जातीआधारित आरक्षण : आजही अत्यंत आवश्यक आणि पूर्णपणे योग्यच
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
आरक्षण ह्या विषयावर काहीही बोलायचं किंवा लिहायचं म्हणजे हल्ली जरा अवघडच झालं आहे. यामधून आरक्षण विरोधी किंवा आरक्षण समर्थक अशा दोन्हीकडच्या लोकांच्या शिव्या खायला मिळण्याचाच संभव अधिक कारण मी आरक्षण समर्थक नाही तसाच सरसकट आरक्षण विरोधकही नाही.
पण मी यावर बरंच वाचलं आहे (चर्चा करण्यापेक्षा का कोण जाणे मला हा मार्ग जास्त भरवशाचा वाटतो) आणि आरक्षणाची गरज मला पटलीही आहे.
आपल्या संविधानात आरक्षणाची तरतूद नक्की का आहे? ह्याचे माझ्या अल्पमतीला झालेले आकलन मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते सर्वथैव बरोबरच आहे असा माझा दावा नाही. तरी वाचणाऱ्यांनी स्वत:च्या विवेकाचा वापर करावा.
सर्वसाधारणपणे आरक्षण समर्थनाची भूमिका घेणे तुम्हाला पुरोगामी म्हणून सादर करते आणि बऱ्याच लोकांना स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणे आवडते. पण एखादी भूमिका घेण्यापूर्वी आपण पुरेसा अभ्यास, विचार, चिंतन केलेलं असाव लागतं.
तसं बरेच लोक करत नसल्याने आरक्षण समर्थन करताना ते बऱ्याच वेळा हास्यास्पद विधानं करतात यातून त्याची अक्कल तर दिसून येतेच पण एकूण पुरोगामित्वाला हि बाध येते. (हे फक्त आरक्षणच नाही तर इतर सर्वच महत्वाच्या, गंभीर विषयांबाबत खरे आहे )
फेसबुक वर एक असेच तथाकथित पुरोगामी विचारवंत हल्लीच माझ्या वाचनात आले. आता हे पहिल्यांदाच स्पष्ट करतो कि मी यांना व्यक्तीशः ओळखत नाही आणि माझा यांचा काही परिचय नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल कोणतीही अढी किंवा वैरभाव माझ्या मनात असण्याचे कारण नाही शिवाय हा लेख केवळ त्यांच्या विचारांना प्रत्युत्तर म्हणून लिहिलेला नाही.
फक्त त्यांचे आरक्षण या सारख्या गंभीर विषयावरचे विचार (पक्षी मुक्ताफळे ) वाचून ते आणि त्यांच्या सारख्या स्वयंघोषित नवपुरोगाम्यांना उद्देशून हा लेखन प्रपंच करण्याला चालना मिळाली. तर खाली त्यांचे आरक्षणासंदर्भातले विचार धन दिलेले आहे.
“मागासवर्गियांना मिळणाऱ्या सवलतीबद्दल बोलताना अनेक लोक म्हणतात की कबूल की आमच्या पूर्वजांनी यांच्यावर अन्याय केला असेल. परंतु आता तर तो होत नाही ना? वास्तवात हे विधानसुद्धा बरोबर नाही.
पण क्षणभर कल्पना करू की हे विधान बरोबर आहे. मग आता सर्वाना समान वागणूक का देण्यात येऊ नये? आम्ही चांगले गुण मिळवले तरी आम्हाला प्रवेश का नाकारला जावा?
…
सर्वांनासमान वागणूक आज मिळते हे विधानसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करते. परंतु हे ही गृहीत धरले तरी एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. वाडवडिलां तर्फे वारसाहक्कात जशी संपत्ती मिळते तशीच त्यांची पापे ही स्वीकारावी लागत असतात. संपत्ती घेऊ पण पापात भागीदार होणार नाही अशी भूमिका चालू शकत नाही.”
हा एक चुकीचा युक्तिवाद आहे. वारसाहक्काने जमीन जुमला, संपत्ती, कर्ज, दावे, भांडण मिळतात – पाप, पुण्य नाही.
जर का पूर्वजांनी केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून आजच्या पिढीतील खुल्या प्रवर्गातील गुणवान विद्यार्थ्याला डावलले गेल्याचं समर्थन होणार असेल, तर मग धर्म, पाप, पुण्य, प्रारब्ध, प्राक्तन, गतजन्मीचे सुकर्म किंवा कुकर्म ह्या खोट्या भ्रामक आणि आपल्या संविधानाने निग्रहाने नाकारलेल्या संकल्पना स्वीकाराव्या लागतील.
आणि कुठल्याही गोष्टीचे, विशेषतः अन्यायाचे समर्थन म्हणून मग पूर्वजन्मीची पातकं, पापं ह्यांचा दाखला दिला जाऊ लागेल.
आरक्षणामागील भारतीय संविधानाची भूमिका इतकी तकलादू, भंपक नाहीये. ती समजत नसेल तर आपल्या तोकड्या अकलेद्वारे अन त्याहून तोकड्या आकलनाद्वारे ती इतरांना समजावून सांगण्याचा अव्यापारेषु व्यापार करू नये.
दारिद्र्य, विपन्नावस्था, गुलामी, मागासलेपणा ही तितकी भयानक गोष्ट नाही जितकी ‘आपण दारिद्र्यात, गुलामीत आहोत आणि आपल्याला यातून हरप्रयत्नाने बाहेर पडलेच पाहिजे ही जाणीवच नसणे’ ही आहे.
आपल्या समाजातला एक फार मोठा वर्ग पिढ्यानुपिढ्या सामाजिक, धार्मिक गुलामीत, दारिद्र्यात, अज्ञानात खितपत पडला आहे. ही गुलामी त्या समाजाच्या हाडीमाशी इतकी भिनली आहे की आपण माणूस आहोत आणि आपल्याला माणसाप्रमाणे जगायचा आणि माणसाच्या वाटेला येणारी सुख दु:ख भोगायचा.
तसेच पशुतुल्य जीवन आणि पशूंच्याच वाट्याला येणाच्या लायकीच्या यातना, भोग नाकारायचा अधिकार आहे ही जाणीवच त्यांच्या मधून नाहीशी झालेली आहे.
ह्या वर्गामध्ये फक्त महार मांग चांभार अशा जातीच नसून संख्येने जवळपास ५०% असणारा स्त्री समाजही आहे.
एक काही प्रमाणात ब्राह्मण स्त्रियांचा थोडा अपवाद सोडला तर (तो सुद्धा २० व्या शतकाच्या उत्तरार्धातला, त्याआधी ब्राह्मण समाजातल्या स्त्रियांची स्थिती सुद्धा इतर जातीतल्या स्त्रियांसारखीच, कदाचित त्यांच्या पेक्षा जास्त दयनीय होती.
सती, केशवपन, विधवेला पुनर्विवाह बंदी, जरठ-कुमारी विवाह (केवळ बाल विवाह नव्हे ) अशा अन्याय कारक प्रथांच्या चरकातून ब्राह्मण स्त्रियांना पिढ्यानुपिढ्या जावं लागलेलं आहे.
बहुसंख्य स्त्रिया आजही पुरुषी मानसिकता, धर्म, समाज, दुष्ट-अनिष्ट रूढी ह्यांच्या जोखडात बंदिस्त झालेल्या दिसतात. त्यातून बाहेर पाडण्याकरता त्यांना प्रेरणा, मदत मिळत नाही.
गरिबी, दारिद्र्य, आर्थिक- शैक्षणिक मागासलेपण हा काही फक्त मागास जातींचा मक्ता नाही. माझ्या स्वतःच्या परिचयाची असंख्य ब्राह्मण, ckp, मराठा कुटुंब अशी गरीब आहेत.
पण त्यांना आपल्या गरिबीची, मागासलेपणाची जाणीव आहे, आपली ही अवस्था आपल्या पूर्व जन्माच्या पापाने किंवा नशिबाने नाही याची प्रकट नाही पण स्पष्ट जाणीव त्यांना आहे आणि यातून बाहेर पडण्याची गरज आणि मार्ग त्यांना माहिती आहे.
त्यांचे प्रयत्न तसे चालू आहेत. मी काय म्हणतो हे तुम्हाला एका उदाहरणावरून कळेल.
माझ्या बायकोच्या – वसूच्या लहानपणी, नगरला पुष्पाताई म्हणून एक बाई स्वयपाक करायला यायच्या त्या जातीने ब्राह्मण, घरची गरिबी, नवरा भिक्षुकी चालत नाही म्हणून एका कापड दुकानांत नोकरी करायचा आणि ह्या चार घरी पोळ्या लाटत. त्यांचा मुलगा कृष्णा कधी कधी माझ्या सासऱ्यांच्याकडे येई.
पण तो कधीही आईला कामात मदत करायला येत नसे कि त्याला घरातलं इतर काम पुष्पाताई करू देत नसत.
हा मुलगा हुशार होताच पण त्याला आपल्या आई वडलांच्या परिस्थितीची, ते उचलत असलेल्या कष्टांची जाणीवही होती. तो पुढे इंजिनियर झाला ते पण मद्रास I.I.T. मधून आणि आता पुण्यात एका नामांकित कंपनीत नोकरी करतो.
त्याची बायको सुद्धा इंजिनियर आहे आणि लग्नानंतर तिने M.Tech.केले. तिला ह्या पुष्पाताईंनी, कृष्णाने कधीही विरोध केला नाही तर उलट प्रोत्साहनच दिले.
आज ही आमचे त्यांचे चांगले घरोब्याचे संबंध आहेत आणि आज ते समाजात चांगला मानसन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून आहेत.
त्याचं आणि माझ्या सासुरवाडीतलं मालक नोकर हे नातं केव्हाच इतिहासजमा झालं. मला हे काही माहित नव्हतं, लग्नानंतर भेट झाली तेव्हा मला ते सासऱ्यांच्या प्रतिष्ठित मित्रपरीवारातले एक वाटले. जेव्हा वसूने त्यांचा इतिहास सांगितला तेव्हा मला कौतुक वाटलं (आश्चर्य नाही).
पुष्पाताई आणि कृष्णा ह्याचं उदाहरण प्रातिनिधिक आहे अपवादात्मक नाही.
याउलट एक उदाहरण सांगतो.
मी लक्ष्मिनगरला राहत असताना आमच्याकडे कांबळे बाई म्हणून एक बाई घरकामाला यायच्या, नंतर त्यांची मुलगी शारदा त्यांच्या बरोबर येऊ लागली. पुढे ती शारदा आमच्या कडे कामाला येई आणि कांबळे बाई इतरत्र जात.
पुढे शारदा मोठी (म्हणजे १४ -१५ वर्षांची) झाल्यावर तीचं लग्न झालं आणि कांबळे बाईची दुसरी मुलगी संगीता येऊ लागली. ही ७-८ वर्षांची गोड मुलगी होती. तिचं सगळ शिक्षण आम्ही करतो, पण तिला या वयात काम करायला पाठवू नका असं वडीलांनी सांगून पाहिलं.
पण झालं इतकंच की कांबळे बाई आमच्याकडे येऊ लागल्या आणि संगीता कामाला इतरत्र जाऊ लागली!
ती आजही पोरवडा सांभाळत घरकामं करते आणि बहुधा तिच्या मुली तिचाच कित्ता गिरवतात. तिचे भाऊ ही तसेच, एक बागकाम करतो तर दुसरा मजुरीची कामं करतो, बिगारीची काम करतो.
हेही उदाहरण प्रातिनिधिकच आहे. अपवादात्मक नाही.
मी सध्या जिथे राहतो तिथे कामाला येणाऱ्या लक्ष्मीबाई आणि अनुसया ह्या माय लेकींची कहाणी फार वेगळी नाही.
विचार करा पुणे, अहमदनगर या सारख्या शहरात जिथे शिक्षणाचे फायदे उघड उघड डोळ्यांना दिसतात तिथे या मागास जातीमध्ये एव्हढा अंधार आहे तर गाव खेड्यात काय अवस्था असेल.
तुम्ही नीट आठवून पहा, पूर्वी अनेकांना घरी स्वयंपाककामाला ब्राह्मण बायका लागत. (ही एक विचित्र मानसिकता आहे पण इथे तो मुद्दा नाही.) आणि साधारण ३०-३५ वर्षांपूर्वी त्या सहजगत्या मिळतही.
पण आज घरकामाला ब्राह्मण स्त्री सहजगत्या मिळत नाही. (इथे मी चूक असू शकतो. कारण आम्ही कामाला बाई जात बघून ठेवत नाही. पण आम्हाला घरकामाला जेव्हा बाई हवी असते तेव्हा काम मागायला येणाऱ्या बायकात ब्राह्मण एकही नसते.)
तर सांगायचा मुद्दा एव्हढाच की –
गरिबी, दारिद्र्य, शिक्षणाची कमतरता हे मागासलेपणाचं मूळ कारण नाही. गतानुगतिकता आणि स्वतःच्या पशुतुल्य जिन्दगिच्या जाणीवेचा अभाव हे आहे.
मूल, मग ते मुलगा असो वा मुलगी, जरा ७-८ वर्षांचे झाले की त्याला पैसे कमावायच्या मागे लावले जाते. बालपण, शिक्षणाचा हक्क ह्यागोष्टी फक्त सरकारी योजनात, कागदावर राहतात.
दिवस भर अंगमेहनतीचं काम करून रात्री शाळेत जाणारी ह्यांच्यातली काही मुलं डोळ्यात झोप, कष्ट करून दुखणारे लहानगे हातपाय आणि एव्हढे कष्ट करून ही अर्धवटच भरलेली पोटाची खळगी घेऊन काय कपाळ शिकणार?
पुष्पाताईंचा कृष्णा हा भाग्यवान. त्याला गरीब का होईना पण डोळस आणि समजूतदार आई बाप मिळाले. ज्यांना मुल म्हणजे ७व्या ८व्या वर्षापासून काम करून चार दिडक्या कमावणारं यंत्र वाटतं त्यांनी आणि त्यांच्या पोरांनी उज्ज्वल भवितव्याची स्वप्न बघायला लागणारे दिव्य चक्षु कुठून उसनवारी आणायचे!
मुलांना दुपारचं खायला मिळेल म्हणून मुलांना शाळेत पाठवले जाते आणि मुलांनी शाळेत यावे म्हणून शासनाला दुपारची खिचडी एक प्रलोभन म्हणून द्यावी लागते. यातच सगळं आलं.
एवढ्या सगळ्यातून कसंबसं कोणी १०वी १२वी झालं तर पुढे उच्च शिक्षण साठी प्रवेश घेताना त्याला थोड झुकतं माप दिलं तर बिघडलं कुठे?
इतक्या प्रतिकूल परिस्थितीतून मिळालेले ५०-५५% आणि कोचिंग क्लास लावून मिळालेले ८५% यांचा सामना बरोबरीचा आहे असं आपण कसं काय म्हणणार?
शतकानुशतकाच्या अंध:कारातून बाहेर येऊ पाहण्याचा प्रयत्न करू पाहणाऱ्या ह्या थोड्या लोकांना मिळणारा शासनाचा, समाजाचा, स्वकीयांचा प्रतिसाद किती थंड असतो हे काय मी नव्याने सांगावे? शासकीय अनस्था, भ्रष्टाचार, अनागोन्दिवर काही वेगळे लिहिण्याची गरज नाही.
भारतीय लोकशाही ही काही एकमेव किंवा पहिलीच लोकशाही नाही. आधुनिक लोकशाहीची जन्मभूमी – युरोप – तिथेही लोकशाही रुजायला काही शतकं जावी लागली आणि सुरुवातीला त्यांच्या समाजातल्या बुद्धिवादी, विचारवंत अशा ज्यांना एलिट क्लास म्हटले जाते त्यांच्या हातात मतदानाचा अधिकार आणि पर्यायाने सत्तेची धुरा होती.
अगदी इंग्लंड मध्ये स्त्रियांना मताधिकारासाठी मोठा लढा उभारावा लागला जी सफ्फ्रागेट चळवळ म्हणून प्रसिद्ध आहे आणि स्त्रियांना मताधिकार दुसऱ्या महायुद्ध वेळी मिळाला. २०० वर्षांच्या परिपक्व लोकशाही नंतर.
तीच गोष्ट अमेरिकेची. २० व्या शतकाच्या उत्तरार्धात सुद्धा तेथील काळ्या लोकांना समान अधिकार आणिस्वातंत्र्यासाठी किती संघर्ष करावा लागला याचा इतिहास जेव्हढा उर्जस्वल आणि रोमांचक आहे तितकाच तो रक्तरंजीतही आहे.
१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण सर्वाना जाती, धर्म, पंथ, भाषा, लिंग निरपेक्ष मतदानाचा अधिकार देऊन लोकशाहीच्या मूळ प्रवाहात आणले आहे.
पण मताधिकार म्हणजे काय? लोकशाही म्हणजे नक्की काय? सरकार स्थापनेपासून ते सरकार बदलण्यामध्ये निर्णायक भूमिका गाजवण्याचा अधिकार म्हणजे काय? आपल्या हातात दिलेल्या या शक्तीचा वापर कसा करायचा आणि का करायचा?
– हे सर्व समजायला इथल्या बहुसंख्य मागास समाजाला वेळ लागणार आहे.
सर्वांना निर्णय प्रक्रियेत सामावून घेऊन आपण रक्तरंजित संघर्ष जो एरव्ही अटळ ठरला असता तो टाळला आहे. देश एकसंध ठेवण्यात यश मिळवले आहे, ही एक मोठी उपलब्धी आहे.
हजारो वर्ष धर्म रूढी परंपरा ह्यांच्या नावाखाली गुलामीत काढल्यामुळे दुर्बल आणि अज्ञ राहिलेल्या ह्या आपल्या बांधवांना आपल्याला सुरुवातीला थोड झुकतं माप द्यावच लागेल.
त्यांना स्पर्धा करण्याची किमान अर्हता मिळवायाची संधी आणि त्याकरता लागणारा वेळ द्यावा लागेल.
मला माहिती आहे कि ज्या गुणवंत विद्यार्थ्यांना संधी नाकारली गेली आहे त्यांना हे पटणार नाही. मला ही सुरूवातीला पटलं नव्हतं. मला १०वि ला ८५% मार्क होते पण मला पुण्यातल्या चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही ,म्हणून मी असाच चरफडलो होतो.
त्याच सुमारास माझे वडील पक्षाघाताचा झटका येऊन अंथरुणाला खिळले. नोकरी सोडावीच लागली. पेन्शन मिळाली ४५०० रु. आई आधीच संधीवाताने आजारी असल्यामुळे चांगली भारतीय वायुसेनेतली नोकरी सोडून घरी बसली होती. तिला १८०० रु पेन्शन होती.
मोठी बहिण मतीमंद आणि अर्धांगवायुने आजारी. महिन्याच्या घरखर्चात आणि त्यांच्या औषधं पाण्याच्या खर्चातच पेन्शन संपून जात असे. माझ्या शिक्षणाचा खर्च कोण उचलणार?
अशावेळी आमच्या सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबावर अचानक दारिद्र्यात ढकलले जाण्याची वेळ आली. अगदी अन्नान्नदशा झाली नाही एव्हढच.
अशावेळी मी टाटा मोटर्स मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून लागलो. ते केवळ त्यांच्याकडून ४५० रु विद्यावेतन, फुकट जेवण, वसतिगृहात राहायाला मिळे, शिवाय ४ वर्ष पूर्ण केल्यानंतर कामगाराची नोकरी मिळे म्हणून.
पण त्याही परिस्थितीत मला आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीची आणि त्यातून बाहेर पाडण्यासाठी काय कराव लागणार आहे याची स्पष्ट कल्पना होती.
त्यामुळे मी नोकरी सांभाळून शिक्षण पूर्ण केले आणि टाटा मोटर्स मध्येच पदोन्नत्या घेतल्या. याला कष्ट आणि बराच वेळ जाऊ द्यावा लागला.
