' दुकानदार कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशीन कसं मिळवू शकतात? – InMarathi

दुकानदार कॅशलेस व्यवहारांसाठी कार्ड स्वाईप मशीन कसं मिळवू शकतात?

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळीकडे एकच विषय सुरु आहे तो म्हणजे भारत आता कॅशलेस होणार. इथे सगळे व्यवहार रोखीने न होता डिजिटल पद्धतीने होणार. आता ते खरंच होतं का नाही तो विषय वेगळा! पण आता भारताने बदलत्या जगाबरोबर स्वत:ही बदलायला हवं हे देखील तितकंच खरं! समाजातील तळागाळातील घटक जेवढा कॅशलेस साठी तयार नाही तेवढाच व्यापारी वर्ग देखील तयार नाही ही वस्तुस्थिती आहे.

swipe-machine-marathipizza00

स्रोत

यासाठी सर्वप्रथम व्यापारी वर्गाने कॅशलेस युगासह स्व:ला बदलले पाहिजे. कारण दुकानात येणारा ग्राहक हा जरी कॅशलेस युगासाठी तयार असला आणि दुकानात जर स्वाईप मशीन वा अन्य डिजिटल पेमेंट सुविधा उपलब्ध नसतील तर फक्त ग्राहकाने कॅशलेस होऊन काहीच फायदा नाही. व्यापारी वर्गासाठी पेमेंट स्वीकारण्याची सर्वात सोप्पी पद्धत कुठली असेल तर ती स्वाईप मशीनने पेमेंट स्वीकारण्याची! ग्राहकाजवळ असणारं क्रेडीट किंवा डेबिट कार्ड मशीनवर फिरवलं आणि त्यावर ग्राहकाने आपलं पिन नंबर टाकला की झालं पेमेंट. इतकं हा प्रकार सोपा आहे पण व्यापारी वर्गात अजूनही हे स्वाईप माशील मिळवावं कसं याबद्दल जागरुकता नाही. व्यापारी वर्गामध्ये याच विषयाबद्दल जागरुकता निर्माण व्हावी यासाठी स्वाईप मशीन कसं मिळवावं यावर हा छोटासा माहितीपर लेख!

swaip-machine-marathipizza01

स्रोत

स्वाईप मशिन मिळवण्यासाठी दुकानदाराला सर्वात आधी बँकेत चालू खातं (Current Account) सुरु करावं लागतं.

त्यानंतर टिन क्रमांक म्हणजेच टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर चालू खात्याला जोडावा लागतो.

जर दुकानदारचं बचत खातं असेल तर त्याला त्याचा पॅन कार्ड नंबर आणि रद्द धनादेश (Cancelled Cheque) द्यावा लागतो.

swaip-machine-marathipizza02

स्रोत

त्यानंतर स्वाईप सर्व्हिस देणाऱ्या प्रोव्हायडरकडून स्वाईप मशिन घेऊन दुकानदाराला ते स्वत:च्या चालू खात्याला जोडता येते.

PayUMoney, Pine Labs, Jio Money, M Swipe आणि विविध बँकादेखील स्वाईप सर्व्हिस पुरवतात.

swaip-machine-marathipizza03

स्रोत

यानंतर दुकानदार ग्राहकांच्या सोयीसाठी स्वाईप मशिनच्या वापर सुरु करू शकतो.

स्वाईप मशिनसाठी बँका महिन्याला १५० ते ३०० प्रतिमहिना इतकी रक्कम आकारतात. तसंच वार्षिक सेवा शुल्क वेगळं आकारलं जातं.

swaip-machine-marathipizza04

स्रोत

ही माहिती शक्य तितक्या व्यापारी/दुकानदारांपर्यंत पोचवा आणि त्यांना कॅशलेस होण्यासाठी प्रोत्साहन द्या!

 

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?