' “जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा – InMarathi

“जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक” असणाऱ्या अवलियाची अत्यंत प्रेरणादायी कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पाश्चिमात्य जग चमत्कारानं भरलेलं आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्यामध्ये पाश्चिमात्यांचा हातखंडा आहे. आधुनिक वैज्ञानिक शोध म्हणा किंवा मोटिवेशन म्हणजेच मन सक्षम करण्यासंबंधीचे शोध पाश्चात्य जगाला अवगत झाले. हे का झाले? तर त्यांनी एक ध्यास घेतला, आपला समाज विज्ञाननिष्ठ करण्याचा.

अनेक मोठमोठे उद्योजक पाश्चात्य मातीतून पुढे येऊ लागले. फेसबुक, ऍपल अशी बडी नावं समोर येऊ लागली. या सर्वांनीच शून्यातून विश्व निर्माण केले आहे.

 

europe-buisnessman-inmarathi

आपण अशाच एका अवलियाची प्रेरणादायी कथा जाणून घेणार आहोत.

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक होते. पण एका अवलियाने त्यांना मागे टाकले. त्या अवलियाचे नाव आहे जेफ बेजोस.

होय, Amazon चे संस्थापक जेफ प्रेस्टॉन बेजोस.

===

हे ही वाचा कोट्यावधींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे CEO पाळतात “ही” खास दिनचर्या..

===

amazon-inmarathi

 

जेफ यांनी नोकरी सोडून amazon.com ची स्थापना केली. जेफ बेजोस जगातील अशा व्यक्तीमत्वांपैकी एक आहेत ज्यांनी लोकांच्या आयुष्यावर प्रभाव टाकला आहे.

आज आपण सहज ऑनलाईन शॉपिंग करतो. आज अनेक साईट्स उपलब्ध आहेत. पण लोकांच्या खरेदीची ही पद्धत जेफ बेजोस यांनी बदलली आहे.

तुम्हाला काही हवे असल्यास ऑनलाईन मागवा, वस्तू तुमच्या दाराशी चालत येते, तेही बाजारभावाच्या तुलनेत स्वस्त दरात. ही सवय जेफ यांनी लोकांना लावली.

जेफ बेजोस यांचा जन्म १९६४ साली न्यू टेक्सासमध्ये झाला. जेफ यांचे आजोबा जमीनदार होते. त्यांच्याकडे १०१ किलोमीटर जमीन होती.

 

jeff-bezos-inmarathi

जेफ यांचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या आईचे वय १७ वर्ष होते. ते १८ महिन्यांचे असतानाच त्यांचे वडील त्यांना सोडूल गेले. त्यानंतर ते त्यांच्या सावत्र वडीलांच्या छत्रछायेखाली वाढले व आजोबांकडे राहून टेक्नॉलॉजी अवगत केली. जेफ सुट्टीत टेक्सासला जायचे व आपल्या शेतात काम करायचे. याच दरम्यान विज्ञानाबद्दल त्यांची रुची वाढली.

लहान मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात. जेफ लहान असताना एक स्क्रूड्रायव्हर घेऊन स्वतःचा पाळणा उघडण्याचा प्रयत्न करायचे.

जेव्हा ते थोडेसे मोठे झाले तेव्हा त्यांना वीजेच्या उपकरणांमध्ये रुची निर्माण झाली. आपला लहान भाऊ आपल्या परवानगीशिवाय आपल्या रुममध्ये येऊ नये म्हणून त्यांनी एक इलेक्ट्रिक अलार्म बनवला.

ते चौथीत होते तेव्हा त्यांच्या शाळेत मेनफ्रेम कंप्युटर आला आणि कोणत्याही शिक्षकांना कंप्युटर चालवता येत नव्हता.

तेव्हा त्यांनी मित्रांसोबत मिळून मॅन्युअल वाचून कंप्युटर चालवायला शिकले. कोणास माहित होते की हा चुणचुणीत मुलगा पुढे जाऊन कंप्युटरवर उत्पादनाची विक्री करेल व जगातला सर्वात मोठा उद्योजक होईल.

पुढे त्यांनी प्रिंसटन विश्वविद्यालयात भौतिक विज्ञानाचे शिक्षण करण्यासाठी प्रवेश केला. पण काही दिवसातच त्यांनी रुची कमी झाली आणि त्यांनी कंप्युटर सायंसमध्ये मोर्चा वळवला व इलेक्ट्रॉनिक इंजीनियरिंग आणि कंप्युटर सायंसमध्ये डीग्री मिळवली.

त्यांनी चांगली नोकरी सोडून व्यवसायात झेप घेतली. पण त्याआधी १९९४ मध्ये त्यांनी न्यूयॉर्क ते सिएटलपर्यंत संपूर्ण देशाचे भ्रमण करुन amazon.com ची स्थापना केली. भ्रमण करतानाच ते amazon ची योजना आखत गेले आणि लिहित गेले.

 

jeff-inmarathi

या कंपनीचा आरंभ त्यांनी आपल्या गॅरेजमधून केला. सुरुवातीला जेफ बेजोस इंटरनेटच्या माध्यमातून पुस्तकांची विक्री सुरु केली आणि मग नंतर इतर वस्तूंच्या विक्रीची सुरुवात झाली. amazon.com च्या बळावर ते एक प्रमुख डॉट-कॉम उद्योजक झाले आणि अरबपती सुद्धा झाले.

२००४ मध्ये त्यंनी ब्ल्यू ओरिजिनल नावाची एक स्टार्ट अप कंपनी स्थापन केली. त्यांना अंतरिक्ष विज्ञानात सुद्धा रुची आहे.

२०१३ मध्ये त्यांनी वाशिंगटन पोस्ट विकत घेण्याची घोषणा केली होती. तसेच गुगलमध्येही त्यांचे शेअर्स आहेत. जेफ प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे पाळतात. त्यामुळे त्याचं असं म्हणणं आहे की कंपनीत प्रत्येक गोष्ट सुरळीतपणे झाली पाहिजे.

आज amazon जगातील अग्रगण्य ऑनलाईन शॉपिंग कंपनी आहे.

याचं कारण म्हणजे जेफ ह्यांची निष्ठा, त्यांचे कष्ट आणि काहीतरी वेगळं करुन दाखवण्याची त्यांची तळमळ आणि अर्थात त्यांचे सहकारी व कर्मचार्‍यांची साथ…

===

हे ही वाचा छोट्याश्या गॅरेजपासून सुरुवात करून जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्यापर्यंतचा प्रवास!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?