' १९६२ च्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल भारतीय सरकार ह्या गोष्टी अजूनही लपवून ठेवत आहे – InMarathi

१९६२ च्या लाजिरवाण्या पराभवाबद्दल भारतीय सरकार ह्या गोष्टी अजूनही लपवून ठेवत आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

१९६२ साली चीन बरोबर झालेल्या युद्धात जो पराभव भारताला स्वीकारावा लागला होता तो अत्यंत मानहानीकारक होता. या पराभवाने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला उघडं केलं होतं.

आपली लष्करी ताकद कमजोर आहे आणि आपल्याला आपल्या मिलिटरी फोर्सेस वर काम करावं लागणार आहे याची जाणीव त्यावेळी भारतला झाली होती.

हे युद्ध नेहरूंच्या पंतप्रधानपदाच्या काळातील मोठं अपयश मानलं जातं.

 

1962 CHAINA WAR INMARATHI

ज्यावेळी अशी युद्धे घडतात त्यावेळी सगळं अचानक होत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाच्या छुप्या हालचाली लपून राहात नाहीत. गुप्तहेर खात्याला याची काही ना काही कुणकुण लागलेली असते. सीमारेषेवर संशयास्पद हालचाली सुरु असतात ज्याचा कानोसा लष्करातील अधिकाऱ्यांना लागलेला असतो.

त्याबाबत सरकारला सूचना देणारे रिपोर्ट्स ही पाठवले जातात पण देशाचं सरकार या रिपोर्ट्स देणाऱ्या माणसालाच गद्दार ठरवत असेल तर?

तर मग १९६२ च्या पराभवाची भळभळती जखम घेवून जगण्याचं दारुण दु:ख देशाच्या आणि देशाच्या लोकांच्या वाट्याला येतं.

 

1962 CHAINA WAR 1 INMARATHI

भारत आणि चीन च्या युद्धा आधी भारताला आणि भारतीय लष्कराला चीन अशी काही पाउले उचलणार आहे याची कुणकुण लागली होती का? याचं उत्तर होकारार्थी आहे. लष्कारातील एका तडफदार मराठी अधिकाऱ्याने याबाबत एका रिपोर्ट द्वारे त्यावेळचे संरक्षणमंत्री व्ही. के. मेनन यांना दिली होती.

मात्र व्ही. के. मेनन यांनी तो रिपोर्ट चिल्लर म्हणून उडवून लावला होता. ही गोष्ट आहे युद्ध होण्याच्या ३ वर्षे आधीची म्हणजे १९५९ सालची. ‘

 

v. k. menon Inmarathi

 

तो रिपोर्ट देणारा अधिकारी होता लेफ्टनंट जनरल शंकरराव पांडुरंग थोरात पाटील.

थोरातांनी “चीन चा भारताला धोका” या आपल्या ८ ऑक्टोबर १९५९ च्या रिपोर्ट मध्ये स्पष्टपणे सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या. त्यात त्यांनी म्हटलं होतं की पाकिस्तान प्रमाणे च चीन हा सुद्धा आता आपल्या काळजीचा विषय बनलेला आहे. आपल्या देशाचा हिस्सा असलेल्या मोठ्या प्रदेशांवर चीन हक्क सांगत आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा म्हणून निश्चित करण्यात आलेली “मॅकमोहन लाईन” चीन ला अमान्य आहे आणि चीन आपल्या लडाख, उत्तर प्रदेश आणि ईशान्य काश्मीर च्या मोठ्या प्रदेशांवर आपला कब्जा सांगत आहे ही आपल्यासाठी प्रचंड काळजीची बाब आहे.”

1962 CHAINA WAR 2 INMARATHI

ज्या वेळी इतका संवेदनशील रिपोर्ट भारतच्या संरक्षणमंत्र्यांकडे गेला तेव्हा या रिपोर्ट वर विचार विनिमय करण्याच्या ऐवजी व्ही.के. मेनन यांनी या रिपोर्ट ला केराची टोपली दाखवली.

