सत्तेच्या हव्यासापोटी त्याने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

प्राचीन काळापासून ते आतापर्यंत या जगातील कित्येक राष्ट्रांवर अनेक शासकांनी राज्य केलं काहीतर आजही करत आहेत. यापैकी काही शासक असे होते ज्यांचे उदाहरण आपण आजही देतो तर काही असे देखील होते ज्यांनी जगाला क्रूरता काय असते, एक व्यक्ती किती क्रूर असू शकतो हे दाखवून दिले. क्रूर शासकांबद्दल आपण जेव्हा केव्हा बोलतो तेव्हा एक नाव आपल्या सर्वांनाच आठवत ते म्हणजे अडॉल्फ हिटलर…

 

Idi Amin-inmarathi
nehandaradio.com

पण काय हिटलरच जगातील सर्वातील क्रूर शासक होता तर असे नाही, एक असा देखील शासक होता ज्याने क्रूरतेच्या सर्व परिसीमा ओलांडल्या… तो शासक म्हणजे युगांडाचा हुकूमशहा ईदी अमीन. हा जगातील सर्वात बदनाम शासकांपैकी एक होता.

 

Idi Amin-inmarathi02
independent.co.uk

ईदी अमीन याला ‘अमीन दादा’, ‘बुचर ऑफ आफ्रिका’ आणि ‘ब्रिटीश साम्राज्याचा विजेता’ अशी अनेक नाव देण्यात आली आहेत जी त्याची हुकुमशाही सिद्ध करतात. युगांडाचा हुकुमशहा ईदी अमीन २० व्या शतकाच्या अखेरीस सर्वात क्रूर हुकुमशहांच्या यादीत आला. त्याच्या क्रूरतेची परिसीमा म्हणजे त्याने सत्तेच्या आहारी जाऊन युगांच्या १ लाखाहून अधिक लोकांचा जीव घेतला होता.

 

Idi Amin-inmarathi03
amarujala.com

ईदी अमीन याने ८ वर्षांपर्यंत युगांडाचा राष्ट्रपती म्हणून शासन केले, या ८ वर्षांच्या काळात त्याने तेथील जनतेवर अनेक अत्याचार केले, त्याच्या अत्याचार एवढे भयानक होते की आजही त्याबद्दल वाचताना ऐकताना अंगावर शहारा येतो.


 

Idi Amin-inmarathi04
jagran.com

त्याची क्रूरता एवढी शिगेला पोहोचली होती की त्याने केवळ निष्पाप जीवांचा बळीच नाही घेतला तर तो माणसाचं मांस देखील खायचा. हेच नाही तर त्याच्या फ्रीजमध्ये माणसांचे कापलेले शीर आणि इतर अंग देखील आढळले होते. त्याच्या याच क्रूरता आणि वेडेपणामुळे त्याला ‘मॅड मॅन ऑफ आफ्रिका’ असे म्हणून देखील संबोधले जायचे.

 

Idi Amin-inmarathi06
amarujala.com

आपले पद आणि सत्ता वाचविण्यासाठी ईदी अमीन याने त्याचे प्रतीध्वंधी आणि अनेक ओबोट सर्मथकांवर देखील खूप अत्याचार केले आणि त्यांची हत्या केली. यामध्ये अनेक पत्रकार, मंत्रीगण, न्यायाधीश, नेते आणि विदेशी देखील होते. ईदी अमीन याच्या आदेशावर कित्येक गाव देखील नष्ट करण्यात आली. यात मारलेल्या लोकांना नील नदीत फेकून देण्यात आले.

 

Idi Amin-inmarathi05
amarujala.com


हा केवळ सत्तेचाच भुका नव्हता तर त्याने अनेक स्त्रियांवर अत्याचार करून त्यांच्यावर बलात्कार करून आपल्या वासनेची भूक पर्ण केली. तो लोकांना मारण्यासाठी कुठल्याही शस्त्राचा वापर करत नव्हता तर तो त्यांना मारण्यासाठी त्यांना जिवंत पुरून देत असे किंवा त्यांना मगरांसमोर सोडून देत असे.

 

Idi Amin-inmarathi08
twitter.com

ईदी अमीन याने तेथील सर्व भारतीय आणि पाकिस्तानी लोकांना देशातून निष्कासित करून टाकले. तसेच आशियाई श्रमिकांना देश सोडण्याकरिता केवळ ९० दिवसांचा वेळ दिला. ईदी अमीन याने अशी चेतावणी दिली होती की, जर ‘ते देश सोडणार नाहीत तर ते स्वतःला अग्नीवर बसलेले बघतील.’

 

Idi Amin-inmarathi07
amarujala.com

सत्तेच्या हव्यासापायी तो एवढा वेडा झाला होता की, माणुसकी काय असते हेच तो विसरला होता. तो कुणाचेही ऐकत नव्हता. बस त्याला जे वाटेल जस वाटेल तस करायचा. ते बरोबर आहे की चुकीच याच्याशी त्याच काहीच घेण-देण नव्हत. त्याच्या मार्गात जो कोणी येत असे तो त्याला संपवून टाकत असत.

१९७९मध्ये तंजानिया आणि अमीन विरोधी युगांडा सेनेने अमीनच्या शासनाला उधळून लावलं. त्यानंतर त्याच्या हुकुमशाहीचा अंत झाला आणि २००३ साली त्याचा मृत्यू झाला…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *