भारतातील सर्वात मोठ्या ‘गेमचेंजर’ बोगद्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या खास गोष्टी!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भारतातील सर्वात मोठ्या बोगद्याचे अनावरण केले. जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेला हा बोगदा भारतासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता आहे असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे. चला तर मग जाणून घेऊया एवढं काय विशेष आहे या बोगद्याबद्दल!

 

shrinagar-tunnel-marathipizza
timesofindia.indiatimes.com

या बोगद्यामुळे चेनानी आणि नाश्री या दोन प्रदेशांमधील अंतर जे पूर्वी ४१ किमी होतं, ते आता केवळ १० किमी एवढं कमी झालं आहे. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी हा बोगदा येत्या काळात भारतासाठी गेम चेंजर ठरेल असा ठाम विश्वास व्यक्त केला असून याबद्दल त्यांनी सर्व टीमचं कौतुक केले.

जेव्हा बर्फवृष्टीमुळे किंवा अतिवृष्टीमुळे रस्ते बंद होतात, त्या काळात हा बोगदा प्रवाश्यांसाठी अतिशय मोलाचे काम करणार आहे.

या बोगद्याची एकूण लांबी तब्बल ९ किमी एवढी आहे, याच वैशिष्ट्यामुळे हा भारतातील सर्वाधिक लांबीचा बोगदा ठरला आहे.

 

shrinagar-tunnel-marathipizza01
ndtv.com

या बोगद्यामुळे अंतर कमी झाल्याने दर वर्षी ९९ करोड रुपयांच्या इंधनाची बचत होणार आहे. म्हणजेच अंदाजे दर दिवशी २७ लाख रुपये किंमतीचे इंधन वाचवता येईल.

या बोगाद्यामुळे जम्मू आणि श्रीनगर मधील प्रवास हा सुखकर होणार आहे. ज्यामुळे पर्यटनाला देखील चालना मिळेल.

हा बोगदा भारतातील सर्वात पहिला आणि जगातील सहावा असा बोगदा आहे ज्यामध्ये ‘ट्रांसवर्स वेंटिलेशन सिस्टम’ बसवण्यात आली आहे. ज्यामुळे बोगद्याध्ये ताजी हवा खेळती राहील. जास्त लांबीच्या बोगद्यामध्ये अशी सिस्टम असल्यास प्रवाश्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत नाही.

 

shrinagar-tunnel-marathipizza02
hindustantimes.com

हा बोगदा बनवण्यासाठी तब्बल २,५१९ करोड रुपयांचा खर्च आला आहे. आशिया मधील सर्वात लांबीच्या बोगद्यांमध्ये या बोगद्याचा समावेश होतो. हा बोगदा म्हणजे २८६ किमी लांबीच्या जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गाचा अविभाज्य भाग आहे.

या बोगाद्यामुळे जम्मूवरून श्रीनगरला जायला लागणारा वेळ देखील कमी झाला आहे. पूर्वी जेवढा वेळ लागायचा, त्यापेक्षा दीड तास आधी प्रवाशी पोचू शकतील.

 

shrinagar-tunnel-marathipizza03
dailyindianstatus.com

या बोगद्यामध्ये एकूण १२४ सीसीटीव्हि कॅमेरे बसवलेले आहेत. त्यात अधिक भर म्हणून अॅडव्हान्स स्कॅनर देखील लावण्यात आलेले आहेत. चालकांना गाडी चालवताना कोणताही त्रास होऊ नये तसेच समोरचे दृश्य स्पष्ट दिसावे म्हणून थ्री टीअर लाइटिंग सिस्टम देखील बसवण्यात आली आहे.

सर्वात खास गोष्ट म्हणजे या बोगद्यामध्ये मोबाईल नेटवर्कमध्ये कोणतीच अडचण येणार नाही. सर्वच प्रमुख कंपन्यांचे मोबाईल नेटवर्क बोगद्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

 

shrinagar-tunnel-marathipizza04
jknewstoday.com

म्हणूनच – हा बोगदा म्हणजे भारतीय परिवहन युगातील नवी क्रांती म्हणावा लागेल!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतातील सर्वात मोठ्या ‘गेमचेंजर’ बोगद्याबद्दल तुम्हाला माहिती नसलेल्या खास गोष्टी!

  • April 4, 2017 at 7:27 pm
    Permalink

    Very useful & interesting information.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?