' वय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार! – InMarathi

वय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

बिझनेस कॉन्फरन्स म्हणजे झगमगाट, मोठाली लोकं आणि गंभीर वातावरण – असं चित्र डोळ्यासमोर उभं रहातं. गेल्या काही वर्षात सरकारने स्टार्ट-अप आणि एकूणच उद्योग जगात अनेक initiatives सुरू करून अश्या कॉन्फरन्सना ग्लॅमर प्राप्त करून दिलं आहे. त्यामुळे गूढ-गंभीर असल्याचं वलय तसं कमी झालंय. व्हायब्रण्ट गुजरात हा असाच ग्लॅमरस इव्हेन्ट असतो. ह्या वर्षी एका १४ वर्षीय मुलाने व्हायब्रण्ट गुजरात मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.

कारण ह्या मुलाने गुजरात सरकारशी ५ कोटींचा करार केलाय !

“हर्षवर्धन झाला” असं ह्या उद्योजकाचं नाव. त्याने असे ड्रोन्स – म्हणजे हवेत उडणारे रोबोट्स – बनवलेत, जे लँड माईन्स ना शोधून त्यांना निकामी करू शकतात.

ह्या ड्रोन्सच्या उत्पादनासाठी हर्षवर्धन ने गुजरात सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाशी सामंजस्य करार केला आहे.

harshawardhan zala 00 marathipizza

स्रोत

इतर इयत्ता दहावीतील मुलं बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असताना – हर्षवर्धन मात्र Aerobotics 7 ह्या त्याच्या स्टार्ट अप ची धुरा सांभाळत आहे. त्याने वर उल्लेखलेल्या ड्रोन्सचे ३ प्रोटोटाईप देखील तयार केले आहेत.

टाईम्स ऑफ इंडिया च्या बातमी नुसार – त्याने २०१६ पासूनच ह्या प्रोजेक्ट वर काम सुरू केलं होतं आणि त्याचा बिझनेस प्लॅन सुद्धा तयार आहे. तो म्हणतो –

टीव्ही बघत असताना हे कळालं की कित्येक सैनिक लँड माईन्सना स्वतः शोधून डिफ्युज करत असताना मृत्युमुखी पडतात – आणि तेव्हाच मला ह्याची प्रेरणा मिळाली.

जे ३ प्रोटोटाईप (ड्रोन्सच्या संकल्पनेचे नमुने) तयार केले आहेत, त्यातील पहिले दोन बनवण्यासाठी हर्षवर्धनच्या पालकांनी २ लाख रुपये खर्च केलेत. परंतु तिसऱ्या प्रोटोटाईपसाठी गुजरात सरकारकडून ३ लाख रुपयांचं अर्थसहाय्य मिळालं होतं ( – फडणवीसजी – वाचताय ना? 🙂 )

त्याने दिलेल्या माहिती नुसार –

ह्या ड्रोन्स मध्ये थर्मल मीटर, इन्फ्रारेड आणि RGB सेन्सर्स आहेत. तसंच – २१ मेगापिक्सल कॅमेरा आणि मेकॅनिकल शटर आहे ज्यामुळे ह्या ड्रोन मधून हाय रिझॉल्यूशन फोटो देखील काढता येतील.

 

harshawardhan zala 01 marathipizza

स्रोत

हे ड्रोन्स जमिनीपासून २ फूट उंच उडू शकतील आणि आपल्या सैनिक तळाशी संपर्क ठेऊ शकतील. ह्या ड्रोन्स मध्ये ५० ग्रॅम वजनाचा बॉम्ब असेल जो माईन शोधल्यावर त्याला उद्धवस्त करू शकेल. आपल्या एयरोबॉटिकस  ७ ह्या कंपनीतर्फे त्याने ड्रोन्स ची पेटंट रजिस्ट्रेशन प्रोसिजर सुरू केली आहे. हे पेटंट करण्याची कल्पना त्याला गुगल हेडक्वार्टर ला दिलेल्या भेटीतून सुचली होती.

एक कॉलेज कॉम्पिटिशन जिंकल्याचं बक्षीस म्हणून त्याला अमेरिकेतील गुगलच्या हेडक्वार्टरला भेट देण्याची संधी मिळाली होती. तिथे जे काम होतंय ते बघून त्याने आपल्या ड्रोन्स ची संकल्पना त्यांना सांगिलती होती. आता ह्या ५ कोटींच्या समंजस्य कराराची बातमी त्या इन्व्हेस्टर्स ना कळवण्याचा हर्षवर्धनचा विचार आहे. आता ते लोक ह्या स्टार्ट अप मध्ये इन्व्हेस्ट करण्यास उत्सुक होतील असा त्याचा कयास आहे.

(हे पण वाचा: DRDO आश्चर्यचकित: IIT मद्रासच्या विद्यार्थ्याने बनवलाय “underwater” रोबोट!)

असं म्हणतात की खूप वर्षांपूर्वी बिल गेट्स म्हटले होते की ‘भारतात गल्लोगल्ली माझ्यासारखे बिल गेट्स दडलेले आहेत.’.

हर्षवर्धनला बघून त्या वाक्याची प्रचिती येते, नाही?!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?