डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

समाजव्यवस्थेने ज्यांना नाकारले त्यांना संघटीत करून जगण्याचा नवा मार्ग दाखवणारा महामानव आपल्या भारताच्या नशिबी आला हेच आपले सौभाग्य! डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच आयुष्य आजही जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला प्रेरणा देतात. त्यांचे विचार आजही लाखो लोकांच्या मनात क्रांतीची मशाल पेटवतात. अश्या या थोर व्यक्तिमत्त्वाबद्दल आजही कित्येक लोकांना काही महत्त्वाच्या गोष्टी माहिती नाहीत. चला तर जाणून घेऊया, त्यांच्या जीनप्रवासातील काही महत्त्वाच्या घटना:

 

dr-babasaheb-ambedkar-marathipizza01

स्रोत

=====

=====


१४ एप्रिल १८९१: मध्यप्रदेश राज्यातील इंदोर जिल्ह्यामध्ये महू या गावी एका गरीब कुटुंबात बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. ते १४ वे अपत्य म्हणून जन्माला आले.

१९०१-१९०४: हिंदू-महार जातीतील असल्याकारणाने एक अस्पृश्य म्हणून त्यांना अतिशय त्रास सहन करावा लागला. ते ज्या शाळेत जात तेथील पाणी देखील पिण्यास त्यांना मनाई होती. त्यांना वर्गात देखील इतर उच्च जातीच्या मुलांबरोबर बसण्याची परवानगी नव्हती. जी वागणूक इतर अस्पृश्यांना मिळायची, तीच वागणूक बाबासाहेब आंबेडकर निमुटपणे सहन करत होते आणि याचवेळेस त्यांच्या मनात विचारांचे युद्ध सुरु झाले.

 

dr-babasaheb-ambedkar-marathipizza02

स्रोत

८ जून १९२७: विदेशात जाऊन इकोनॉमिक्स मध्ये पी.एच.डी. मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर पहिलेच भारतीय ठरले. त्यांनी न्युयोर्क मधील कोलंबिया युनिव्हर्सिटी मधून ही पदवी प्राप्त केली होती.

१५ ऑगस्ट १९४७: नवनिर्वाचित काँग्रेस सरकारने कायदे मंत्री म्हणून पदभार स्वीकारण्याची विनंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केली. त्या विनंतीला मान देत भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पद स्वीकारले.

२९ ऑगस्ट १९४७: संविधान निर्मिती समितीचे चेअरमन म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नियुक्ती करण्यात आली. या कार्यात त्यांचे अमुल्य मार्गदर्शन लाभले, म्हणून त्यांना ‘भारतीय संविधानाचे पिता’ म्हणून ओळखले जाते.

 

dr-babasaheb-ambedkar-marathipizza03

स्रोत

१ एप्रिल १९३५: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “The Problem of the Rupee – Its origin and its solution” पुस्तकाच्या आधारावर रिझर्व बँक ऑफ इंडिया उभारण्याची संकल्पना सादर करण्यात आली.

१४ ऑक्टोंबर १९५६: अखेर नागपूर येथे आपल्या पत्नीसमवेत आणि ५,००,००० अनुयायांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली.

=====

=====

६ डिसेंबर १९५६ : आजाराने ग्रस्त असणाऱ्या आंबेडकर यांचा दिल्ली येथे राहत्या घरी झोपेत असताना मृत्य झाला आणि दलितांचा कैवारी अनंतात विलीन झाला.

 

dr-babasaheb-ambedkar-marathipizza04

स्रोत

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी पिझ्झातर्फे त्रिवार अभिवादन !

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?