मेस्सी आणि रोनाल्डोसारख्या दिग्गजांच्या चेंडू आणि गोलपोस्टमधला नवा अज्ञात पहारेकरी गवसलाय

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा : facebook.com/InMarathi.page

===

world-cup-2018-inmarathi
icelandnews.is

सध्या रशियामध्ये फिफा वर्ल्ड कप सुरु आहे. फुटबॉल म्हटल की आपल्याला दोनच नावं आठवतात एक म्हणजे रोनाल्डो आणि दुसरा मेसी. ह्या दोघांना फुटबॉलचे लेजेन्ड मानल्या जाते. जेव्हा हे दोघे मैदानावर उतरतात तेव्हा सर्वांच्या नजरा फक्त ह्यांच्यावर खिळलेल्या असतात. जेव्हा ह्यांच्या पायाशी बॉल असतो तेव्हा तो कधी गोलपोस्टमध्ये जाऊन गोल होईल हे सांगता येत नाही.

 

Messi-Ronaldo-inmarathi
magazine.co.uk

पण सध्याच्या फिफा वर्ल्ड कपमध्ये काहीतरी वेगळच दृश्य प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. जिथे एक गोलकीपर रोनाल्डो आणि मेसी ह्या दोघांनाही गोलपोस्ट पर्यंत पोहोचूच देत नाहीये. हा तोच गोलकीपर आहे ज्याने मेसी च्या पेनल्टी किकला रोखून सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. तो खेळाडू म्हणजे Hannes Thor Halldorsson.


 

Hannes Thor Halldorsson-inmarathi03
goal.com

Hannes Thor Halldorsson हा एक गोलकीपर असून तो आईसलंडच्या टिमकडून खेळतो. फिफा वर्ल्ड कपदरम्यान अर्जेंटिना आणि आईसलंडमध्ये झालेल्या एका सामन्यात मेसीने गोल करण्यासाठी एकूण ११ शॉट मारले पण एकदाही त्याला गोल करता आला नाही, आणि त्याचे कारण म्हणजे Halldorsson.

जेव्हा हा सामना १-१ च्या बरोबरीने येऊन संपला तेव्हा मेसिला पेनल्टी किक मिळाली. आता मेसी पेनल्टी किक मारणार म्हणजे तिथेच जिंकलो आपण असे अर्जेंटिनाच्या टीमला वाटले.

पण घडले अगदी उलट. कदाचित ह्याचा विचार मेसीनेही केला नसावा. मेसीने आपल्या शैलीत पूर्ण ताकदीने तो शॉट मारला पण Halldorsson ने आपल्या उजव्या बाजूने जबरदस्त डाइव्ह घेत तो गोल थांबवला. अखेर हा सामना १-१ च्या बरोबरीनेच संपला.

 

Cristiano_Ronaldo-inmarathi
thoughtco.com

असचं काहीसं रोनाल्डो सोबतही घडलं होतं. युरो कप २०१६ दरम्यान जेव्हा रोनाल्डोने गोल करण्यासाठी जवळपास १० शॉट मारले पण Halldorsson ने त्याचा एकही शॉट गोलपर्यंत पोहोचू दिला नाही. आणि हा सामना देखील १-१ च्या बरोबरीने संपला. म्हणून आता Halldorsson देखील मेसी आणि रोनाल्डो प्रमाणेच चर्चेत आहेत.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi06
goal.com

Halldorsson ने एक फुटबॉलर म्हणून कुठलीही वर्ल्ड क्लास ट्रेनिंग घेतलेली नाही. एक चांगला खेळाडू बनण्यासाठी त्याने स्वतःच मैदानावर घाम गाळत गोलकीपर आणि स्ट्राईकर चा सराव केला. आपल्या करिअरच्या सुरवातीला त्याने एका भितींवर स्वतः बॉल किक करून गोलकीपरचा सराव केला.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi
tdg.ch

जेव्हा Halldorsson २० वर्षांचा होता तेव्हा त्याला थर्ड डिव्हिजन टिममधून काढण्यात आले. ह्यावेळी त्याने फुटबॉल सोडून त्याच आणखी एक स्वप्न आहे चित्रपट दिग्दर्शन त्याकडे जाण्याचा निश्चय केला. पण त्याच्या वडिलांनी त्याला “फुटबॉल सोडू नकोस, तुझं गोलकीपर होण्याचं स्वप्न पूर्ण कर”, असे सांगितले. त्यानंतर Halldorsson ह्याने दिवसरात्र सराव करून अखेर आपलं स्वप्न पूर्ण केलं, Halldorsson हा आज जगातील सर्वात उत्कृष्ट गोलकीपर्स पैकी एक आहे.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi05
fifa.com

पण त्याने त्याचं चित्रपट दिग्दर्शनाच स्वप्न देखील सोडलं नाही. त्याने दहाव्या वर्गात असताना पासूनच काही संगीत व्हिडीओज बनवायला सुरवात केली होती. तो गर्ल बॅण्ड ‘नायलॉन’ करिता व्हिडीओज बनवायचे. तसेच त्यांनी टीव्हीवरील अनेक जाहिराती, चित्रपट आणि कार्यक्रमांसाठी देखील दिग्दर्शन केले आहे.

Coca Cola च्या फिफा वर्ल्ड कप थीमची ही जाहिरात देखील त्यांच्याच दिग्दर्शनाखाली तयार करण्यात आली आहे. त्याला जेव्हाही फुटबॉल पासून वेळ मिळतो तो दिग्दर्शन करतो.

 

Hannes Thor Halldorsson-inmarathi01
mbl.is

Hannes Thor Halldorsson च्या रुपात फुटबॉल प्रेमींना आता एक नवीन हिरो आणि आयडॉल मिळाला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *