भगवान विष्णूचं “सर्वात मोठं मंदिर” भारताबाहेर आहे! आणि त्याचा इतिहास खूपच रोचक आहे!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

आपल्या देशामध्ये विविध जाती – धर्माचे लोक राहतात. त्यामुळेच आपल्या देशात विविध संस्कृत्ती पाहायला मिळतात. आपल्या देशामध्ये विविध धर्माचे लोक राहतात, त्यामुळे आपल्या देशात वेगवेगळ्या धर्मांची धर्मस्थळे देखील पाहण्यास मिळतात. जसे आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या धर्माची धर्मस्थळे आहेत, तसेच जगातील इतर देशांमध्ये देखील हिंदू धर्माची धर्मस्थळे आहेत. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात प्रसिद्ध हिंदू धर्माच्या मंदिराबद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया, या प्रसिद्ध मंदिराबद्दल..

 

Angkor wat temple.Inmarathi
timetravelturtle.com

हे मंदिर कंबोडियामध्ये स्थित आहे आणि हे मंदिर आंग्कोर वाट मंदिर नावाने संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे. आंग्कोर वाट दक्षिण – पूर्व आशियाच्या सर्वात महत्त्वपूर्ण पुरातत्व स्थळांमधील एक आहे. जो शक्तिशाली समेर साम्राज्यानंतर कितीतरी शतके घनदाट जंगलामध्ये लपलेला होता. या मंदिराला १२ व्या शतकामध्ये खमेर वंशाचा राजा सूर्यवर्मन द्वितीयने तयार केले होते. या मंदिराचे प्राचीन नाव यशोधरपूर होते. राजा सूर्यवर्मन खूप धार्मिक विचारांचे राजा होते आणि त्यांची आस्था भगवान विष्णूमध्ये होती. त्यामुळे त्यांनी हे मंदिर भगवान विष्णूंना समर्पित करण्याच्या उद्देशाने तयार केले होते.

हे मंदिर तयार करण्यामागे एक प्रमुख कारण अमर होण्याचा लोभ होता. असे म्हटले जाते कि, राजा सूर्यवर्मन हिंदू देवी – देवतांची पूजा – अर्चना करून अमर बनू इच्छित होता. त्यामुळे त्याने आपल्यासाठी या मंदिराच्या स्वरूपात पूजा स्थळ बनवले, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांची पूजा होत असे.

 

Angkor wat temple.Inmarathi1
pneumatherapist.com

पण या मंदिराच्या बाबतीत कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी प्रचलित आहे, अशी मान्यता आहे कि, देवराज इंद्राने आपल्या मुलासाठी महल म्हणून या मंदिराला बनवले होते. तिथेच १३ व्या शतकामध्ये एका चीनी यात्रीचे म्हणणे होते कि, या मंदिराचा निर्माण फक्त एका रात्रीत कोणत्यातरी अलौकीक शक्तीच्या हातून झाले होते. पण खरेतर या मंदिराचा इतिहास बौद्ध आणि हिंदू धर्माशी जोडलेला आहे.

काय आहे मंदिराचा इतिहास ?

जगाच्या इतिहासामध्ये आंग्कोर वाट मंदिराचा संबंध प्राचीन काळातील कंबोदेश, ज्याला आज कंबोडिया नावाने ओळखले जाते. या मंदिराचा हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी संबंध होण्याचे कारण याच्या इतिहासामध्ये लपलेला आहे. इतिहास सांगतो कि, जवळपास २७ शासकांनी कंबोदेशावर राज्य केले होते, ज्यामधील काही हिंदू होते, तर काही बौद्ध होते. हेच कारण आहे कि, संशोधकांना आजही कंबोडियामध्ये हिंदू आणि बौद्ध दोन्ही धर्माशी जोडलेल्या मूर्ती मिळत आहेत.

 

Angkor wat temple.Inmarathi2
realholidays.co.uk

आता पाहिले तर कंबोडियामध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या खूप जास्त आहे, त्यामुळे येथे ठिकठिकाणी भगवान बुद्धच्या मूर्ती पाहायला मिळतात. पण आंग्कोर वाट येथील एकमात्र असे स्थान आहे, ज्यामध्ये ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या देखील मुर्त्या एकसाथ आहेत. एवढेच नाही तर आंग्कोर वाट मंदिराची विशेष हे देखील आहे कि, विष्णू देवांचे हे सर्वात मोठे मंदिर आहे. या मंदिराच्या मोठमोठ्या भिंतींवर रामायण आणि महाभारत पवित्र धर्मग्रंथाशी जोडलेल्या गोष्टी यावर कोरण्यात आलेल्या आहेत.

खरेतर हे मंदिर भगवान शंकराला समर्पित होते, काही वेळानंतर येथे भगवान विष्णुंची पूजा होऊ लागली. पण जेव्हा बौद्ध धर्मावलंबियांनी हे स्थान काबीज केले, तेव्हापासून येथे बौद्ध धर्माचे आराध्य दैवत अवलोकीतेश्वरची पूजा होते. १४ वे शतक येता – येता येथे बौद्ध धर्माच्या शासकांचे शासन आहे आणि या मंदिराला बौद्ध रूप देण्यात आले.

 

Angkor wat temple.Inmarathi3
speakingtree.in

वर्ष १९८६ पासून वर्ष १९९३ पर्यंत भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागाने आंग्कोर वाट मंदिराच्या संरक्षणाचा वाटा उचलला होता. १२ व्या शतकामध्ये बनवण्यात आलेल्या या मंदिराला जगाच्या इतिहासाचा वारसा लाभलेला आहे.

आज हे मंदिर जगातील सर्वात प्राचीन प्रसिद्ध हिंदू मंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर खूप भव्य आणि सुंदर आहे आणि इतिहासाचा मोठा वारसा या मंदिराला लाभलेला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?