' जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती – InMarathi

जगप्रसिद्ध पेनिसिलीनच्या शोधाची कहाणी-करायला गेले गणपती, झाला मारुती

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

लेखिका: निकिता घोगरे

===

आज प्रत्येक व्यक्तीला पेनिसिलीनचे नाव माहीत आहे. एक वेळ अशी होती जेव्हा हे औषध संसर्गजन्य रोगांचे मध्ये देखील वापरलेले जात होते.

शरीरातील सूज बरी करण्यासाठी आणि संसर्ग बरा करण्यासाठी या औषधांचा वापर करण्यात आला होता.

ही पहिली अँटीबायोटिक औषध होती जी बऱ्याच काळासाठी वापरली गेली.

ही औषधी नोबेल पारितोषिक विजेते स्कॉटिश शास्त्रज्ञ अलेक्झांडर फ्लेमिंगला यांनी शोधून काढली होती.

त्यांचा जन्म पाश्चिम स्कॉटलंड येथील लॉकफील्डफार्म येथे झाला. सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ब्रिटनचे जीवशास्त्रज्ञ, औषधतज्ञ होते. त्यांनी लावलेल्या अप्रतिम शोधामागे एक गोष्ट आहे.

 

alexander-flemming-inmarathi
pinterest.es

१९०६ मध्ये वैद्यकशास्त्राचे पदवी मिळविल्यानंतर या शास्त्रज्ञाने प्रतिजैविकांवर काम करायला सुरुवात केली. त्यानंतर, अलेक्झांडर फ्लेमिंग रॉयल आर्मी मेडिकल कॉप्स मध्ये गेले.

पहिले महायुद्ध संपल्यानंतर १९१८ मध्ये तो सेंट मेरी शाळेत परत गेला आणि प्रतिजैविक पदार्थांवर काम करायला सुरुवात केली.

तर गंमत अशी, ते शोध लावायला गेले एक आणि लागला भलताच, याला म्हणता येईल ‘करायला गेलो गणपती आणि झाला मारोती’.

असे अनेकांच्या बाबतीत घडते. मात्र काही वेळेस हा मारोती एवढा बहुउपयोगी ठरतो, की वाटायला लागतं की, बर झालं गणपती झाला नाही तेच. नाही तर या शोधासाठी अजून काही शतके वाट पाहावी लागली असती.

आपण ज्याबद्दल बोलतोय त्या आहेत चुका. एखादा शोध लावताना झालेल्या चुका.

सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे स्कॉटलंडमधील अतिशय बुद्धिमान संशोधक होते. पण त्यांची प्रयोगशाळा मात्र अत्यंत अव्यवस्थित असे. ते जखम भरण्यासाठी एका औषधाचा शोध लावण्याचा प्रयन्त करत होते. मात्र अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना यश आले नाही.

३ सप्टेंबर १९२८ रोजी फ्लेमिंग काही दिवसांच्या सुटीनंतर प्रयोगशाळेत काम करण्यासाठी परतले.

 

penicilline-inmarathi
businessinsider.in

सुटीवर जाण्यापूर्वी त्यांनी स्टॅफायलोकोकाय जातीच्या जीवाणूंच्या प्लेट्स टेबलवर ठेवल्या होत्या. फार काळ तशाच राहिल्याने त्यांना बुरशी आली होती. त्यामुळे वैतागून त्यांनी सर्व संशोधनाची सामग्री बाहेर फेकून दिली.

मात्र काही दिवसांनी त्यांना लक्षात आले की, ज्या ठिकाणी ही सामग्री फेकली तेथील सर्व बॅक्टेरिया नष्ट झाला होता.

बुरशीच्या लगतचे स्टॅफायलोकोकायचे जीवाणू नष्ट झाले आहेत, परंतु बुरशीपासून लांब असणारे जीवाणू मात्र तसेच आहेत.

पुढील संशोधनातून फ्लेमिंग यांनी या बुरशीपासून तयार होणाऱ्या आणि जीवाणूंना नष्ट करणाऱ्या पदार्थाला नाव दिले पेनिसिलीन. आणि अँटिबायोटिक्स युगाचा जन्म झाला.

१९४० पर्यंत आपल्याकडे सूक्ष्म रोगजंतूंविरुद्ध लढण्यासाठी कोणतेच अस्त्र नव्हते. कोणत्याही प्रकारच्या जंतूसंसर्गामुळे मृत्यू घडत होते.

जगज्जेत्या नेपोलीयनचे सैन्य गारद करणाऱ्या जीवाणूंना (बॅक्टेरिआ) रोखण्यासाठी पेनिसिलीनचा शोध महत्वाचा ठरला.

त्यानंतर टेट्रासायक्लिन, स्ट्रेप्टोमायसिन, सिप्रोफ्लोक्सासिन आणि अशा अनेक अँटिबायोटिक्सची फलटणच तयार झाली. त्यानंतरच्या काळात जादुई उपाय समजून अँटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात अनिर्बंध वापर केला गेला.

अँटिबायोटिक्सचे जेवढ्या मोठया प्रमाणात फायदे आहेत तेवढ्या प्रमाणात तोटेही.

 

The-Invention-of-Penicillin-inmarathi
oldpikz.com

सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी आपल्या पुढील संशोधनातून जगाला सावध केले होते की, अँटिबायोटिक्सच्या चुकीच्या वापरामुळे अँटिबायोटिक्स रेसिस्टंस (प्रतिरोध) निर्माण होऊ शकतो.

या औषधासाठी अलेक्झांडर फ्लेमिंग, फ्लोरो आणि जेन यांना नोबेल पुरस्कार देण्यात आला होता. यावरून फ्लेमिंगचे नाव जगामध्ये पसरले आहे.

या महान वैज्ञानिकाने १९५५ मध्ये निधन झाले. आपण त्यांचे योगदान कधी विसरू शकणार नाही.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?