' आज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे! – InMarathi

आज भारत वा बांग्लादेश कोणीही जिंको, पण खरा विजय भारतीय नौदलाने मिळवला आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

 

क्रिकेटच्या मैदानात पाकिस्तान विरुद्धच आपलं वैर तुम्हाला काही वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. असचं अजून एक वैर गेल्या २-४ वर्षांमध्ये भारताविरुद्ध क्रिकेटच्या मैदानात उदयाला आलंय, आणि तो देश म्हणजे आपला शेजारी बांग्लादेश! गेल्या काही काळात या दोन देशांमध्ये क्रिकेट सामना असला की सोशल मिडियावरील तापमान लगेच तापतं, दोन्ही देशाचे समर्थक एकमेकांवर आगपाखड करतात, व्यंगचित्रांच्या माध्यमातून एकमेकांवर शाब्दिक, जिव्हारी लागणारी चिखलफेक करतात.

ind-vs-ban-marathipizza
deccanchronicle.com

आयसीसी चॅम्पीयन्स ट्रॉफी मध्ये पुन्हा एकदा सेमी फायनलच्या लढतीत भारत आणि बांग्लादेश एकमेकांसमोर उभे ठाकतील. गेल्या वेळच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी बांग्लादेश उत्सुक असेल, तर आपला भारत नेहमीप्रमाणे त्यांना चीतपट करण्यासाठी सज्ज असेल. असो या लढाईत जे होईल ते होईल, पण आज क्रिकेटच्या मैदानाबाहेर भारताने आपल्या शेजाऱ्याला मदतीचा हात दिलाय आणि सर्वांची माने जिंकली आहेत!

सध्या बांग्लादेश मोरा चक्रीवादळाचे तडाखे सहन करतोय. बांग्लादेशच्या दक्षिण पूर्व भागात या चक्रीवादळाने होत्याच नव्हत केलंय. भूस्खलन आणि पुरामुळे अतिशय नुकसान झाले आहे. लाखो बांग्लादेशी नागरिक निराधार झाले आहेत. या चक्रीवादळामुळे अंदाजे १३७ लोकांना आपले प्राण गमवावे लागल्याची देखील बातमी आहे.

mora-cyclone-marathipizza01
ptinews.com

३० मे रोजी बांग्लादेशच्या किनाऱ्यावर धडकलेल्या या वादळाचा जोर हळूहळू ओसरत असून जवळपास ५ लाख लोकांना सुखरूपपणे सोडवण्यात आले असून सर्वच समुद्र किनाऱ्यावरील मानवी वस्तींना सुरक्षितपणे हलवण्यात आले आहे.

चितगाव, बंदरबन आणि रंगमती या जिल्ह्यांची या चक्रीवादळामुळे सर्वात जास्त हानी झाली आहे. अश्या या कठीण परिस्थितीमध्ये बांग्लादेशसमोर मदतीचा पहिला हात पुढे केला तो भारताने! भारतीय नौदलाने मिळालेल्या आदेशानुसार अतिशय तत्परतेने बांग्लादेशच्या दिशेने कूच करत तेथील सर्व परिस्थिती आपल्या हातात घेतली आणि बांग्लादेश सैन्याच्या मदतीने कित्येकांचे प्राण वाचवले आणि अजूनही दिवसरात्र त्याचं रेस्क्यू मिशन सुरु आहे हे विशेष! हे काम म्हणजे आपलं कर्तव्य आहे असे मानून भारतीय नौदल शेजाऱ्यांना सावरण्यास सहाय्य करीत आहे.

चक्रीवादळाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय नौदलाने पहिले आणि सर्वात महत्त्वाचे रेस्क्यू ऑपरेशन राबवले, आणि भारतीय नौदलाच्या सुमित्रा जहाजाच्या माध्यमातून चितगाव पासून १०० मैलावर समुद्रामध्ये अडकलेल्या २७ लोकांची सुटका केली.  भारतीय नौदलाच्या पूर्व शाखेने देखील आपले P-81 हे विमान या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये रुजू केले आहे.

लोकांचा शोध घेणे आणि त्यांची सुटका करणे हे काम येथील खराब हवामानामुळे म्हणावे तेवढे सोपे नाही, पण तरीही जीवाची बाजी लावून प्रत्येक व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न भारतीय नौदल करत आहे.

mora-cyclone-marathipizza02
ptinews.com

असेच संकट २००७ साली बांग्लादेश वर आले होते, ज्यामध्ये १२७ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतरचे हे सर्वात मोठे संकट आहे.

आज भारत आणि बांग्लादेश यांच्यामध्ये करो या मरोची लढाई आहे, कारण जो जिंकेल तो पाकिस्तान सोबत फायनलसाठी लढत देईल. त्यामुळे दोन्ही संघ खेळताना एकमेकांवर कोणतीही दयामाया दाखवणार नाहीत हे खरे, पण दुसरीकडे निसर्गाविरुद्धच्या खऱ्या सामन्यात दोन्ही देश हातात हात घालून लढताना दिसत आहेत ही गोष्ट दोन्ही देशांसाठी नक्कीच अभिमानाची आहे नाही का?

सर्व तंटे, वाद बाजूला ठेवून शेजारी संकटात असताना त्याच्या मदतीला धावून जाणाऱ्या भारतीय सैन्याला मानाचा सलाम!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?