बनावट अंडी ओळखण्यासाठी खात्रीलायक टिप्स

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

आजकाल भल्याचा जमानाच राहिला नाही. घोर कलियुग आहे हेच खरं! लोक बनावट ब्रँडचे कपडे, शूज, इलेक्ट्रॉनिक गोष्टी, सोनं, हिरे, सौंदर्यप्रसाधने इथपासून ते बनावट नाणी व नोटा बनवत होते इथपर्यंत ठीक होतं.

पण काही स्वार्थी लोक ह्यापुढेही जाऊन अन्नपदार्थांत भेसळ, प्लास्टिकचे तांदूळ, केमीकल्सयुक्त दूध, बनावट औषधे, बनावट भाजीपाला हे सुद्धा साध्याभोळ्या ग्राहकांच्या माथी मारून त्यांच्या जीवाशी खेळू लागले तेव्हा हे घोर कलियुग आहे असंच म्हणावं लागेल.

ह्या प्लास्टिकचे तांदूळ, केमीकल्सयुक्त दूध ह्यांत बनावट अंड्यांचीही आता भर पडली आहे. म्हणजेच प्रोटीनसाठी, तब्येत सुधारण्यासाठी खायची अंडी आता आपल्या अनवधानाने चुकून बनावट असली तर तब्येत सुधारण्याऐवजी बिघडणार हे नक्की!

चीनमधून सध्या भारत, पाकिस्तान व बांग्लादेशच्या बाजारात बनावट अंड्यांचा सुळसुळाट झाला आहे. अशीच बनावट अंडी विकताना आढळल्यामुळे कोलकातामध्ये एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

कोलकातामधील एका महिलेने ह्या दुकानदाराकडून अंडी विकत घेतली व घरी जाऊन ती फोडून शिजवून बघितली असता त्यांना ती अंडी बनावट असल्याचा संशय आला व त्या अंड्यात प्लास्टिकसदृश पदार्थ आढळला. ह्या महिलेने प्रसंगावधान दाखवत ह्याची पोलीस कम्प्लेंट केली व दुकानदाराला अटक झाली.


 

fake-eggs-inmarathi
sweetmacaw.com

रिपोर्ट असे सांगतात की, ह्या बनावट अंड्यांचा बाहेरचा भाग हा कॅल्शियम कार्बोनेट, पॅराफिन वॅक्स आणि जिप्सम पावडर ह्यापासून तयार करतात व आतील पांढरा बलक सोडियम अल्जिनेट, तुरटी, जिलेटीन, एडिबल कॅल्शियम क्लोराईड, बेंझॉइक ऍसिड, पाणी व खाण्याचे रंग ह्यापासून बनवतात.

ह्या केमिकल्समुळे अनेक घातक शारीरिक आजार उद्भवतात.

ह्यामुळे मेटाबॉलिजमची समस्या निर्माण होते तसेच मेंदू आणि मज्जातंतूच्या पेशींची हानी होते, यकृताचे आजार तसेच रक्तनिर्मितीत अडथळे निर्माण होण्याची शंका असते.

आता ही बनावट अंडी अस्सल अंड्याप्रमाणेच अगदी बेमालूम बनवलेली असतात त्यामुळे आपली गफलत होण्याची दाट शक्यता असते.

परंतु अस्सल ते अस्सलच! पारखी नजरेला बनावट व अस्सलतेमध्ये फरक करता येतो.त्यामुळे काळजी करू नका! आज आम्ही तुम्हाला बनावट अंडी कशी ओळखायची ह्याच्या काही टिप्स सांगणार आहोत म्हणजे पुढच्या वेळी अंडी घेताना तुम्ही फसवणूक टाळू शकाल.

१. बनावट अंड ओळखण्याची पहिली खुण म्हणजे खऱ्या अंड्याचा वरचा भाग (टरफल) जास्त चकाकत नाही तर बनावट अंड्याचा बाहेरचा भाग चांगला चकाकतो.

 

fake-eggs-inmarathi01
cooks.kz

२. खऱ्या अंड्याचे टरफल हे थोडे खडबडीत असते तर बनावट अंड्याचे टरफल हे अत्यंत गुळगुळीत असते.

 

fake-eggs-inmarathi02
indiascoops.com

३. अंडे फोडण्याआधी ते हलवून बघा. जर तुम्हाला आतून पाण्याचा आवाज आला तर ते अंडे बनावट आहे हे नक्की!

 

fake-eggs-inmarathi03
boldsky.com

४. अंडे फोडण्याआधी त्यावर थोडे टॅप करून बघा.त्यावर टॅप केल्यानंतर क्रिस्प आवाज येत असेल तर ते अंडे अस्सल आहे.

 

fake-eggs-inmarathi04
howsouthafrica.com

५. जर अंडे बनावट असेल तर तुम्ही ते फोडल्यानंतर त्यातील पिवळा व पांढरा बलक तव्यावर लगेच एकत्र झालेला तुम्हाला दिसेल. कारण हे दोन्हीही भाग एकाच पदार्थातून कृत्रिमरित्या तयार केलेले असतात. अस्सल अंड्याचा पिवळा व पांढरा बलक आपण फेटल्याशिवाय एकत्र होत नाही.

 

fake-eggs-inmarathi05
elakiri.com


६. बनावट अंड्याच्या आत एक रबरासारखे आवरण असते जे अस्सल अंड्यात नसते.

 

fake-eggs-inmarathi06
juicing-for-health.com

७. खऱ्या अंड्याला कच्च्या मांसासारखा एक विशिष्ट वास येतो परंतु कृत्रिम अंड्याला कुठल्याही प्रकारचा वास येत नाही.

 

fake-eggs-inmarathi07
steemit.com

८. खऱ्या अंड्यावर बऱ्याच वेळा माश्या किंवा मुंग्या असतात पण बनावट अंड्यांवर कधीही माश्या किंवा मुंग्या बसत नाहीत.

 

fake-eggs-inmarathi08
steemit.com

पुढच्या वेळी अंडी घेताना ह्या आठ गोष्टी लक्षात ठेवा आणि स्वतःची फसवणूक टाळा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *