' अंगठ्यांच्या वाढत्या किमतींमुळे प्रचलित झालाय हा धोकादायक ट्रेंड ! – InMarathi

अंगठ्यांच्या वाढत्या किमतींमुळे प्रचलित झालाय हा धोकादायक ट्रेंड !

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

तुम्ही आजवर एखाद्या मुलाला त्याच्या प्रेयसीला अंगठी देऊन प्रपोज करताना नक्कीच बघितलं असेलं. पण आता प्रपोज करण्याचा किंवा आपले प्रेम व्यक्त करण्याच्या पद्धतीत देखील बदल होत चालला आहे. कारण आता बोटात अंगठी घालून प्रपोज करण्याचे दिवस गेले आता तर लोक बोटात अंगठी घालत नाहीत तर टोचून घेतात.

 

dermal piercing-inmarathi
pinterest.com

सध्या इंस्टाग्रामवर एक नवीन ट्रेंड सुरु झाला आहे. आता ब्रिटनमध्ये अंगठी ही बोटात घालायची नसून ती बोटात छिद्र करून टोचून घ्यायची वस्तू झाली आहे. काही लोक आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी बोटात अशी अंगठी टोचून घेत आहेत.

 

dermal piercing-inmarathi02
gossiphubb.com

ह्याला सिंगल पोइंट पियर्सिंग किंवा डर्मल पियर्सिंग असे म्हणतात. ह्याकरिता शरीरात कातडीच्या खाली एक तुकडा टाकला जातो, ज्याला अँकर म्हणतात. हा अँकर अंगठीला जोडलेला असतो, जेणेकरून ती अंगठी आपल्या जागेवर राहू शकेल. ही अंगठी शरीरावर गोंदवूण घेतलेल्या महाग रत्न किंवा हिऱ्यासारखी दिसते.

 

dermal piercing-inmarathi01
bravotv.com

ह्याबाबत झालेल्या एका रिसर्चनुसार हा ट्रेंड सुरु होण्याचं कारण खऱ्या अंगठ्यांच्या किमती असू शकतात. कारण ब्रिटन येथे एका अंगठीची किंमत ही एक हजार पौंडहून जास्त आहे तर ह्या प्रकारे अंगठी टोचून घेणे ह्याची किंमत केवळ ७० ते १०० पौंड एवढी असते. त्यामुळे हे जास्त परवडणारे आहे.

 

dermal piercing-inmarathi03
pinterest.com

पण ह्या पद्धतीचे अनेक धोकादायक परिणाम देखील आहेत. त्वचेच्या रोगांवर रिसर्च करणाऱ्या ब्रिटीश असोशिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्ट्स ह्यांच्या मते, “जर छिद्र खोल करून अँकर व्यवस्थित लावण्यात आले नाही तर ते त्याच्या जागेवरून हलण्याची शक्यता असते. आणि जर अतीच खोल लावण्यात आले तर त्यावरील कातडी हि जड होण्याचा धोका असतो. ह्यासोबतच मग सूज, इन्फेक्शन आणि त्यामुळे दुखणे देखील भरू शकते.”

 

dermal piercing-inmarathi05
bbc.com

ह्या असोसिएशनच्या मते शरीरात छिद्र करून काहीही इम्प्लांट करणे किंवा टोचणे हि एक वैद्यकीय प्रक्रिया आहे. आणि हे एखाद्या डॉक्टर कडूनच करवून घ्यायला हवं. पण तसं होताना दिसून येत नाही. कारण डर्मल पियर्सिंगचे काम कोणीही सामान्य लोक करत आहेत.

ते सर्व बाजूल ठेवलं तरी ते टोचलेली अंगठी ही कधीही कश्यातही फसू शकते. कपडे घालताना ते कपड्यात फासून ओढले जाऊ शकते. त्याने इजा देखील होऊ शकते.

 

dermal piercing-inmarathi04

 

ह्या सर्व कारणांमुळे काही पियर्सिंग स्टुडीओजच्या मते ते डर्मल पियर्सिंगचे काम करणार नाहीत. एवढचं नाही तर ते ह्याबाबत ग्राहकांत जागरूकता पसरविण्याच देखील काम करतील.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?