जपानमध्ये होते हिंदू दैवतांची पूजा, जतन केला जातोय भारतीय वारसा!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

आपणांपैकी फार कमी जणांना हे माहिती असेल की जपानमध्ये कमीत कमी २० हिंदू दैवतं नियमीत पूजिले जातात.

सरस्वती मातेची अगणित मंदिरं जपानमध्ये आहेत. सरस्वती शिवाय लक्ष्मी माता, इंद्रदेव, ब्रह्मा, गणेश ह्यांची उपासना जपानमध्ये प्रामुख्याने होते. एवढंच नाही, तर भारतीय हिंदू ज्या दैवतांना विसरून गेले आहेत, त्यांचीसुद्धा जपानमध्ये आराधना केली जाते.

=====

=====


जपान फाउंडेशन आणि चित्रपट निर्माते तथा art-historian – Benoy K Behl ह्यांनी ११ जानेवारी ते २१ जानेवारी २०१६ या काळात  जपानमधल्या Indian Museum मध्ये काही दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन आयोजित केलं होतं. ह्या फोटोंमधून जपानचं भारतीय पुरातन वारस्यासोबत असलेलं नातं दिसलं.

Benoy-k-behl-marathipizza

Image source

Behl आपल्या research मधे म्हणतात, “गौतम बुद्धांच्या शिकवणीचा जपानी जीवनमानावर प्रभाव आहे. रोज अनेक लोक बौद्ध मंदिरांमध्ये जातात. गौतम बुद्धांशिवाय अनेक पुरातन भारतीय देवतांची आराधना जपानमध्ये होत असते. (ह्यामुळे) भारतीयांना जपानमध्ये घरी (भारतात) असल्यासारखं वाटतं.

जपानने भारतीय वारसा जपल्याचं एक उदाहरण म्हणजे ६ व्या शतकातील संस्कृतची “सिद्धम” लिपी भारतातून नामशेष झाली असली तरी जपानमध्ये ती टिकवून ठेवली गेली आहे.

एवढंच नाही तर ह्या लिपीतील संस्कृत बीजाक्षरंसुद्धा जतन केल्या गेली आहेत. प्रत्येक देवतेचं एक बीजाक्षर आहे, त्यामुळे ह्या बिजाक्षरांचा अर्थ जरी समजत नसला तरी त्यांना पवित्र मानलं नातं.

=====

=====

Behl ह्यांच्या research नुसार, आजही कोयासन इथे “सिद्धम” लिपीत संस्कृत शिकवली जाते.

अनेक जपानी शब्द संस्कृतमधून उगम पावतात. हेच काय, जपानमधे “सुजाता” नावाचा मोठा दूधाचा brand आहे.

Behl ह्यांच्या मतानुसार, Colonial education system मुळे भारताचा स्वतःच्या इतिहासाशी जसा संबंध तुटला, तसं जपानचं झालं नाही. म्हणूनच जपानमध्ये ऐतिहासिक वारसा जपल्या गेला आणि भारताला आपलाच इतिहास पाश्चात्यांकडून जाणून घ्यावा लागतो.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ मराठी pizza

omkar has 202 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?