मी अगदी मानभावीपणे वरचे विचार मांडतो आहे असे वाटू नये म्हणून आत्मस्तुतीचा दोष पत्करून स्वतःबद्दल हे लिहिलेलं आहे.
कष्ट मी केले तसे हे मागास राहिलेले लोक ही करतात. पण कष्ट आणि हमाली यात फरक असतो आणि तो त्यांना कळायला काही काळ जाऊ द्यावा लागणार आहे. आरक्षण देऊन क्वचित, काही प्रसंगी लायकी किंवा योग्यतेशी तडजोड करून आपण गुणवत्तेशी फारकत घेतो हे मला कळते. पण
भारतीय समाज / लोकशाही फक्त गुणवानासाठी नाही ती सर्वांना अधिकाधिक गुणवान करण्यासाठी आहे.
भारताला स्वतंत्र करण्यासाठी असंख्य ज्ञात अज्ञात लोकांनी सर्वस्वाचा त्याग केला तो या ५००० पेक्षा अधिक वर्षे जुन्या असलेल्या आपल्या समाजासाठी, संस्कृतीसाठी.
आज तशी सर्वस्वाचा होम करण्याची वेळ आपल्यावर आलेली नाहीपण थोडा त्याग करायला काय हरकत आहे?!
खरं तर त्याग म्हटला की उपकाराची भावना येते. पण मला तसं म्हणायचं नाही. माझ्या आजारी आई बाबांसाठी आणि बहिणीसाठी मला अनेकदा तडजोडी कराव्या लागल्या. पण तो त्याग नव्हता – ते माझं कर्तव्य होते आणि त्यांचाही तो अधिकारच होता.
अगदी हेच कर्तव्य आपलं आहे, मागासबांधवांप्रती. आरक्षण ह्याच कर्तव्य भावनेतून आहे. आणि ते योग्यच आहे.
===
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.
अप्रतिम विचारप्रवर्तक लेख.
हे किती दिवस चालणार?
Correct, swthacha magasalepana zakayacha faslela prayatna ahe ha
is it possible to give some time limit say only 2 generations …..
तुमच्या आधीच्या लेखात मुस्लिमांबद्दल मांडलेली परखड आणि विषयाला न्याय देणारी तुमची भूमिका इथे थोडी गड्बडलेली दिसते आहे किंबहुना तुम्हाला सांगायचे असलेला मुद्दा आणि दिलेल्या ब्राम्हण मुलाचे उदाहरण तर बिल्कूलच साम्य धरत नाही
आम्हाला काही आरक्षणाला विरोध किव्वा समर्थन करणारे नाही पण ज्या सध्या अस्तिवात असलेल्या जाती नुसार आरक्षणाला तुम्ही समर्थन देत आहात त्याऐवजी जर तुम्ही आथिर्क परिस्तिथी नुसार आरक्षण काळाची गरज आहे तर तुमचा मुद्दा समाजण्यासारखा होता
उदाहरण द्यायचे असल्यास माझा एक नातेवाईक अतिशय गरीब परिस्तितीत काम करून फीस चे पैसे जमा करून शिक्षण घेतो आहे तो हि कुठल्याहि आरक्षणाशिवाय आनि माझ्या सोबत किव्वा तुमच्या सोबत पण असतील कि ज्यांची आथिर्क परिस्तिथी अतिशय भक्कम असूनही फक्त जातीच्या आधारावर फुकटात शिक्षण घेत आहे आणि सरकारी कार्यलयात लायकी नसतांनाही, (परीक्षेत मिडालेले मार्क लक्षात घेता) नोकरी मिडवत आहे
अजून एक मुद्दा
तुमचे बाकी सर्व मुद्दे जरी बरोबर मानलेत आणि जातीच्या आधारित आरक्षणावर जर शिक्षण घेतांना सवलत दिली तर मग तो मूख्य प्रवाहात आला तर मग त्याला नौकरी मिडवण्यासाठी कशाला हवे आरक्षण
जर दोन विद्याथी इंजिनीयर झालेले आहे (कुणी आरक्षण च्या भरवश्यावर तर कुणी आपल्या बुद्धीने) तर मग त्याच्यात काय तफावत राहते तरीही मग तुमच्या सारख्या बुद्धिजीविना आरक्षणाचा इतका पुडका का
Ekdm correct… jya gharat 3-4 mul ahet tyana fkt 2 nach reservation dil paije.. n jativr aarakshan nkoch ahe.. aarakshan fkt deserve asnaryanchya jaga lubadnyasathi faydeshir ahe.. mhnje gadhavane waghach katad ghalun mirvav as ahe.. practically tyat waghacha ekhi gun nsto..
