' पूरस्थितीत न घाबरता, कल्पनाशक्तीच्या बळावर या देशाने जे काही केलं त्याचा आपण विचारही करु शकणार नाही – InMarathi

पूरस्थितीत न घाबरता, कल्पनाशक्तीच्या बळावर या देशाने जे काही केलं त्याचा आपण विचारही करु शकणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

मुंबईचा पाऊस म्हणजे वळणी पडलेलं संकट आहे. मुंबईतला पाऊस इतका असतो कि एक दिवस शहर बंद ठेवावे लागते.

झोपडपट्टी आणि समान्य माणसांची घरं देखील धोक्यात असतात, एवढच काय तर इथल्या आमदाराच्या घरात पाणी शिरेपर्यंत पाऊस होतो

सर्व वाहतुकीची साधने जसकी रेल्वे-बसेस यांना विश्रांती दिली जाते.

१ जुलै २०१९ च्या पावसापेक्षा २००५ मध्ये खूपच पाऊस झालेला ज्यात १०९४ लोक मृत्युमुखी पडले आणि अश्याच प्रकारच्या संकटांना दरवर्षी सामोरे जाऊन मुंबईला निर्णय घ्यावे लागले आहेत.

एवढेच नाही, तर दरवर्षी पावसाळा आला की देशातल्या अनेक भागात पूरजन्य परिस्थितीची भिती लोकांच्या मनात निर्माण होते.

 

Mumbai Floods
Deccan Chronicle

 

पण एक असाही देश आहे ज्याने ह्यावर तोडगा न काढता हे “मान्य” केलं आहे. तो देश म्हणजे नेदरलँड.

हा असा देश आहे ज्याचे बहुतांश क्षेत्र हे पूरग्रस्त भागात येते. पण तरी देखील तिथले लोक चिंताग्रस्त नसतात.

कारण त्यांनी ह्या परिस्थितीला मान्य केलं आहे. आणि नुसतच मान्य केलेलं नाही तर अश्या परिस्थितीत कसं जगायचं ते देखील ते शिकले. त्यांच्या मते,

“पाणी आपला वैरी नाही, तो कधीच नव्हता, त्याच्याशी लढाल तर पराजीतच व्हाल.”

पूरस्थितीतही सुरक्षित राहण्यासाठी त्यांनी काही उपाययोजना केल्या आहेत.

 

Netherlands-inmarathi04
nytimes.com

 

नेदरलँडच्या Rotterdam शहरात समुद्रात एक आयफेल टावरएवढे उंच गेट तयार करण्यात आले आहे. हे गेट समुद्राच्या पाण्याला थांबविण्याचं काम करतं.

पूर किंवा सुनामी आला तर ते या गेटचा वापर करू शकतात. पण सध्यातरी हे गेट वापरायची गरज पडलेली नाही.

तसेच येथे पाण्यात अनेक वॉटर स्पोर्ट्सचे आयोजन देखील केल्या जाते.

२०१६ साली World Rowing Championships चे आयोजन येथेच करण्यात आले होते. आता हे एक मोठे पर्यटन स्थळ बनले आहे.

 

Netherlands-inmarathi03
ichef.bbci.co.uk

 

नेदरलँडच्या वैज्ञानिकांनी एक अशी मशीन तयार केली आहे ज्यामध्ये जगातील सर्वात मोठी कृत्रिम लाट बनवली जाऊ शकते.

ह्या मशीनने समुद्रासारखी परिस्थिती कृत्रिमरीत्या तयार केली जाऊ शकते ज्याचा उपयोग पूरपरिस्थितीत करता येतो.

 

Netherlands-inmarathi02
nytimes.com

 

नेदरलंडच्या सरकारने आपल्या नागरिकांना आपल्या घरी बगिचा बनविण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे पूरस्थितीत जास्तीत जास्त पाणी जमीन शोषून घेईल.

ह्यासाठी तेथील सरकार आर्थिक मदत देखील देते.

 

Netherlands-inmarathi01
homesthetics.net

 

नेदरलँडचे सरकार पूरग्रस्त भागात राहणाऱ्या लोकांना दोन पर्याय देते, एकतर त्यांनी ती जागा सोडून/विकून दुसरीकडे जावे, ज्या मोबदल्यात त्यांना योग्य भरपाई दिली जाते.

तर दुसरा पर्याय असा की त्यांनी उंच ठिकाणी राहावे. त्यासाठी देखील त्यांना आर्थिक सुविधा दिल्या जातात.

 

Netherlands-inmarathi07
psmag.com

 

नेदरलँडमध्ये अशी घरं बनविण्यात आली आहेत जी पाण्यावर तरंगतात. त्यांना Floating Homes म्हणतात.

नेदरलँडमध्ये तुम्हाला अशी अनेक घरे दिसतील, ही घरे पूर आल्यास पाण्यासोबत वाहून जाऊ शकतात.

आता तिथले लोक ह्या घरांमध्ये देखील राहायला शिकले आहेत.

 

Netherlands-inmarathi
flickr.com

 

सोबतच इथल्या सरकारने तिथल्या नद्या आणि समुद्रावर मोठमोठे बांध उभारले आहेत.

ह्यामुळे ते पूरस्थितीत पाण्याला शहरात पोहोचण्यापासून थांबवू शकतात. ह्या बांधांना Delta Works म्हणतात.

आधुनिकता आणि तंत्रज्ञान हे आज जगातील सर्वच देशांजवळ आहे तरी देखील त्याचा कसा वापर करायचा हे नेदरलंडकडून शिकण्यासारखे आहे. सर्वच पूरग्रस्त देशांसाठी नेदरलंडने एक आदर्श उभा केला आहे.

आता भारतासारख्या देशात हे सगळं शक्य नाही. इवलासा नेदरलँड आणि आपला भारत – तुलना होऊच शकत नाही.

परंतु नेदरलँडकडून “कल्पक उपाययोजना” करण्याचं स्पिरिट नक्कीच मिळू शकतं. ज्या ज्या भागांमध्ये पावसाळ्यात हमखास आपत्ती येते, त्या त्या भागांसाठी, तिथली भौगोलिक रचना बघून पुराचं संकट कमीत कमी भेदक होईल ह्याची तजवीज नक्कीच करता येऊ शकते.

इवल्याशा नेदरलँडला हे शक्य झालं – मग भारताला का नाही?

गरज आहे, फक्त इच्छा शक्तीची…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?