पाचगणीच्या ‘या’ गेस्ट हाऊसमध्ये फ्री मध्ये राहा पण एका अटीवर

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा निवांत वेळ काढावा म्हणून आपण बऱ्याचदा गेस्ट हाउसचा पर्याय निवडतो. छानपैकी एक दिवस आराम करायचा, थोडा निसर्गाच्या सानिध्यात फेरफटका मारायचा आणि प्रसन्न मनाने घरी परतायचं. पण सध्या गेस्ट हाउसमध्ये राहायला जायचं म्हटलं की त्यांचे अव्वाच्या सव्वा दर पाहून दहादा विचार करावा लागतो. पण पाचगणी सारख्या मोस्ट फेव्हरेट डेस्टिनेशनवर एका गेस्ट हाउसमध्ये संपूर्ण दिवस फ्री मध्ये राहायला मिळालं तर?

हो! बिलकुल फ्री…! विश्वास बसत नाही तर मग पाचगणीच्या ‘LA Maisaon’ या गेस्ट हाउसला जरूर भेट द्या. या गेस्ट हाउसमध्ये तुम्ही एक रुपया देखील नं देता राहू शकता. पण यासाठी एक अट मात्र ठेवण्यात आली आहे. ती अट म्हणजे तुम्हला फक्त ३ तास organic अर्थात सेंद्रिय शेती करायची आहे…!

=====

=====


la-maison-marathipizza01

स्रोत

ही सुपीक कल्पना ज्या व्यक्तीच्या डोक्यातून निघाली त्या स्त्रीचं नाव आहे, ‘लॉरन्स इराणी’.

मुंबई मधील रोजच्या धावपळीच्या जीवनाला कंटाळून लॉरेन्स आपला पती ‘मेहरदाद’ आणि पाच महिन्यांच्या मुलीसोबत पाचगणी येथे स्थायिक झाली आणि येथे तिने सुरु केले 4 गेस्ट रूम असणारे एक लहानसे हॉटेल ‘LA Maisaon’.

 

la-maison-marathipizza02

स्रोत

त्यांना इतर सामान्य गेस्ट हाउसप्रमाणे आपलं गेस्ट हाऊस सुरु करायचं नव्हतं. आपल्या गेस्ट हाऊसमागे एखादी नाविन्यपूर्ण संकल्पना असावी अशी त्यांची इच्छा होती. विचार करता करता त्यांना गवसली ‘WWOOFing’  नावाची आगळीवेगळी संकल्पना!

या संकल्पने अंतर्गत ‘LA Maisaon’ मध्ये येणारा कोणताही व्यक्ती अगदी फ्री मध्ये गेस्ट हाउसमध्ये राहू शकतो. यासाठी त्या व्यक्तीला ‘LA Maisaon’ मध्ये तयार करण्यात आलेल्या ओर्गेनिक फार्म हाऊसमध्ये दिवसाचे तीन तास काम करायचे आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या लोकांना ‘WWOOFers’ असे म्हटले जाते.

 

la-maison-marathipizza03

स्रोत

सध्या समाजामध्ये एक असा वर्ग निर्माण होत आहे जो स्वत:च्या समस्यांची सार्वजनिक समस्यांशी सांगड घालून एकाच वेळी दोन्ही समस्यांवर उपाय शोधण्याचे कार्य करतो आहे.

‘LA Maisaon’ चालवणारे हे इराणी दांम्पत्य त्या काही लोकांपैकीच एक आहेत. त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांना गेस्ट हाउस मधून पैसा देखील मिळत आहे आणि सोबतच सेंद्रिय शेती जोपासून ते चांगला संदेश समाजापर्यत पोचवत आहेत.

 

la-maison-marathipizza04

=====

=====

स्रोत

तुम्हाला देखील LA Maisaon चा आनंद लुटायचा असेल तर lamaisonbnb@gmail.com या इमेल आयडीवर तुम्ही या इराणी दांम्पत्याशी संपर्क साधू शकता.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 75 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?