Kiran and other commenters who are supporting reservation based on economic condition and not on caste, I have only one question, would you marry a girl from reserved category who is so called rich because of reservation. If your answer is yes then stop reservation immediatly. If not then please understand that the reservation is not to make rich but it is to make you of equal status.
आरक्षण जर आर्थिक परिस्थिती वर दिल असत तर कोणती लोक(कोणत्या जातीची) लोक उत्पनाचे दाखले घेऊन रांगेत सर्वात पुढे असते.
आणि जे भटक्या जमाती आहेत त्यांना कधी आरक्षण भेटलं असत
Ani jyala khrch grj ahe to ahe ka reservation chya flow mde… br te pn thik ahe .. jyala 3-4 mule ahet tyana ka br reservation paije.. 3-4 mul astil tr fkt 1 la dya na tumhi reservation.. ugach je layak ahet tyanch nuksan ka br… n haal ky fkt caste walyanch hotat as fix ahe ky?? Opn walyankde ky zad astat ky paishachi…n kai lokana jamini distat opn caste walyanchya?? Mla sanga tya jaminit kay apoap yet ka utpann.. shivay tyat environment conditions ahetch ki nuksan kraylla.. je boltat na..tyani kdi shetat pay thevla ky vichara..ugach fuktcha fayda milto te gheun bhukt nka bsu ki hyanchya kde satta ahe jamini ahe etc etc… n khalchya caste walyankde ky jamini naiet kay…aaj chya velet konalach reservation deu nka… talent should be considered as reservation..n clss ch bolta tumhi ..cls mde ky fkt opn walyanchi ch por jatat ky.. n dusri gosht ashi ki saglech opn wale cls joining krtat as nai.. aare 60 years reservation deun pn reservation chi grj lagte yavrun bgha … reservation mule stdy fkt eka ch samjala krava lagto .. tyamule talent he tyatch vadnar ahe.. ult reservation mule aplyala ky kmi mark asle tri chaltay hach vichar mant yenar..sagle opn kiva caste mde hushar kiva mathh ahet asehi nai na..pn jyala kharch grj ahe to tr asach tukar giri krt firtoy.. fkt matdanasathi caste walyankde lksh det ahet tyanchya pragatikde nai..
जशी भारताला U N सेक्युरिटी कौन्सिल चे सदस्य होता आलं असतं तेव्हा भारताने ते पद नाकारले आणि आज भारताला त्याचा पश्चातप होतो. तसेच काही वर्गांना सुद्धा तेव्हा आरक्षण दिले होते पण त्यांनी तेव्हा ते नाकारले. आज पश्चाताप करतायेत. ह्या वर्गाला आज त्याची किंमत कळली. त्यांना आज हे समजले की आरक्षण काय आहे आणि ते काय करू शकते.
उच्च उत्पन्न गटात मोडणाऱ्या दलितांना आरक्षण बंदी का नसावी कारण त्यांच्यात तर वैचारिक मासागलेपणा नसणार ना? आणि हे लोक गरीब दलितांचा हक्क नेहमी मारतात. पण या लॉबी पुढे सरकार नेहमी झुकत आणि क्रेमिलयेर ची मर्यादा वाढवली जाते.
आरक्षण हे आर्थिक निकष लावून देण्याचं प्रयोजन संविधानात नाही. खुल्या प्रवर्गासाठी ebc सवलत आहे.
स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त जागा ह्या खुल्या प्रवर्गाच्याच असतात. आता पदोन्नतीमधून पण आरक्षण राहणार नाही. आपापल्या seniority नुसार pramotion होईल. आज पण खेडेगावात sc आणि इतर जातींना खालच्या दर्जाची वागणूक मिळते. हे भीषण सत्य आहे.