या रिपोर्ट मध्ये काहीही तथ्य नाही आणि लेफ्टनंट थोरात यांना फक्त युद्धाची तहान आहे म्हणून त्यांनी असा खोटा नाटा रिपोर्ट बनवला आहे असे ताशेरे देखील मेनन ने लेफ्टनंट थोरात यांच्यावर ओढले.

 

thorat-inmarathi
dailymail.com

थोरात यांनी या रिपोर्ट मध्ये आपले भारतीय लष्कर चीन चा मुकाबला करण्यासाठी कसे दुबळे आहे आणि आपल्याला जर हल्ला झाला तर एअर फोर्स ची मदत घ्यावी लागेल असा इशारा ही दिला होता.

सदर रिपोर्ट वाचून मेनन यांची थोरात यांच्यावर खप्पा मर्जी झाली ती कायमची. इतकेच नव्हे तर १९६१ साली जेव्हा मेजर जनरल थिमय्या निवृत्त झाले त्यावेळी थोरात यांना डावलून जी एन थापर यांना सैन्य प्रमुख बनवण्यात आलं.

mejar janral thimayya Inmarathi

थोरात यांच्याकडे युद्धाचा आणि फ्रंट वर लढण्याचा प्रदीर्घ अनुभव होता. याउलट जी एन थापर जरी वरिष्ठ असले तरी फ्रंट वर लढण्यात त्यांचा अनुभव कमी होता.

त्यामुळे थोरात आणि जी एन थापर यांच्यामध्ये ही वाद धुमसत राहिले. थोरातांना पाण्यात बघण्याचे प्रकार ही झाले. जी. एन . थापर यांना थोरातांचा प्रचंड राग आला होता जेव्हा थोरात यांनी १९६१ साली त्यांच्या रानीखेत येथील एका भाषणात असा स्पष्ट उल्लेख केला होता की

“आर्मी मध्ये राजकीय नेत्यांच्या आश्रयाने प्रमोट होण्याची वृत्ती वाढत आहे जी एक ना एक दिवस आपल्या सैन्याला भारी पडेल. एका सच्च्या अधिकाऱ्याने फक्त आपल्या लष्कर प्रमुखाचं म्हणणं ऐकलं पाहिजे. जर राजकारणातील कुठल्या व्यक्तीच्या आज्ञा आपण अमलात असू तर लष्कराची शिस्त च नष्ट होवून जाण्याचा धोका निर्माण होवू शकतो.”

थोरातांचे हे शब्द थापर यांना काट्यासारखे बोचले नसतील तर नवलच. थापर यांनी थोरातांना या संदर्भात त्यांच्यावर आरोप ठेवून चौकशी करणारे पत्र लिहिले.

 

indo-china-inmarathi
indiatoday.in

त्याचा रिपोर्ट मेनन यांच्याकडे ही पाठवण्यात आला त्या रिपोर्ट मध्ये थोरात यांना डिफेन्स मिनिस्टर यांची अॅलर्जी आहे म्हणून ते असे आरोप करत आहेत असे ताशेरे देखील ओढले होते. थोरातांनी त्यांच्यावर केलेल्या हर एका आरोपाबाबत स्वत: बोललेले शब्द मान्य करून तडफेने सफाई दिली होती.

थोरातांना अशा तर्हेने अनेकदा दुय्यम वागणूक देण्यात आली होती. ज्यावेळी चीन चे युद्ध झाले त्यावेळी मात्र नेहरुंना आपली चूक समजली.

थोरातांचे महत्व कळले पण त्याला खूप उशीर झाला होता. थोरातांनी दिलेला रिपोर्ट आणि त्यावर व्ही के मेनन यांनी दिलेले शेरे आज जनतेमध्ये येण्याची गरज आहे. मोदी सरकारने या बाबीमध्ये लक्ष घातले पाहिजे असे अनेक युद्ध विश्लेषकांचे मत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?