओळख बनली. बी. चंद्रकला ह्यांच्यासमोर कुठलेही गैरव्यवहार व भ्रष्ट तसेच गैर कृत्य चालत नाही अशीच त्यांची ख्याती झाली.

विकासासाठी असलेल्या त्यांच्या दृष्टिकोनामुळे तसेच विकासकार्यामुळे त्या महिलावर्गात विशेष लोकप्रिय आहेत. त्यांनी सामान्य जनता व स्वतःमधील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला.

 

b chandrakala 5 InMarathi

 

आपण सामान्य नागरिकासाठी काम करतो हा त्यांचा दृष्टीकोन जेव्हा जनतेच्या लक्षात आला, तेव्हा त्या जनतेमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय झाल्या.

मध्यंतरी त्यांचा एक व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता. त्यात त्या भ्रष्ट व काम नीट न करणाऱ्या लोकांना कडक शब्दात समज देत आहेत असे दिसून येते. त्यांनी ह्या अधिकाऱ्यांना असे फैलावर घेतले की परत त्यांची कुठली चूक करण्याची हिंमत होणार नाही.

 

B.-Chandrakala-marathipizza02
starsunfolded.com

 

असे प्रामाणिक आणि सक्षम तसेच कर्तव्यदक्ष अधिकारी जर भारताच्या प्रत्येक जिल्ह्याला मिळाले तर भारताची स्वप्नवत प्रगती होईल. देशाचे वर्तमान व भविष्य दोन्ही सोन्यासारखे होईल व त्या दिवशी देशातील सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने सुखी व समाधानी होईल!

पण हे असे होणे अतिशय कठीण आहे कारण दुर्दैवाने भारताला भ्रष्ट, अहंकारी, कर्तव्याची जाण नसलेले, आपण अधिकारी आहोत म्हणून काहीही करू शकतो अशी विचारसरणी असलेल्या अधिकाऱ्यांचीच संख्या जास्त लाभली आहे.

बी. चंद्रकला ज्यांना काही लोक ‘दीदी’ म्हणतात तर काही लोक ‘लेडी सिंघम’ असेही म्हणतात, त्यांच्यासारखेच अधिकारी भारतातील सर्व जिल्ह्यांना लाभणे हे सध्या तरी सामान्य भारतीय नागरिकाचे स्वप्नच आहे कारण अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांची संख्या भारतात अतिशय कमी आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?