साहेब, आपल्या सारखे प्रेमळ लोक फार कमी आहेत. आरक्षण हे एखाद्या मागास जाती/जमातीला प्रतिनिधीत्व मिळवून देण्यासाठी आहे. जेनेकरुन त्यांचं standard ऑफ living वाढावं, समाजात सन्मान व्हावा, शिक्षणाचा टक्का वाढावा. जो बौद्ध समाज 100 वर्षांपूर्वी समाजाच्या मूळ प्रवाहापासून वंचित होता तो आता प्रवाहात येत आहे. हे आरक्षण असल्यामुळे शक्य आहे.
हे सगळे आत्ता पर्यंत बरोबर होत, परंतु आता जन्म झाल्या पासुन आधार कार्ड नोंदणी, जोडणी होत आहे, प्रत्येक व्यक्ती, कुटुंब यांची आर्थिक स्थिती सरकार ला लगेच कळते, हे वास्तव समोर दिसत असतांना का बरे जाती साठी आरक्षण ठेवावे. ते आता संपुर्ण पणे आर्थिक निकषांवरच असायला हवे.
खरंच sir अगदी बरं वाटलं तुमचे आरक्षणा बद्दलचे मत ऐकून …
महत्वाचं ह्या काही लोकांनी आरक्षणाचा गैर अर्थ काढला आहे ..
तुमच्या ह्या वरच्या काही उदाहरणात अगदी आरक्षण अस का आहे ? आणि का द्यावं ? व कुणाला द्यावं?
पण दुर्दैव एकच की ह्या विषयाला लोकं सहज घेतात …
आणि आरक्षण हा विषय सहज घेऊन न सुटणारा आहे ..
त्याला तुमच्या इतुका विचारवन्त आणि धर्याशील व्यक्ती महत्व असायला पाहिजे …
असो … विचाराने माणूस घडतो माणसाने विचार नाही ..
जो जसा विचार करतो तसा तो घडतो ..
आता समजावणार तरी कोणाला ..?
जातिआधारीत आरक्षण हे जातीअंतच्या लढाई मध्ये बाधा आणत आहे हे सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे, खरे पाहता आरक्षणाला विरोध असण्याचं कारण नाही पण आपण समाजात जेव्हा पाहतो की पिढ्या न पिढ्या एकाच कुटुंबातील व्यक्ती आरक्षणाचा उपभोग घेऊन आपल्याच जातीतील दुसऱ्या गरजू बांधवा वर अन्याय करत आहेत तेव्हा मनात आस वाटण साहजिक आहे की आरक्षण जातीवर आधारित परंतु आर्थिक स्थितीवर आधारित पण असावं, उदाहरणार्थ ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेऊन आपली आर्थिक उन्नती साधली आहे व उच्च पदावर कार्य करत आहेत त्यांना आरक्षणाची गरज नाहीये त्यांना आर्थिक निकषावर आरक्षणातून बाहेर ठेवण्यात आलं तर सर्व समाजच भल होईल आणि गरिबी निर्मूलन झाले तसेच समाज संस्कारी झाला तर बरेच प्रॉब्लेम सुटतील.
परंतु यात गोची अशी आहे की जाती घट्ट ठेवून आपली राजकीय पोळी भाजून घेणार्यांना हे परवडणार नाही त्यामुळे या प्रकरणात समाज पेक्षा राजकारणच जास्त आडवं येत आहे.
परिपूर्ण पटेल अशी माहिती नाही
आणि 70 वर्षात त्याना हमालीतील फरक नाही कळणार मग अजून कधी कळणार
त्यासाठी बाबासाहेबानी स्वतः 30 वर्षाची कालावधी ठरवलं होतं कारण आज जी परिस्तिथी समाज्यात आहे याचा त्याना परिपूर्ण अंदाज होता
पण काही मतांचे राजकारण करणार्यांनी त्याची लायकी दाखून आज पर्यत समाजात फुटच पडली आहे
कुठे तरी आपण हे थांबवायला हवं
जय शिवराय
आरक्षण ह्यावर अजून माहिती आहे का??